Monthly Archives: March 2022

प्रेम आणि मुक्तीचे गीतकार: जनकवी फैज

(फैज अहमद फैज यांच्या 13 फेब्रुवारी या जन्मदिनानिमित्त ) लेखक: अमन “क़त्ल-गाहों से चुन कर हमारे अलम और निकलेंगे उश्शाक़ के क़ाफ़िले..” [न्याय आणि समतेच्या या संग्रामात कत्तलखान्यांतून आमची कत्तल जरी करण्यात आली तरी आमच्या खाली पडलेल्या ध्वजा उचलण्यासाठी अजून कित्येक प्रेमी त्यांचे लष्कर घेऊन येतील.] उर्दू कवितेच्या इतिहासात जे स्थान फैज अहमद फैजना जनतेने आपल्या हृदयांत दिले ते कदाचितच इतर कोणाला मिळाले असेल. “हम देखेंगे” हे गीत तर सांप्रदायिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जनतेचे युद्धगीतच बनले होते. 13 फेब्रुवारी

कोरोना षडयंत्र सिद्धांत: वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाचे परिणाम

लेखक: निखिल आज कॉविड -19 महामारीचा उद्रेक होऊन 2 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. दरम्यानच्या काळात जग अतोनात जीवित तसेच वित्तीय हानीतून गेले आहे आणि साहजिकच भांडवली समाजातील इतर बहुतांशी सामाजिक संकटांप्रमाणे ह्या आरोग्य संकटाचा सर्वाधिक मार जगभरातील कामकरी जनतेवरच पडला. ध्वस्त झालेली एकंदरीत आरोग्य व्यवस्था, खाजगी दवाखान्यांची लूट, ऑक्सिजन पासून औषधींचा काळाबाजार सोबतच केंद्र व राज्यसरकारांच्या अनियोजित लोकडाऊनमुळे उपासमार, बेकारी व अनेक प्रवासी कामगारांची हजारो किलोमीटरची पायी फरफट अशा किती समस्या सांगाव्यात? ह्या आरोग्य संकटाच्या काळात भांडवली आर्थिक व्यवस्थेचा

‘द काश्मीर फाइल्स’: काश्मिरी पंडितांची शोकांतिका दाखवण्याच्या नावाखाली मुस्लिम आणि डाव्यांविरुद्ध द्वेष वाढवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा डाव

मूळ हिंदी लेखाचे लेखक:आनंद सिंहअनुवाद:जय उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर संघ परिवाराची संपूर्ण फॅसिस्ट यंत्रणा आता विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य कलाकारांची भेट घेतली. एवढेच नाही तर हा चित्रपट चर्चेत रहावा म्हणून मोदींनी भाजपच्या बैठकीत या चित्रपटाला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा उल्लेख केला. गृहमंत्री अमित शहा यांनीही चित्रपटाच्या टीमची भेट घेतली. जास्तीत जास्त लोकांना चित्रपट पाहता यावा म्हणून भाजपशासित राज्यांनी चित्रपट