मुंबई मध्ये विषारी दारु पिण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 87 लोकांच्या मृत्युस जबाबदार कोण?
झोपड़पट्टयांमध्ये पोलिसांच्या गाड्या दिवस रात्र चक्कर मारत असतात. हे पोलिसवाले ह्या भागात चकरा तिथे कायदा व्यवस्था कायम करण्यासाठी मारत नसतात तर स्थानिक छोटे व्यापारी आणि कारखानदार यांच्या साठी भाडोत्री गुंडांसारखे काम करतात. सर्व अपराध, सर्व बेकायदेशीर कामे पोलिसांसमक्ष होत असतात आणि हे सर्व धंदे पोलिस, नगरसेवक-आमदार-खासदार आदींचे खीसे गरम करूनच केले जातात. निशंकपणे आपण म्हणू शकतो अशा अवैध्य दारु भट्टयांबद्दल प्रशासनाला पूर्ण कल्पना असते. दारु अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यात मेथानोल आणि कित्येक वेळा पेस्टीसाइडसुद्धा उपयोगात आणले जातात. अशा दारुच्या गुणवत्तेचे काही निश्चित मानकं नसतात आणि तिची लॅबोरेटरी चाचणी सुद्धा होत नाही, त्यामुळे अशा दारुमध्ये ह्या धोकादायक पदार्थांची मात्रा कमी जास्त होत रहाते. ह्या दारुमध्ये ह्या विषारी पदार्थांची मात्रा कमी असली तरी अशा दारुच्या निरंतर सेवानामुळे डोळे ख़राब होण्यासारखे धोके तर कायम असतातच. ह्या विषारी पदार्थांचे प्रमाण जर जास्त असेल तर काय होते, हे ह्या घटनेच्या निमित्ताने समोर आलेच आहे.