उद्धरण
तीच कला खरी आहे जी जीवन प्रतिबिंबित करते. तिच्यामध्ये सर्व अंतद्र्वंद्व, संघर्ष, प्रेरणा, विजय, पराजय आणि जीवनाबद्दल प्रेम आणि मानवी व्यक्तित्वाचे सारे पैलू आढळतात. तीच खरी कला आहे जी जीवनाविषयी चुकीच्या धारणा प्रदान करीत नाही.
भगतसिंह म्हणाले होते…
लोकांना आपापसात लढण्यापासून रोखण्यासाठी वर्गचेतनेची आवश्यकता आहे. गरीब कष्टकरी व शेतकऱ्यांना नीट समजावले पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत, म्हणूनच तुम्ही त्यांच्या डावपेचांपासून जपून राहिले पाहिजे आणि त्यांच्या आहारी जाऊन काहीही करू नये. जगातील सर्व गरीबांचे, मग ते कोणत्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे किंवा राष्ट्राचे असोत, अधिकार सारखेच आहेत. तुम्ही धर्म, वर्ण, वंश आणि राष्ट्रीयता व देशाचे भेदभाव नष्ट करून एकजूट होण्यात व सरकारची शक्ती आपल्या हातांमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यातच तुमचे भले आहे. या प्रयत्नांमध्ये तुमचे काहीच नुकसान होणार नाही, यामुळे एके दिवशी तुमच्या बेड्या तुटून पडतील आणि तुम्हांला आर्थिक स्वातंत्र्य लाभेल.
भगतसिंह (सांप्रदायिक दंगे आणि त्यांवरील उपाय)
जोवर लोक आपले स्वातंत्र्य वापरण्याची जोखीम उचलत नाहीत, तोवर हुकूमशहांचे राज्य चालत राहील, कारण हुकूमशहा सक्रिय आणि उत्साही असतात आणि ते झोपेत बुडालेल्या लोकांना बेड्यांत जखडण्यासाठी ईश्वर, धर्म किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आधार घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.
लू शून (चीनी साहित्यिक) यांच्या जन्मदिनानिमित्त (२५ सप्टेंबर)
कल्पना करा की जाड्या पोलादी भिंतींचे एक घर आहे. ना एखादा दरवाजा आहे, ना खिडकी ना कुठलाही झरोका. वाऱ्यासाठी कोणताच मार्ग नाही आणि भिंती पूर्णपणे अभेद्य आहेत. घरात अनेक माणसे शुद्ध हरपून डाराडूर झोपलेली आहेत. ती माणसे खचितच श्वास कोंडून मरून जातील. परंतु बेशुद्धीत मेल्यामुळे त्यांना कोणत्याच यातना होणार नाहीत. तुम्ही ओरडून ओरडून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला तर शक्य आहे त्यांच्यापैकी एखाद्याची झोप मोडेल. श्वास कोंडल्यामुळे त्यांचे मरण ठरलेलेच आहे. त्यांपैकी काही अभागी जागे झाले आणि मृत्यूच्या निश्चित यातना त्यांनी अनुभवल्या तर त्यामुळे त्यांचे काय भले होणार आहे? जर काही जणांची झोप मोडू शकते तर असे कसे म्हणता येईल की त्या पोलादी भिंती तोडण्याची कोणतीच आशा नाही?
हे खरे नाही की लोक म्हातारे होतात म्हणून स्वप्न साकार करण्याची धडपड सोडून देतात. स्वप्न साकार करण्याची धडपड सोडून देतात म्हणून ते म्हातारे होतात.
स्फुलिंग १ सप्टेंबर २०१४