Monthly Archives: October 2022

सण-उत्सवांसंबंधी काही विचार

-कात्यायनी (अनुवाद: जयवर्धन) शेतीवर अवलंबित प्राचीन समाजात सणांचा जन्म पिकांच्या पेरणी आणि कापणीच्या हंगामावर आधारित होता. सार्वजनिक आनंद उत्सवाचे ते संस्थात्मक स्वरूप होते. कल्पनावादी (जादूई) विश्व दृष्टिकोन आणि नैसर्गिक शक्तींची पूजा करण्याच्या आदिम काळात या सणांसोबत जादूटोण्याच्या काही सामूहिक क्रिया जोडलेल्या होत्या. मग संस्थाबद्ध धर्मांनी या सणांना सत्ताधारी वर्गाच्या हितानुसार पुनर्संस्कारित व पुनर्गठित केले आणि त्यात विविध धार्मिक पौराणिक कथा आणि विधी जोडले गेले. असे असूनही, भांडवलशाहीपूर्व समाजात, सामान्य उत्पादक जनसमुदायाने हे सण-उत्सव मोठ्या प्रमाणात त्यांच्या पद्धतीने साजरे केले. सण