Monthly Archives: September 2014

काश्मिर हाहा:काराला जबाबदार कोण ?

भांडवली उत्पादन पद्धतीत अभिन्नपणे दडलेल्या अराजकतेमुळे निसर्ग आणि मानवाच्या संबंधांनी विनाशकारी रूप धारण केले आहे. परंतु कुठल्याही प्रकारच्या आधुनिकतेचा त्याग करून भूतकाळाच्या दिशेने वळणे हा काही या समस्येवरचा उपाय नाही तर यावरचा उपाय भविष्यातील एका मानवकेंद्रित उत्पादन पद्धतीत शोधावा लागेल जेथे उत्पादन मूठभर पैसेवाल्यांच्या नफ्यासाठी नाही तर मानवतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केले जाईल. अशा उत्पादन पद्धतीद्वारेच मनुष्य आणि निसर्गामधील अंतर्विरोध योजनाबद्ध आणि सौहाद्रपूर्ण रितीने सोडविले जाऊ शकतात.

‘जातिप्रश्न आणि आंबेडकरांचे विचार’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण चर्चा

‘जातिप्रश्न आणि मार्क्‍सवाद’ या विषयावर चौथे अरविंद स्मृती संमेलन मार्च २०१३ मध्ये चंदिगढ येथे आयोजित करण्यात आले. या संमेलनात प्रसिद्ध विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी आपली भूमिका मांडली होती व ‘अरविंद ट्रस्ट’तर्फे तिचे टिकात्मक विश्लेषण करण्यात आले. संमेलनानंतर या विषयाशी संबंधित विचारवंत, कार्यकर्ते यांच्यामधून या संमेलनातील वादविवादावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही वर्तमानपत्रे व नियतकालिकांमधून यासंबंधी लेखही लिहिले गेले. त्यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उत्तर देण्याच्या हेतूने व आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ‘संहति डॉट कॉम’वर एक विस्तृत लेख प्रसिद्ध केला. ‘अरविंद ट्रस्ट’च्या वतीने अभिनव सिन्हा यांनी या लेखाचा प्रतिवाद करणारा लेख लिहून जातिप्रश्न, आंबेडकरवाद, जातिसमस्येचे मार्क्‍सवादी विश्लेषण यांसंबधी विस्तृत विवेचन केले. आपल्या समाजातील एका अत्यंत जटिल आणि महत्त्वाच्या समस्येवरील ही महत्त्वपूर्ण चर्चा महाराष्ट्रातील कार्यकर्ते, विचारवंत तसेच विद्यार्थी, तरुण व सामान्य नागरिक यांच्यासमोर येणे तसेच या विषयावर निरोगी चर्चा होणे गरजेचे असल्याने येथे या दोन्ही लेखांचे अनुवाद देत आहोत.

आनंद तेलतुंबडे यांना उत्तर: स्वघोषित शिक्षक व उपदेशकर्त्‍यांसाठी

तेलतुंबडे या ठिकाणी, त्यांनी मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवादाचे मिश्रण किंवा समन्वयाची गोष्ट कधी केलीच नाही किंवा त्याला अवांछित मानले आहे, असे सांगताना असत्याचा आधार घेत आहेत. १९९७ साली त्यांनी पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात एक प्रबंध सादर केला होता – ‘आंबेडकर इन अ‍ॅण्ड फॉर दि पोस्ट आंबेडकर दलित मूव्हमेंट’. यात दलित पँथर्सची चर्चा करताना ते लिहितात, ‘‘जातिवादाचा प्रभाव, जो दलित अनुभवासोबत अंतर्भूत आहे, अनिवार्यपणे आंबेडकरांना घेऊन येतो, कारण त्यांचा फ्रेमवर्क हा असा एकमेव फ्रेमवर्क होता ज्यात याची जाणीव होती. परंतु वंचनांच्या अन्य समकालीन समस्यांसाठी मार्क्‍सवाद क्रांतिकारी परिवर्तनाचा एक वैज्ञानिक फ्रेमवर्क सादर करीत होता. दलित व गैर दलितांमधील वंचित लोक एका पायाभूत बदलाची आकांक्षा बाळगत होते, मात्र यांतील पहिल्यांनी सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या त्या पद्धतीचे अनुसरण केले जी आंबेडकरीय दिसत होती, तर दुसऱ्यांनी मार्क्‍सीय म्हणविली जाणारी पद्धत स्वीकारली जी प्रत्येक सामाजिक प्रक्रियेला केवळ भौतिक यथार्थाचे प्रतिबिंब मानीत होती. या दोघांनीही चुकीच्या व्याख्यांना जन्म दिला. या दोन्ही विचारधारांच्या मिश्रणाचा देशातील पहिला प्रयत्न करण्याचे श्रेय पँथर्सना जाते, परंतु दुर्दैवाने या दोन्ही विचारधारांना अस्पष्ट प्रभावांपासून मुक्त करण्याचे प्रयत्न व त्यांतील अविसंवादी (नॉन काँट्रॅडिक्टरी) सारतत्त्वावर जोर देण्याच्या प्रयत्नांच्या अनुपस्थितीमुळे हा प्रयत्न मध्येच अवरुद्ध झाला. या दोन्ही विचारधारांना समेकित करण्याचा ना कोणताही सैद्धांतिक प्रयत्न झाला, ना जातीच्या सामाजिक पैलूंना ग्रामीण परिवेशात भूमीच्या प्रश्नाशी जोडण्याचा कोणताही व्यावहारिक प्रयत्न केला गेला.’’ आता वाचकांनीच सांगावे की तेलतुंबडे जो दावा करीत आहेत त्याला खोटेपणाच्या श्रेणीत ठेवले जाऊ नये का? या ठिकाणी ‘आंबेडकरीय’ आणि ‘मार्क्‍सीय’ म्हणजेच ‘आंबेडकरवाद’ आणि ‘मार्क्‍सवाद’ या अर्थांत ‘दोन विचारधारां’’च्या अर्थाने त्यांचा प्रयोग झालेला नाही का? मग आपण आंबेडकरवाद असा शब्दप्रयोग कधी केलाच नाही, कारण तशी कोणतीही विचारधारा आहे असे आपण मानीत नाही, असा निराधार आणि खोटा दावा ते करतात तो कशासाठी? या ठिकाणी ते आंबेडकरांची विचारधारा आणि मार्क्‍सची विचारधारा आणि त्यांच्या मिश्रणाच्या आवश्यकतेविषयी बोलत नाहीत का? तेलतुंबडेंसारख्या लोकपक्षधर बुद्धिजीवीने बौद्धिक नैतिकतेचे पालन केले पाहिजे आणि अशा प्रकारे शुद्ध खोटारडेपणा करू नये, असा सल्ला आम्ही त्यांना देऊ इच्छितो.

उद्धरण

जोवर लोक आपले स्वातंत्र्य वापरण्याची जोखीम उचलत नाहीत, तोवर हुकूमशहांचे राज्य चालत राहील, कारण हुकूमशहा सक्रिय आणि उत्साही असतात आणि ते झोपेत बुडालेल्या लोकांना बेड्यांत जखडण्यासाठी ईश्वर, धर्म किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आधार घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

आत्ममुग्ध मार्क्‍सवादी व नकली आंबेडकरवाद्यांच्या नावे…

जे लोक माझ्या लेखनाशी परिचित आहेत त्यांना माझ्या लेखनात मी आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद यांच्या समन्वयाचा प्रस्ताव ठेवल्याचे कधीच आढळणार नाही. खरे तर मी कधी आंबेडकरवाद हा शब्ददेखील वापरलेला नाही जो माझ्या नावाशी जोडण्यात आला आहे. ‘जातीचे उच्चाटन’ला ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’इतकेच महत्त्वपूर्ण मानल्याबद्दल माझ्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आला आहे त्यावरून असे सूचित होते की ‘जातीचे उच्चाटन’ चे आता काही महत्त्व राहिलेले नाही. अप्रोच पेपरमध्ये इतरांच्या दृष्टिकोनाची टवाळी करणे वा तो नाकरण्याबरोबरच आपला दृष्टिकोनच बरोबर असल्याचे सांगण्याची बरीच उदाहरणे आहेत.

वजीरपूरच्या गरम रोला कामगारांचे ऐतिहासिक आंदोलन

दिल्लीच्या उत्तर पश्चिम भागात वजीरपूर औद्योगिक इलाक्यातील इस्पात उद्योगाच्या गरम रोला कामगारांनी ६ जूनपासून एका शानदार संघर्षास आरंभ केला. मजुरी वाढविणे, कामाचे तास कमी करणे आणि अशाच अन्य अधिकारांसाठी कामगारांनी गरम रोला मजदूर एकता समितीच्या नेतृत्त्वाखाली संप पुकारला आणि आपल्या अधिकारांसाठी दीड महिन्याचे दीर्घ यशस्वी आंदोलन चालविले. बिगुल मजदूर दस्ता संघटनेची या आंदोलनात विशेष भूमिका होती. दीड महिन्यांच्या दीर्घ संघर्षाद्वारे कामगारांनी आपल्या बहुतेक मागण्यांसमोर मालकांना झुकण्यास भाग पाडले.

कार्ल मार्क्‍स-नारायण सुर्वे

जानकी अक्का म्हणाली, ‘वळिखलंस ह्याला –
ह्यो आमचा मार्कसबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.
‘सन्याषाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्‍स मला असा भेटला.

नरेंद्र मोदींच्या विजयाचे संदर्भ

कोणतेही आर्थिक संकट दोन शक्यतांना जन्म देते- प्रगतिशील आणि प्रतिक्रियावादी. ज्या देशांमध्ये कामगार वर्गाची क्रांतिकारी पार्टी अस्तित्त्वात होती त्या देशांमध्ये फासीवादी उभार ‘‘न थांबवता येण्याजोगा’’ अथवा अपरिहार्य होऊ शकला नाही. परंतु ज्या देशांमध्ये कामगार वर्गाची कोणतीच अग्रणी क्रांतिकारी पार्टी अस्तित्त्वात नव्हती, किंवा जेथे अशा पार्ट्या कमकुवत होत्या त्या देशांमध्ये फासीवादी उभार एक ‘‘न थांबवता येण्याजोगे’’ वादळ बनून अवतरला. याच्याशी जोडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे फासीवाद आणि उदार भांडवली (कल्याणकारी) राज्य परस्परांना ‘‘अँटीथिसीस’’ नाहीत, उलट परस्परपूरक आहेत. ज्या देशांमध्ये विसाव्या शतकात फासीवादी उभार झाले तेथे ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या उदार भांडवली राज्य किंवा संशोधनवादी सामाजिक लोकशाहीवादी कल्याणकारी सत्तेच्या अनिवार्य विफलतेची निष्पत्ती होते.

गाब्रिएल गार्सिया मार्केझ : वास्तवाचा मायावी चित्रकार

गाब्रिएल गार्सिया मार्केझ म्हणजे इतिहासावर जादू करून कादंबरीत जीवनाच्या ताणतणावांचे धागे विणणारा वास्तवाचा कवी. या कादंबऱ्यांमध्ये लोक संघर्ष करतात, प्रेम करतात, हरतात, दडपले जातात आणि विद्रोह करतात. ब्रेष्टने म्हटले आहे की साहित्याने वास्तवाचे जसेच्या तसे चित्रण करायचे नसते तर पक्षधर लिखाण करायचे असते. मार्केझच्या कादंबऱ्यांमध्ये, प्रामुख्याने ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’, ‘ऑटम ऑफ दि पॅट्रियार्क’ व ‘लव्ह अ‍ॅण्ड दी अदर डेमन’मध्ये त्यांची लोकपक्षधरता स्पष्टपणे दिसून येते. मार्केझ यांच्या जाण्याने लॅटिन अमेरिकन साहित्यातील एक गौरवशाली युग समाप्त झाले आहे.

« Older Entries Recent Entries »