आनंद तेलतुंबडे यांना उत्तर: स्वघोषित शिक्षक व उपदेशकर्त्‍यांसाठी

आनंद तेलतुंबडे यांना उत्तर: स्वघोषित शिक्षक व उपदेशकर्त्‍यांसाठी

अभिनव सिन्हा

DSC01027आनंद तेलतुंबडे यांनी आमच्या बाबतीत आपला निवाडा दिलेला आहे. त्यांनी आम्हांला ‘‘जडबुद्धी’’ तसेच ‘‘आत्ममुग्ध मार्क्‍सवादी’’ म्हटले आहे. यावर आम्ही काय म्हणू शकतो? त्यांनी स्वत:च मान्य केल्याप्रमाणे, ते केवळ काही तास परिसंवाद स्थळी हजर होते आणि अगदी थोडक्या वेळात ते आमच्या बाबतीत एक निश्चित धारणा बनवू शकले व शेवटी आपला निर्णय त्यांनी देऊन टाकला. किंबहुना, या लहानशा भेटीदरम्यान आम्हीसुद्धा आनंद तेलतुंबडे यांच्या बाबतीत एक मत बनवू शकलो. आम्ही काही उदाहरणांसह सुरू करू आणि श्रीमान तेलतुंबडे यांच्या लेखाचे पैरेग्राफनुसार उत्तर देऊ.

‘‘आत्ममुग्धता’’ आणि अशाच रोगांसंबंधी…

१. चंदिगढ परिसंवादात आपल्या पहिल्या वक्तव्यात श्रीमान तेलतुंबडे जवळपास एक तास बोलले. या दीर्घ भाषणात त्यांनी तीन ते चार वेळा स्वत:च्या नावाचा उल्लेख केला. त्यांनी सुरुवात या दाव्यासह केली की, आंबेडकरवादी म्हणतात आनंद तेलतुंबडे मार्क्‍सवादी आहेत आणि मार्क्‍सवादी म्हणतात की आनंद तेलतुंबडे आंबेडकरवादी आहेत. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘‘मला अशी माणसं आवडत नाहीत जी तत्काळ माझ्या मताशी सहमत होतात’’; दुसरीकडे, ‘‘मी अतिरिक्त मूल्यासंबंधी गणिती समस्या पाहिली जी मार्क्‍सने बीजगणिताचा वापर करून सोडविली होती, परंतु मला असे दिसले की ही समस्या तर अवकलन समीकरणाची (Differential equation) होती आणि त्यावेळी मला प्रश्न पडला की अखेर मार्क्‍सने बीजगणिताद्वारे ती कशी काय सोडविली? नंतर मी ही समस्या अवकलन समीकरणाद्वारे सोडविली आणि एका आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठविली आणि हा माझा पहिला पेपर होता जो एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला. (खी खी) कित्येक वर्षांनंतर मी आई.आई.टी.मध्ये असताना माझ्या लक्षात आले की एका जपानी शास्त्रज्ञाने माझ्या पद्धतीचा उपयोग करून संशोधन केले आहे’’. त्यानंतर, ‘‘मी वयाच्या सातव्या वर्षीच मार्क्‍सवादी बनलो होतो आणि मला नाही वाटत की इथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणीच इतक्या कमी वयात मार्क्‍सवादी बनला असेल’’. यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील. परंतु उपरोक्त उदाहरणे हे दाखविण्यासाठी पुरेशी आहेत की आत्ममुग्धता किंवा स्वत:च्या प्रेमात पडणे काय असते.

मला असे वाटते की आनंद तेलतुंबडे यांनी आपल्या आत्यंतिक प्रामाणिकपणाचे दर्शन तेव्हा घडविले जेव्हा त्यांनी मान्य केले की चंदिगढला जाण्याबद्दल ते स्वत:ला दोषी मानतात. परंतु या दिखाऊ आत्मनींदेचे जे कारण ते देत आहेत ते आम्हांला तर्कसंगत वाटत नाही. या आत्मनींदेच्या कारणांचे आमचे विश्लेषण काहीसे वेगळे आहे. त्यासंबंधी पुढे. इथे तर आम्ही केवळ एवढेच सांगू इच्छितो की श्रीमान तेलतुंबडे यांनी हे सांगितले पाहिजे की ‘‘आत्ममुग्धता’’ म्हणजे त्यांच्या मते काय आहे? शब्दकोशातील अर्थानुसार चालावयाचे झाल्यास त्यांनी नक्कीच आपल्या भूमिकेकडे गंभीरपणे पाहाण्याची गरज आहे.

आम्ही खुल्या नि:पक्षपाती चर्चेसाठी तयार नव्हतो व आमचा अप्रोच पेपर अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही अन्य लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देत नव्हतो, असा दावा त्यांनी केला आहे. परंतु, या आरोपाची पुष्टी करण्यासाठी ते कोणतेही निश्चित कारण देत नाहीत. उदाहरणार्थ, आमच्या अप्रोच पेपरवर खुल्या व नि:पक्षपाती चर्चेसाठी जर आम्ही तयार नसतो, तर आम्ही श्रीमान तेलतुंबडे यांना जालंधरहून घेऊन आलोच नसतो (काही तासांसाठी तरी त्यांनी परिसंवादात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा असेल तर आम्हांला त्यांना जालंधरहून चंदिगढला आणण्याची व सायंकाळी पुन्हा गाडीने जालंधरला पोहोचविण्याची सोय करावी लागेल, असे त्यांनी स्वत:च सांगितले होते.) व सायंकाळी पुन्हा जालंधरला पोहोचविले नसते. आमच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता (आणि आजही आहे). आपल्या काही तासांच्या उपस्थितीत ते जवळपास दीड तास बोलले व आम्ही लक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकले, तसेच त्यांनी आणखी काही वेळ थांबावे व अन्य काही बाबींसंबंधी चर्चा करावी, असा आग्रहही आम्ही त्यांना केला. जर आम्ही प्रत्येक मुद्यावर वादविवाद व चर्चेसाठी तयार नसतो तर परिसंवादात त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एवढी धडपड केली असती का? परंतु त्यांच्या पहिल्या वाक्यानेच आमच्या सगळ्या आशा धुळीस मिळविल्या. ते जे काही बोलले त्याच्याशी आम्ही सहमत होऊ शकत नव्हतो, व आम्ही त्यांची टीका सादर केली. परंतु मला असे वाटते की आनंद तेलतुंबडे यांना त्यांची टीका ऐकण्याची सवय नसावी व म्हणूनच त्यांना ती त्रासदायक वाटली. त्यांनी आपल्या दुसऱ्या वक्तव्यात एकही असहमतीदर्शक मत मांडले नाही, तसेच ते जे काही बोलले ते मी आणि सुखविंदर यांनी ठेवलेले तर्क व तसेच आमच्या अप्रोच पेपरमध्ये जे काही लिहिले होते त्याच्याशी सहमती दर्शविणारेच होते.

स्वत:ला योग्य सिद्ध करण्याच्या उन्मादाने आम्ही ग्रस्त होतो, हा श्रीमान तेलतुंबडे यांचा आरोप बिनबुडाचा आहे, असे मी मानतो. आपल्या दुसऱ्या वक्तव्यानंतरदेखील परिसंवादाच्या संचालनाच्या पद्धतीबाबतीत त्यांनी कोणताच आक्षेप नोंदविला नाही. वास्तविक, आम्ही (मी व श्रीमान तेलतुंबडे यांनी) आपापले मोबाईल नंबर एकमेकांना दिले व त्यांनी दिल्लीत येऊन एक दीर्घ चर्चा करण्याबाबतही तयारी दर्शविली. परंतु श्रीमान तेलतुंबडे आपल्या लेखात यासंबंधी कोणताच उल्लेख करीत नाहीत. याचे आम्हांस आश्चर्य वाटते.

श्रीमान तेलतुंबडे यांच्या लेखाला पॅरेग्राफनुसार उत्तर

आम्ही पहिल्या पॅरेगा्रफला वर उत्तर दिलेलेच आहे. म्हणून मी त्यांच्या लेखाच्या दुसऱ्या पॅरेगा्रफपासून सुरुवात करतो.

२. आनंद तेलतुंबडे आमच्यावर ‘‘परिसंवादाचे असंकलित व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्या’’चा गुन्हा केल्याचा आरोप करतात. सामान्य जनता आकलनाच्या त्या स्तरापर्यंत पोहोचलेली नसते जो परिसंवादात सहभागी प्रतिनिधींचा होता (आणि म्हणूनच ते चर्चेत सहभागी होत नाहीत!) असे ते मानतात. हा एक अत्यंत अर्थशून्य तर्क आहे. जगभरातील क्रांतिकारी संघटनांद्वारे, अगदी शैक्षणिक संस्थांद्वारे आयोजित परिसंवादात प्रतिनिधींनी केलेली वक्तव्ये रेकॉर्ड केली जातात व ऑनलाईन पोस्ट केली जातात. यात कोणताच ‘‘कच्चेपणा’’ नाही. जर आम्ही परिसंवादातील व्हिडिओ ऑनलाईन करण्यापूर्वी संकलित केले असते तर वक्तव्याची काटछाट करण्याचा आरोप आमच्यावर केला जाऊ शकला असता! म्हणजेच श्रीमान तेलतुंबडेंच्या मते चित भी मेरी और पट भी मेरी. याशिवाय, अखेर श्रीमान तेलतुंबडे यांना सामान्य जनतेची एवढी भीती कशामुळे वाटावी? श्रीमान तेलतुंबडे व अन्य वक्तयांची मते एकून ती न समजण्यासारखी  सामान्य जनतेची स्थिति आहे, मला असे वाटत नाही. आम्ही श्रीमान तेलतुंबडे यांना सांगू इच्छितो की त्यांनी व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावा आणि बिचारी मूढ ‘‘सामान्य’’ जनता काय समजू शकत नाही, ते आम्हाला समजावून सांगावे. आमचे व्हिडिओ सार्वजनिक करणे हेच दाखविते की आम्ही जातीचा प्रश्न समजू शकत नाही, असे म्हणून ते आम्हांला आश्चर्याचा धक्का देतात. आम्ही जातीचे वास्तव समजून घेण्यास असमर्थ आहोत, हे यावरून कसे काय सिद्ध होते माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की परिसंवादातील चर्चेच्या सार्वजनिक होण्याचा जातिप्रश्न समजण्यातील आमच्या असमर्थतेशी काय संबंध आहे? म्हणूनच आम्ही अगदी आरंभीच म्हटले की हा एक अत्यंत अर्थहीन तर्क आहे ज्यातून काहीच हाती लागत नाही. आमचा असा विश्वास आहे की आमच्यातर्फे परिसंवादाचे व्हिडिओ साधारण आणि सामान्य रूपांत उपलब्ध करणेच नाही तर श्रीमान तेलतुंबडे यांचा परिसंवादातील सहभाग त्यांच्यासाठी एखाद्या धक्क्यासारखा होता, आणि याची कारणे ती नाहीत जी ते सांगत आहेत, कारण तथ्य आणि विवरणाच्या आधारे आमच्या विरोधात केलेला एकही आरोप ते सिद्ध करू शकलेले नाहीत. म्हणूनच आमचा आग्रह आहे की त्यांनी आपल्या तर्कांवर पुन्हा विचारा करावा. आमच्या मते त्यांचा सहभाग त्यांच्यासाठी एखाद्या धक्क्यासमान यासाठी होता कारण या परिसंवादातही ते मार्क्‍सवाद्यांना धडा शिकवण्याच्या मूडमध्ये आलेले होते, परंतु झाले उलटेच. आंबेडकरवादासमोर आत्मसमर्पण करण्यास सदैव सज्ज असलेले सन्हति डॉट कॉमसारखे  चर्चा चालविण्याच्या योग्य पद्धतांrबद्दलही अनभिज्ञ असणारे मार्क्‍सवादी येथे नव्हते. तेलतुंबडे यांना या परिसंवादात भेटलेले मार्क्‍सवादी त्यांच्या आजवरच्या अनुभवाच्या आणि अपेक्षेच्या विपरित निघाले. याच कारणास्तव तेलतुंबडे महोदयांना धक्का बसला व चंदिगढ परिसंवादात जाण्याबद्दल ते स्वत:ला दोष देत होते. आम्ही वाचकांना आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की त्यांनी दोन तासांपेक्षा अधिक चाललेल्या या चर्चेचा व्हिडिओ पाहावा; त्यांना कळून येईल आम्हांला काय सांगायचे आहे.

३. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये, अगोदर तेलतुंबडे त्यांची वक्तव्ये मिडियामध्ये ‘‘लिक’’केल्याबद्दल आम्हांला जबाबदार ठरवतात व प्रश्न करतात, ‘‘परंतु त्यांची या जबाबदारीतून सुटका होऊ शकते का?’’ आम्हांला तेलतुंबडे यांना सांगावयाचे आहे की ते जे काही बोलतात त्याची जबाबदारी पत्करण्यास त्यांनी शिकावे. आंबेडकरांचे सारे प्रयोग महान विफलतेत परिणत झाले, असे त्यांनी म्हटले व वास्तविक ते असे मानतातही, हे ते मान्य करतात. तर मग एक हिंदी वर्तमानपत्र त्यांचे वक्तव्य उद्धृत करीत असेल तर त्यात अडचण काय आहे? आणि त्यासाठी आम्ही जबाबदार कसे काय ठरू शकतो? सर्वच परिसंवादामध्ये मिडिया येतच असते आणि ही एखाद्या पक्षाची बंद खोलीतील चर्चा तर नव्हती; आणि श्रीमान तेलतुंबडे यांना हे वास्तव बऱ्यापैकी माहित होते. म्हणूनच, एकदा ते जे काही बोलले ते बोलले, व त्याची जबाबदारी स्वीकारण्यात लाज ती कसली, त्याची जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर कां टाकावी? ज्या संदर्भात ते तेथे ‘‘उभे राहून बोलले’’ तो संदर्भ समजून घ्यावा जेणेकरून त्यांचे दूसरे वक्तव्य समजून घेता येईल, असा त्यांचा आग्रह आहे. किंबहुना आमचा असा आग्रह आहे की त्यांनी स्वत:च तो संदर्भ आम्हांला समजावून दिल्यास बरे होईल. त्यांच्या दीर्घ भाषणात प्रयत्नपूर्वक उलगडून दाखविण्यासारखे (डेसिफर) व विनिर्मित (डिकन्स्ट्रक्ट) करण्यासारखे काहीच नव्हते. अप्रोच पेपर हिंदीमध्ये असल्यामुळे तो वाचण्यात त्यांना अडचण जाणवत होती, तरीही त्यांनी कष्टपूर्वक संपूर्ण पेपर वाचला, हे त्यांनी आपल्या भाषणाच्या आरंभीच सांगून टाकले होते. ते म्हणाले की पेपर एका ब्राह्मण्यवादी विचारातून लिहिला गेला आहे व त्यास जातीयवादाचा दर्प येतो आहे. आता ते म्हणत आहेत की त्याला जातीयवाद आणि ब्राह्मण्यवादापासून वेगळे करणारी रेषा फारच धूसर होती. आता सांगा तेलतुंबडेसाहेब, हे कोलांटी मारणे नाही का? याशिवाय, आम्ही पोथीनिष्ठ मार्क्‍सवादी आहोत, असे तेलतुंबडे यांनी आपल्या पहिल्या वक्तव्यात म्हटले होते. परंतु आपल्या दुसऱ्या वक्तव्यात ते म्हणाले की, जर तुम्ही म्हणत असाल की मार्क्‍सवाद एक जडसूत्र नाही, तर ठिक आहे, मीदेखील तसेच मानतो आणि आहेही तसेच. हेदेखील आपल्या अगोदरच्या बोलण्यावरून कोलांटी मारणे नाही का? श्रीमान तेलतुंबडे म्हणतात की आम्ही आंबेडकर आणि फुले यांना कचराकुंडीत फेकतो आहोत. आम्ही उत्तर दिले की आम्ही तसे करीत नाही, व आमचा अप्रोच पेपर व आमच्या वक्तव्यात आम्ही त्यांचे योगदान मान्य केले आहे. परंतु, तसे करणे आम्हांला आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राची चिकित्सा करण्यापासून अडवू शकत नाही, आणि अडवूही नये. चिकित्सेच्या क्षेत्रात क्षमायाचनेचे किंवा लज्जित होण्याचे काही कारण नाही, आणि तसे करण्याला काही अर्थ नाही. जे आहे तेच आपण बोलून दाखविले पाहिजे. याच्याशी तेलतुंबडे सहमत होते व ते म्हणाले की तेदेखील आंबेडकरांचे राजकारण आणि तत्त्वज्ञानाशी सहमत नाहीत. परंतु, त्यांनी आपल्या पहिल्या वक्तव्यात असा दावा केला होता की एक प्रगतिशील व्यवहारवादी असलेल्या जॉन ड्युई यांच्या विचारसरणीचे आंबेडकरांनी अनुसरण केले होते, हे अनेक लोकांना ठाऊक नाही. ते असे म्हणाले की प्रत्येक अवधारणा (किंवा परिकल्पनांचा समुच्चय) प्रयोगाच्या आधारे पडताळून पाहणारी व तद्नंतर एका अधिक उन्नत अवधारणेची (किंवा परिकल्पनांच्या समुच्चयाची) निर्मिती करणारी ड्युईयन पद्धत एक वैज्ञानिक पद्धत असण्याच्या अत्यंत निकट आहे. ते स्वत: ड्युईयन पद्धती पूर्णपणे मानीत नाहीत, परंतु हे मात्र जरुर मानतात की ती निसर्गविज्ञानाशी फार जवळून संबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. येथे हे लक्षात घेण्याजोगे आहे की त्यानंतर तेलतुंबडे असे म्हणाले की त्यांना स्वत:ला निसर्गविज्ञानाची पाश्र्वभूमी लाभलेली आहेजेथे सिद्धांतांची निर्मिती केली जाऊ शकते अशा सामाजिक विज्ञानाची नाही! त्यांचे हे विधान म्हणजे वास्तविक जॉन ड्युईचा व्यवहारवाद व इन्स्ट्रूमेंटॅलिझमचे औचित्य प्रतिपादन आहे, किंवा किमान त्याची प्रशंसा तरी आहेच आहे. मी तेलतुंबडे यांच्या अप्रोचची चिकित्सा केली व तर्क मांडला की ड्युईयन पद्धत वैज्ञानिक असण्याचा दावा अवश्य करते, परंतु प्रत्यक्षात ती तशी नाही. कारण विज्ञानालादेखील ए प्रॉयोरी अप्रोच व विश्व- दृष्टिकोनाची आवश्यकता असते. त्यानंतर आम्ही आंबेडकरांच्या ड्युईयन पद्धतीची सविस्तर चिकित्सा सादर केली. परंतु तेलतुंबडे ड्युईयन पद्धतीच्या बाबतीत कधीच चिकित्सक होताना दिसले नाहीत. ज्या कोणी तेलतुंबडे यांचे बोलणे ऐकले असेल तो हे समजू शकतो की ते वास्तविक कोणत्याही सिद्धांताबद्दलच्या ड्यूईयन संशयवादाची आणि पद्धतीच्या बाबतीतील अंधश्रद्धेची प्रशंसा करीत होते, जी त्यांच्यानुसार ‘‘स्वदोष निर्धारक’’ (सेल्फ करेक्टिव्ह) असते. आपल्या दुसऱ्या वक्तव्यात तेलतुंबडे ड्युईयन व्यवहारवादाबद्दलची आपली प्रशंसा मागे घेतात व हे मान्य करतात की तो अमेरिकन उदारवादाचा एक प्रमुख स्तंभ आहे. आता तेलतुंबडे असे म्हणत आहेत की त्यांनी अप्रोच पेपरच्या केवळ त्या एका पॅरेग्राफवरच लक्ष केंद्रित केले होते ज्यात त्यांचे विचार तथाकथित विकृत रूपात मांडलेले होते. परंतु आपल्या पहिल्या वक्तव्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की त्यांनी संपूर्ण पेपर, कष्टपूर्वक का होईना, वाचला होता व त्यास ब्राह्मण्यवादाचा दर्प येत होता. व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला दिसून येईल की दुसऱ्या वक्तव्यात, पेपरमधील बहुतांश गोष्टींशी आपण सहमत असल्याचे (ज्यास पहिल्या वक्तव्यात त्यांना ब्राह्मण्यवादाचा दर्प येत होता!) व ते केवळ एका पॅरेग्राफसंबंधी आपले मत मांडत असल्याचे सांगतात. महाशय, हे घूमजाव नाही का? ही बौद्धिक बेईमानी नाही का?

बौद्धिक बेईमानीचे आणखी एक उदाहरण

, , ६ आणि ७ या चारही परिच्छेदांमध्ये तेलतुंबडे आमचे अज्ञान उघडे पाडण्याचा विडा उचलतात! कसे ते पाहू. ते हे दाखविण्यासाठी आमच्या पेपरमधील उद्धरणे सादर करतात की आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवादाचा समन्वय करण्याचा आरोप आम्ही त्यांच्या माथी मारलेला आहे जो  वास्तवात निराधार आहे. कारण त्यांनी कधीच ‘समन्वय’ शब्दाचा प्रयोग केलेला नाही. पहिली गोष्ट म्हणजे, या प्रसंगी तेलतुंबडे निष्कपट आणि न्यायप्रिय वाटत नाहीत कारण त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांदा पाहिला आहे (त्यांच्या लेखावरून हे स्पष्टपणे दिसते आहे), व आम्ही त्यांच्या या तर्काचे उत्तर परिषदेतच दिलेले होते. तेथे मी माझ्या पहिल्या वक्तव्यातच म्हटले होते की तुम्ही स्वत:ला काय मानता याला विशेष महत्त्व नाही. वस्तूंच्या नामकरणाची प्रक्रिया नेहमी बाह्य स्वरूपाची असते, म्हणजेच नामकरण नेहमीच इतरांकरवी केले जाते, तुम्ही स्वत:ला काय म्हणवता त्याला विशेष महत्त्व नाही. इतर लोक आपल्याला नाव प्रदान करतात, आपण स्वत: नाही. मी पहिल्या वक्तव्यात हा तर्क समोर ठेवला की जेव्हा तुम्ही असे म्हणता की ‘जातीचे उच्चाटन’चे भारतासाठी तेच महत्त्व आहे जे ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’चे कामगारांसाठी आहे तेव्हा तुम्ही एक मूल्ययुक्त निर्णय (वॅल्यू जजमेंट) देत असता. यावर तेलतुंबडे म्हणाले की असे करताना जाहीरनामा शब्दाचा प्रयोग ते एका सामान्य (जेनेरिक) शब्दाच्या रूपातच करतात व ‘जातीचे उच्चाटन’ला ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’च्या समतुल्य रूपात सादर करण्याचा त्यांचा कोणताच उद्देश नाही. यावर मी उत्तर दिले की जर आपण सामान्य रूपात जाहीरनामाशब्दाचा प्रयोग करत असाल, तरीही हे रूपक चुकीचे आहे व त्याची स्पष्टपणे काही कारणे आहेत. कारण जर आपण सामान्य शब्दाच्या रूपात त्याचा प्रयोग करीत असाल, तर आपण ‘डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मॅन’, किंवा ‘डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ विमेन’ यांसारख्या अन्य ‘जाहीरनाम्यां’चे उदाहरण देऊ शकला असता. परंतु आपण ‘कम्युनिस्ट जाहीरनाम्या’चीच निवड केलीत! माझा तर्क आहे की हे एकूणच रूपकीकरण मूल्ययुक्त आहे, जाणीवपूर्वक केलेले आहे, निरुद्देश़्य नाही, व तेलतुंबेडेंचे कथन संदर्भासह वाचणारा कोणीही हे सहजच समजू शकतो की ‘जाहीरनामा’ शब्दाचा प्रयोग ते सामान्य रूपात करीत नाहीत, तर ते ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’चे महत्त्व ‘कम्युनिस्ट जाहीरनाम्या’च्या समतुल्य दर्शवत आहेत, आणि त्यावर मी योग्य आक्षेप घेतलेला आहे, असे मला वाटते. तेलतुंबडेंचा खुलासा (की त्यांनी ‘जाहीरनामा’ शब्दाचा प्रयोग एका सामान्य शब्दाच्या रूपात केला होता) एक पंगु आणि लाचार बहाण्याहून अधिक काहीच नाही. म्हणूनच आपल्या दुसऱ्या वक्तव्यात त्यांनी त्यांच्या या तुलनेच्या आम्ही केलेल्या चिकित्सेबद्दल चकार शब्द काढला नाही. शिवाय, तेलतुंबडे या ठिकाणी, त्यांनी मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवादाचे मिश्रण किंवा समन्वयाची गोष्ट कधी केलीच नाही किंवा त्याला अवांछित मानले आहे, असे सांगताना असत्याचा आधार घेत आहेत. १९९७ साली त्यांनी पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात एक प्रबंध सादर केला होता – ‘आंबेडकर इन अ‍ॅण्ड फॉर दि पोस्ट आंबेडकर दलित मूव्हमेंट’. यात दलित पँथर्सची चर्चा करताना ते लिहितात, ‘‘जातिवादाचा प्रभाव, जो दलित अनुभवासोबत अंतर्भूत आहे, अनिवार्यपणे आंबेडकरांना घेऊन येतो, कारण त्यांचा फ्रेमवर्क हा असा एकमेव फ्रेमवर्क होता ज्यात याची जाणीव होती. परंतु वंचनांच्या अन्य समकालीन समस्यांसाठी मार्क्‍सवाद क्रांतिकारी परिवर्तनाचा एक वैज्ञानिक फ्रेमवर्क सादर करीत होता. दलित व गैर दलितांमधील वंचित लोक एका पायाभूत बदलाची आकांक्षा बाळगत होते, मात्र यांतील पहिल्यांनी सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या त्या पद्धतीचे अनुसरण केले जी आंबेडकरीय दिसत होती, तर दुसऱ्यांनी मार्क्‍सीय म्हणविली जाणारी पद्धत स्वीकारली जी प्रत्येक सामाजिक प्रक्रियेला केवळ भौतिक यथार्थाचे प्रतिबिंब मानीत होती. या दोघांनीही चुकीच्या व्याख्यांना जन्म दिला. या दोन्ही विचारधारांच्या मिश्रणाचा देशातील पहिला प्रयत्न करण्याचे श्रेय पँथर्सना जाते, परंतु दुर्दैवाने या दोन्ही विचारधारांना अस्पष्ट प्रभावांपासून मुक्त करण्याचे प्रयत्न व त्यांतील अविसंवादी (नॉन काँट्रॅडिक्टरी) सारतत्त्वावर जोर देण्याच्या प्रयत्नांच्या अनुपस्थितीमुळे हा प्रयत्न मध्येच अवरुद्ध झाला. या दोन्ही विचारधारांना समेकित करण्याचा ना कोणताही सैद्धांतिक प्रयत्न झाला, ना जातीच्या सामाजिक पैलूंना ग्रामीण परिवेशात भूमीच्या प्रश्नाशी जोडण्याचा कोणताही व्यावहारिक प्रयत्न केला गेला.’’ आता वाचकांनीच सांगावे की तेलतुंबडे जो दावा करीत आहेत त्याला खोटेपणाच्या श्रेणीत ठेवले जाऊ नये का? या ठिकाणी ‘आंबेडकरीय’ आणि ‘मार्क्‍सीय’ म्हणजेच ‘आंबेडकरवाद’ आणि ‘मार्क्‍सवाद’ या अर्थांत ‘दोन विचारधारां’’च्या अर्थाने त्यांचा प्रयोग झालेला नाही का? मग आपण आंबेडकरवाद असा शब्दप्रयोग कधी केलाच नाही, कारण तशी कोणतीही विचारधारा आहे असे आपण मानीत नाही, असा निराधार आणि खोटा दावा ते करतात तो कशासाठी? या ठिकाणी ते आंबेडकरांची विचारधारा आणि मार्क्‍सची विचारधारा आणि त्यांच्या मिश्रणाच्या आवश्यकतेविषयी बोलत नाहीत का? तेलतुंबडेंसारख्या लोकपक्षधर बुद्धिजीवीने बौद्धिक नैतिकतेचे पालन केले पाहिजे आणि अशा प्रकारे शुद्ध खोटारडेपणा करू नये, असा सल्ला आम्ही त्यांना देऊ इच्छितो.

याशिवाय ते आमच्यावर जातीय विभाजनाला उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या अन्य श्रम विभाजनांच्या (जसे मानसिक श्रम व शारीरिक श्रम, कुशल व अकुशल आदी आणि ब्रिटिश आणि आयरिश कामगार, अश्वेत आणि श्वेत कामगार) बरोबर ठेवण्याचा आरोप करतात. उलट, जर आपण आमचा अप्रोच पेपर वाचला तर आपल्या लक्षात येईल की आम्ही असे म्हटले आहे, प्रत्येक ठिकाणी श्रमाचे विभाजन कोणत्या ना कोणत्या पद्धतीने श्रमिकांच्या विभाजनाला जन्म देते व आंबेडकरांचा हा दावा चुकीचा होता की जाती श्रमाचे विभाजन नाही तर श्रमिकांचे विभाजन आहे. अलीकडच्या इतिहास लेखनाने  व पुराव्यांनी हे निर्विवादपणे दाखवून दिले आहे की वर्ण/जाती व्यवस्थेचा (जातिव्यवस्था अथवा वर्ण व्यवस्थाऐवजी ही संज्ञा अधिक उपयुक्त असल्याचे  सुवीरा जैस्वाल सांगतात) उद्गम श्रम विभाजनात आहे जे कर्मकांडीय रूपात अश्मिभूत झाले आणि श्रमिकांच्या जड विभाजनात परिवर्तित झाले. अन्य ठिकाणीदेखील श्रमांच्या विभाजनाने श्रमिकांच्या विभाजनाला जन्म दिला  परंतु अन्य ठिकाणी कर्मकांडीय रूपात अश्मिभूत न झाल्याकारणाने त्याने जन्माच्या आधारावर निर्धारित होणाऱ्या श्रमिकांच्या जड विभाजनाचे रूप धारण केले नाही. म्हणूनच अश्वेत-श्वेत, ब्रिटिश-आयरिश श्रमिकांचे विभाजन जातिव्यवस्थेसारखे जड नाही. आम्ही ही बाब सेमिनारदरम्यान आमच्या अप्रोच पेपरमध्ये जातीव्यवस्थेच्या इतिहास लेखनाची चर्चा करताना व त्याचबरोबर जातीच्या इतिहास लेखनावरील मी प्रस्तुत केलेल्या स्वतंत्र पेपरमध्ये स्पष्ट केली होती. परंतु श्रीमान तेलतुंबडे यांनी आपले म्हणणे खरे ठरविण्यासाठी आम्हांला संदर्भांपासून वेगळे करून उद्धृत केले आहे व त्याचा आरोप आश्चर्यकाररित्या ते आमच्यावर करीत आहेत!

श्रीमान तेलतुंबडे आम्हांला सर्व गैर-मार्क्‍सवादी जातीविरोधी धारांना कचराकुंडीत फेकण्याचे दोषी मानतात. परंतु आम्ही आमच्या पेपरमध्ये व आमच्या वक्तव्यांमधून हे स्पष्ट केले आहे की प्रश्न कुणालाच नाकारण्याचा अथवा पूर्णपणे स्वीकारण्याचा नाही. खरा प्रश्न आहे जातीच्या आंदोलनात आंबेडकर व अन्य धारांपासून काय शिकता येईल व त्यांतील कोणत्या गोष्टींची आलोचना व्हावयास हवी. श्रीमान तेलतुंबडे यांनी नेहमीप्रमाणे या प्रश्नाला बगल दिली आहे. आम्ही आमच्या अप्रोच पेपरमध्ये म्हटले आहे की दलित अस्मिता आणि प्रतिष्ठा स्थापित करण्यात आंबेडकरांचे योगदान मान्य केले पाहिजे. परंतु दलित मुक्तीच्या त्यांच्या कार्यक्रमातून आपण काहीच स्वीकारू शकत नाही, ना राजकीय कार्यक्रम ना सामाजिक किंवा आर्थिक कार्यक्रम, व श्रीमान तेलतुंबडे याच्याशी सहमत आहेत. तर मग आपण शेवटी या विचारात पडतो की त्यांना आक्षेप आहे कशाबद्दल! कारण आम्ही संमेलनात प्रस्तुत केलेल्या सर्वच पत्रांमध्ये ज्या गोष्टींची आम्ही आलोचना करीत आहोत त्यांना विशेषत्वाने अधोरेखित केले आहे.  प्रत्येक मुद्द्यावर व्यवस्थित प्रतिआलोचना सादर करण्याऐवजी श्रीमान तेलतुंबडे यांनी हा सोयीचा मार्ग निवडला आहे- गोलगोल पद्धतीने आमच्यावर आरोप करायचे, म्हणजेच हे की जाती आंदोलनातील अन्य सर्व धारांबद्दल आम्ही एक ‘रिजेक्शनिस्ट’ किंवा नाकारण्याची भूमिका घेतलेली आहे. आम्ही वारंवार सांगत आहोत की आम्ही कोणतीच गोष्ट नाकारत नाही उलट आम्ही प्रत्येक गोष्टीशी एक आलोचनात्मक नाते बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अर्थात आम्ही हे निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहोत की आंबेडकरांकडून काय शिकता येऊ शकते आणि आंबेडकरांच्या कोणत्या पैलूची आलोचना केली पाहिजे. मुद्देसूद तर्क करण्याऐवजी श्रीमान तेलतुंबडे आमच्यावर एक संक्षिप्त अभियोग (समरी ट्रायल) चालवितात आणि त्यावर आपला निवाडा देतात. मग यालाच एक खुली चर्चा आणि निष्पक्ष वादविवाद म्हणतात का श्रीमान तेलतुंबडे?

८. आठव्या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे ‘कम्युनिस्ट घोषणापत्र’ आणि ‘जातीचे उच्चाटन’च्या तुलनेचा प्रश्न उपस्थित करतात ज्याबद्दल आम्ही वर आमची भमिका मांडलेली आहे. येथे ते एक मजेदार गोष्ट सांगतात जिच्याकडे आम्ही वाचकांचे लक्ष वेधले पाहिजे. ते म्हणतात की ते ‘‘विचारधारांच्या पदानक्रमा’’च्या विरोधात आहेत व त्यांच्यानुसार ही ‘‘ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती’’ आहे. तर मग आपल्याला येथे मिळते काय? श्रीमान तेलतुंबडेंच्या मते विचराधारांचा पदानुक्रम लावू नये, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर त्यांना समान पातळीवर ठेवले पाहिजे! पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सिद्धांतांचा पदानुक्रम ठरवीत नाही की अमुक सिद्धांत सगळ्यात जास्त बरोबर आहे, अमुकचा क्रमांक त्याच्यापेक्षा कमी आहे व त्यानंतर तमुक सिद्धांताचा क्रमांक येतो! ते आमच्या अप्रोच पेपरमधून एक वाक्यसुद्धा देऊ शकत नाहीत जेथे आम्ही दर्शनांना पदानुक्रमित केले आहे. आम्ही केवळ आंबेडकरांच्या राजकारणाची आणि दर्शनाची एका मार्क्‍सवादी दृष्टिकोनातून आलोचना केली आहे. श्रीमान तेलतुंबडे येथे आपल्या ड्यूईयन व्यवहारवादाच्या शिखरावर आहेत कारण ते केवळ दोनच अवस्थांची कल्पना करू शकतात: एक दर्शनांना पदानुक्रमित करण्याची व दुसरी त्यांना पदानुक्रमित न करता एका समान पातळीवर ठेवण्याची. तर मग तेलतुंबडे स्वत: कोठे उभे आहेत? श्रीमान तेलतुंबडेंची विचारधारात्मक व राजकीय पद्धत काय आहे? मार्क्‍सवादी? आंबेडकरवादी? की आणखी काही? श्रीमान तेलतुंबडेंच्या याच पैलूची आम्ही संमेलनात आलोचना केली होती. पद्धतीबद्दल ही अंधभक्ती, ड्यूईचे शब्द उधार घ्यायचे झाले तर ठोस विज्ञानाच्या पद्धतीबद्दल! व नंतर सर्वच सिद्धांतांची व सर्वच दर्शनांची सिद्धांतमुक्त दर्शनमुक्त पद्धतीच्या आधारे परीक्षा! श्रीमान तेलतुंबडे विज्ञानाची हा मूलभूत मंत्र विसरतात: तुम्ही सिद्धांतांपासून पळू शकत नाही, अगदी सर्वच सिद्धांतांपासून मुक्त होण्याची गोष्ट जे करतात तेदेखील एक सिद्धांत समोर ठेवत असतात. नैसर्गिक (ठोस) विज्ञानामध्येदेखील आपल्या एका ए प्रॉयरी सैद्धांतिक भूमिकेची गरज असते, नाव घेऊन सांगायचे झाले तर द्वंद्वात्मक अप्रोच, नाहीतर नियतत्त्ववाद किंवा अज्ञेयवादाच्या खड्ड्यात पडण्याचा नेहमीच धोका असतो कारण कोणत्याही दिलेल्या वेळी विज्ञान सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. कोपेनहेगन स्‍कूल (हाइजेबर्ग आणि बोर) आणि  आर्इंस्टीन- श्रोडिंगर यांच्यामधील चर्चेची हीच शोकांतिक होती, विज्ञानाबद्दल अंधभक्ती नेहमीच नियतत्त्ववाद किंवा अज्ञेयवादाच्या समान पर्यायांच्या फसव्या डिंस्जंक्टिव सिंथेसिस’ (फसव्या पर्यायांचा समुच्चय) च्या दिशेने घेऊन जाते. श्रीमान तेलतुंबडे यांनी आपल्या या लेखामध्ये त्यांच्या आत दडलेल्या छुप्या ड्यूईवादाची आम्ही केलेल्या आलोचनेला खरे तर न्याय्य ठरविण्याचेच काम केले आहे. बहुधा श्रीमान तेलतुंबडे ‘‘या जाहीरनाम्यांच्या सत्यासत्यते’’बद्दल चिंता करीत नाहीत. मुळात ही कल्पनाच एक पर-सैद्धांतिक (ट्रान्स थिअरोटिकल) आणि पर-ऐतिहासिक (ट्रान्स हिस्टोरिकल) अति पद्धतीची (सुपर मेथड) वैधता आपल्या आत दडवून आहे, जसे कोणीही पाहू शकतो. आम्ही आमच्यातर्फे एवढेच म्हणू शकतो की प्रत्येकाची एक भूमिका असते, त्याच्या इच्छेहून स्वतंत्र, आणि कोणाचीही आलोचना किंवा प्रशंसा आपल्या त्या भूमिकेतून केली जात असते. आम्ही आंबेडकरांच्या सिद्धांताची आणि दर्शनाची आलोचना एका मार्क्‍सवादी भूमिकेतून केली आहे कारण आम्ही असे मानतो की सिद्धांताच्या पलीकडे कोणत्याही परम वैज्ञानिक पद्धतीच्या अनुरूप कोणत्याही भूमिकेचा दावा करणे म्हणजे एक भंपक दावा आहे. श्रीमान तेलतुंबडे यांनी आपली विचारधारात्मक भूमिका स्पष्ट शब्दात समोर ठेवली पाहिजे कारण या संदर्भात कोणतीही अस्पष्टता अत्यंत धक्कादायक परिणामांपर्यत घेऊन जाते, जसे या प्रकरणात आतापर्यंत आम्ही पाहतो आहोत.

९. नवव्या पॅरेग्राफमध्ये आंबेडकरवादी आलोचकांची आलोचना करताना श्रीमान तेलतुंबडे यांनी ड्यूईयन विचारास मार्क्‍सवाद आणि विज्ञानासाठी आणखी स्वीकारार्ह आणि सुसह्य (टोलरेबल) बनविण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमान तेलतुंबडे विचार करतात त्याप्रमाणे ड्यूईयन विचार कधीच कोणताही सिद्धांत पुष्ठ करण्याचा हेतू बाळगत नाही. तो जाणतेपणी सिद्धांतविरोधी आहे. (तेलतुंबडे महाशय जसे स्वत:ला सर्व ‘वादां’च्या पलीकडे आणि वर घोषित करतात अगदी त्याचप्रमाणे!) ड्यूई आयुष्यभर प्रत्येक सिद्धांताबद्दल संशयवादी राहिले. त्यांच्यासाठी जी बाब महत्त्वाची होती ती होती ‘‘ठोस (हार्ड) विज्ञाना’’ची शुद्ध आणि आज्ञ पद्धती, तथाकथित सामाजिक विज्ञाने सिद्धांतांना जन्म देतात, त्यांना शून्यातून निर्माण करतात आणि म्हणूनच ड्यूई यांच्या मनात सामाजिक विज्ञानांबद्दल केवळ घृणा भरलेली आहे. परंतु हा एक वेगळा मुद्दा आहे की ड्यूई स्वत: एका सिद्धांताचे अनुसरण करीत होते, व्यवहारवाद आणि इंस्ट्रूमेंटलिझमचा सिद्धांत जो प्रत्येक गोष्टीचे जैविकीकरण करतो. उदाहरणासाठी ड्यूई यांच्या अनुसार प्रत्येक जैविक रचना एका संदर्भात राहते आणि तिला आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी सतत आपल्याला अनुकूलित आणि पुन: अनुकूलित करावे लागते. ड्यूई यांच्या अनुसार निसर्गात होणाऱ्या विकासाच्या प्रक्रियेत विच्छेद किंवा क्रमभंग नसतात, हा एक सततचा आरोह अवरोह किंवा क्रमिक विकास (स्मूथ प्रोग्रेशन) असतो ज्यामध्ये जीव आपल्याला आपल्या संदर्भानुसार अनुकूलित व पुन: अनुकूलित करीत राहतो. याच प्रकारे ड्यूई यांच्यानुसार समाजातही विकासाच्या प्रतिरूपांमध्ये विच्छेदन किंवा असतता (क्रांती किंवा विद्रोह) येता कामा नयेत, लोकांना आपल्या बौद्धिकतेचा सुयोग्य प्रयोग केला पाहिजे. राज्य या बौद्धिकतेच्या आणि तर्काच्या सुयोग्य प्रयोगाच्या सर्वश्रेष्ठ प्रणालीचे प्रतिनिधित्व करते आणि जेथे राज्याच्या प्रणालीत उणेपणआ येतो तेथे एक नैतिक संहितेच्या रूपात धर्म ही उणीव भरून काढत असतो. आंबेडकर याच ड्यूईवादी विचाराला मानीत होते आणि म्हणूनच त्यांनी नेहमीच राज्यसत्तेत बसलेल्या लोकांशी समझोता करण्याची रणनीती अनुसरली कारण परिवर्तन खालून जनतेद्वारे आणले जाऊ शकत नाही, क्रांतिकारी पद्धतीने आणले जाऊ शकत नाही, ते केवळ सर्वाधिक तार्किक अभिकर्ता म्हणजेच राज्यसत्तेद्वारे आणले जाऊ शकते. त्याचबरोबर आंबेडकरांनी हेसुद्धा म्हटले की त्यांना समाजात धर्माची आवश्यकता असल्याचे जाणवते आणि हे पाहून त्यांना दु:ख होते की युवा वर्ग धर्मापासून दूर जात आहे! आंबेडकरांचे हे सारे विचार कोणत्याही बेईमानीतून निर्माण झालेले नव्हते, ते प्रामाणिकपणे ड्यूईवादाच्या क्रमिक विकासाचा, राज्य सर्वाधिक तार्किक अभिकर्ता असण्याचा आणि धर्माच्या अनिवार्यतेचा सिद्धांत मानीत होते. ड्यूई यांच्या प्रमाणेच आंबेडकर मानीत होते की हिंसा व्यर्थ आहे आणि म्हणूनच प्रत्येक परिवर्तन राज्य आणि धर्माद्वारे येणाऱ्या सुधारांच्या माध्यमातूनच होऊ शकते. आम्ही येथे ड्यूई यांच्या विस्तृत आलोचनेत जाऊ शकत नाही. परंतु असे जाणवते आहे की एक तर श्रीमान तेलतुंबडे यांना ड्यूई यांच्या रचनांचा पुन्हा एकदा गंभीरपणे अभ्यास करण्याची गरज आहे किंवा ड्यूई यांना अधिक स्वीकारार्ह बनविण्यासाठी ते त्यांचे चुकीच्या पद्धतीने गैर-विनियोग (मिसअ‍ॅप्रोप्रिएशन) करीत आहेत. आम्ही तेलतुंबडे यांच्या या तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो की वैज्ञानिक प्रयोगशाळेत हीच पद्धती अनुसरली जाते. ही क्वाँटम सिद्धांताच्या इंस्ट्रूमेंटलिस्ट वैज्ञानिकांची पद्धती आहे जे ‘‘तोंड बंद ठेवा आणि गणना करा’’ची घोषणा देतात. वास्तविक ज्या साईबरनेटिक्सवर श्रीमान तेलतुंबडे एवढे मोहित झाल्याचे दिसून येते त्या साईबरनेटिक्सचीदेखील हीच घोषणा आहे. या विचारसरणींमध्ये आपल्याला कोणत्याही ‘‘सैद्धांतिक पूर्वग्रहा’’शिवाय एका पर सैद्धांतिक, शुद्ध आणि आद्य वैज्ञानिक पद्धतीचे अनुसरण करून परीक्षण आणि गणना करण्यास सांगितले जाते आणि नेमके हेच काम श्रीमान तेलतुंबडेसुद्धा वारंवार आपल्या या लेखामध्ये करीत आहेत. सिद्धांताबद्दल एक शाश्वत आणि अखंड घृणा आणि पद्धतीबद्दल एक असुधारणीय अंधभक्ती. परंतु आता आपण जाणतो की हा मुळातच एक पूर्वग्रह आहे आणि तथाकथित ‘‘कठोर’’ विज्ञानामध्येच आणखी एक स्‍कूलदेखील आहे ज्यामध्ये सकाता, गूल्ड, युकावा, ताकेतानीसारखे वैज्ञानिक येतात आणि जे ए प्रॉयरी द्वंद्ववादी असणे, अगदी प्रयोगशाळेत प्रवेश करण्यापूर्वीच द्वंद्ववादी असणे आवश्यक मानतात. म्हणूनच, ते ना कोणत्याही सिद्धांताच्या विरुद्ध आहेत आणि ना कोणाच्या समर्थनात, हा श्रीमान तेलतुंबडेंचा दावा मुळातच एक अवैज्ञानिक दावा आहे. आपण आपल्या तमाम आशा आणि इच्छांपासून स्वतंत्रपणे नेहमी हेच तर करीत असतो, जसे  आपण एखादे राजकीय वक्तव्य करताना किंवा मूल्य-युक्त निर्णय देताना करतो, अगदी तसेच. सैद्धांतिक उदासिनता किंवा गैर-पक्षधरता एक मिथक आहे.

याशिवाय, आम्ही असे कधीच म्हणालो नाही की श्रीमान तेलतुंबडे यांनी मार्क्‍सला कचरापेटीत फेकले किंवा त्यांच्या असफलतांची चर्चा केली. तसे तर श्रीमान तेलतुंबडे यांच्या त्या स्वनामधन्य शुभचिंतकांनी, म्हणजेच रिपब्लिकन पँथर्सच्या त्या पाच कॉम्रेडांनी केले, जे संमेलनात हजर तर होते परंतु ज्यांनी संमेलनादरम्यान एकदासुद्धा आपले तोंड उघडले नाही, परंतु त्यानंतर लगेचच आमच्या विरोधात आणि श्रीमान तेलतुंबडे यांच्या कल्पित समर्थनात आपले वक्तव्य जारी केले! याशिवाय आम्ही हेदेखील जाणून घेण्यास उत्सुक आहोत की श्रीमान तेलतुंबडे नेहमीच शिक्षक-उपदेशकाच्या भूमिकेतच का असतात? कोणत्या ना कोणत्य प्रकारच्या वादाचे विष ज्यांच्या अंगात भिनले आहे अशा संमेलनातील लोकांना संवेदनशील बनविण्याचा आपण प्रयत्न करीत होतो, असे ते सांगतात! पुन्हा एकदा श्रीमान तेलतुंबडे आपल्या ड्यूईयन शिखरावर आहेत. ते स्वत:ला आंबेडकरवादी किंवा मार्क्‍सवादी किंवा कोणत्याही अन्य प्रकारचा वादी मानणे कटाक्षाने टाळतात. ते एका पर सैद्धांतिक पद्धतिशास्त्रीय स्थितीत आहेत किंवा अशा एका आसनावर विराजमान आहेत जेथून त्यांनी आम्हांला संवेदनशील बनवायचे आहे आणि आम्हांला त्यांची प्रवचने ऐकायची होती! श्रीमान तेलतुंबडेंचा हा व्यवहार म्हणजे आत्ममुग्धता नाही का? आम्हीसुद्धा जाणतो आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी आम्हांला ‘महान-शिक्षक’ श्रीमान तेलतुंबडेंची गरज नाही की क्रांत्या वास्तवात होत असतात, आपल्या पेपरमध्ये किंवा आपल्या वक्तव्यांमध्ये आम्ही मार्क्‍सवादाबद्दल कोणतीही बंदिस्त किंवा कर्मठ भूमिका घेतलेली नाही. एवढेच नाही तर श्रीमान तेलतुंबडे यांनीदेखील आपल्या दुसऱ्या वक्तव्यात आपली चूक दुरूस्त केली आणि म्हणाले की त्यांनी आम्हांला कर्मठ म्हटलेले नव्हते (वास्तवात त्यांनी असे म्हटले होते!) आणि त्यांचा निर्देश अप्रोच पेपरमधील केवळ त्या पॅरेग्राफकडे होता ज्याच्यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आलेला होता (हेसुद्धा खोटे आहे! त्यांनी संपूर्ण पेपर ब्राह्मण्यवादी असल्याचे म्हटले होते, परंतु दुसऱ्या वक्तव्यात त्यांनी कोलांटी मारली. वाचकांनी व्हिडिओ पाहावा). परंतु तुम्ही जर श्रीमान तेलतुंबडे यांचे पहिले वक्तव्य नीट ऐकले तर लगेच समजून जाल की ते केवळ एका पॅरेग्राफवर टिप्पणी करीत नव्हते तर सरसकट संपूर्ण पेपरविषयी आपले मत व्यक्त करीत होते आणि तेदेखील पेपर नीट न वाचता! याला आम्ही कोलांटी मारणे किंवा पलटी मारणे म्हणू नये तर काय म्हणावे?

१०. दहाव्या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे म्हणतात की मार्क्‍सवादाबद्दल आंबेडकरांचा अविश्वास या गोष्टीतून निर्माण झालेला होता की मार्क्‍स एक ‘ग्रँड-थिअरी’ देण्याचा दावा करतात. (मार्क्‍सवादावर ही बाब उत्तर आधुनिकतावाद्यांद्वारे लादली गेली आहे. मार्क्‍सने स्वत: कधीच असे म्हटले नाही की ते एका ‘ग्रँड-थिअरी’चे रचनाकार आहेत. आम्ही या मुद्द्यावर पुढे बोलू) वास्तविक संमेलनात त्यांनी स्वत: ही गोष्ट मान्य केली होती की आंबेडकरांनी मार्क्‍सवादाचे सुयोग्य अध्ययन केलेले नव्हते आणि जी पुस्तके त्यांनी वाचलेली होती त्यांवरून लक्षात येते की त्यांची मार्क्‍सवादाची समज अत्यंत उथळ होती आणि त्यांनी मार्क्‍सवादी क्लासिकल रचना वाचलेल्या नव्हत्या. आंबेडकरांच्या मार्क्‍सवादाबद्दलच्या संशयाचा त्यांच्या ग्रँड थिअरीजबद्दलच्या नावडीशी काहीच संबंध नव्हता.  (मार्क्‍सने कधीच असा दावा केलेला नाही, त्यांनी केवळ असा दावा केला की एंगेल्ससोबत त्यांनी इतिहास आणि समाजाच्या द्वंद्वात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवादी विज्ञानाची रचना केली) आंबेडकरांचा मार्क्‍सवादाबद्दलचा संशय दोन कारणांमुळे निर्माण झालेला होता. पहिले, त्यांची स्वत:ची वर्ग भूमिका आणि दुसरेत्यांची अमेरिकेतील अ‍ॅकॅडमिक ट्रेनिंग, जेथे ते ड्यूईयन इन्सट्रूमेंटलिस्ट आणि व्यवहारवादी बनले आणि लंडन स्‍कूल ऑफ इकॉनॉमिक्स जेथे ते कार्ल मेंगर यांच्या ऑस्ट्रियन स्‍कूल ऑफ इकॉनॉमिक्सने प्रभावित झाले. लक्षपूर्वक वाचन केल्यास लक्षात येते की आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावर फेबियनवाद्यांच्या काल्पनिक राजकीय समाजवादाचा कमी आणि नवउदारवादी आर्थिक सिद्धांतांचा जास्त प्रभाव होता. हे बौद्धिक स्रोत मार्क्‍सवादाचे कटू आलोचक होते. आंबेडकरांनी मार्क्‍सवादाच्या नेमकी विपरित भूमिका घेण्यासाठी एवढे पुरेसे होते. त्यांनी जेव्हा जेव्हा कम्युनिस्टांसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे प्रेरक तत्त्व कामगार वर्गाचे राजकारण हे नव्हते तर तोच जुना ड्यूईयन व्यवहारवाद होता. दुसरे, दहाव्या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे यांनी दिलेल्या आंबेडकरांच्या राजकीय इतिहासाच्या माहितीवरूनच आंबेडकरांचा तडजोडीचा, गैर-आमूलगामी, गैर-जनदिशावादी आणि आत्म-समर्पणवादी अप्रोच दिसून येतो. आम्ही त्यासाठी तेलतुंबडे यांचे लेखन पुनर्निर्मित करण्याची गरज नाही कारण ते स्वदृष्टव्य (सेल्फ एव्हिडेंट) आहे. श्रीमान तेलतुंबडे यांच्या आख्यानातून एक बाब स्पष्ट आहे की काँग्रेस नेहमीच आंबेडकरांना आपल्या राजकीय कार्यक्रमात सहयोजित करण्याच्या तयारीत असायची. या तथ्यावरून आंबेडकरांच्या राजकारणाच्या बाबतीत बरेच काही स्पष्ट होत नाही का? जिला प्रत्यक्षात समाजवादाशी काहीच देणेघेणे नाही अशा आंबेडकरांच्या तथाकथित राजकीय समाजवादाच्या योजनेने श्रीमान तेलतुंबडे अगदी थक्क झाल्याचे दिसते! समाजवादाचा अर्थ उत्पादनांच्या साधनांवर राज्याची मालकी हा नसतो. राज्याचे वर्गचारित्र्य हे समाजवादाचे निर्धारक चारित्रिक वैशिष्ट्य असते.. एंगेल्स यांनी १९ व्या शतकातच सांगितल्याप्रमाणे राजकीय भांडवलशाही (त्याला राजकीय समाजवादही म्हणता येईल) दुसरे तिसरे काहीच नसून सीमांतापर्यंत ताणलेली भांडवलशाही असते. आम्ही श्रीमान तेलतुंबडे यांच्याकडून ही अपेक्षा करतो की ते या तथ्याशी तरी नक्कीच सुपरिचित असतील कारण त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ते ‘एक वरिष्ठ कार्यकर्ते’ आहेत आणि ‘मार्क्‍सवाद्यांना संवेदनशील बनविण्यासाठी’ ते आले होते! आंबेडकरांचा आर्थिक कार्यक्रम म्हणजे ड्यूईयन आर्थिक कार्यक्रमाचा भावानुवाद आहे ज्याच्यानुसार राज्य सर्वाधिक तार्किक अभिकर्ता आहे आणि म्हणूनच सर्व आर्थिक गतिविधी आणि योजनांवर त्याचा एकाधिकार असला पाहिजे. याच्यात फेबियनसुद्धा काहीच नाही, उलट यात किन्सचे कल्याणकारी अर्थशास्त्र आणि नवउदारवादाचे एक मिश्रण अधिक आहे. वास्तविक तेलतुंबडे आंबेडकरांचे मार्क्‍सवादी हस्तगतीकरण करण्यास फार उत्सुक असल्याचे दिसून येते व ते असे करतातदेखील, परंतु अत्यंत गुप्तपणे, असा दावा करीत की आंबेडकरांचे विचार आणि मार्क्‍सवाद यांच्यामध्ये कोणताच मिलनबिंदू नाही.

११. श्रीमान तेलतुंबडेंच्या लेखातील अकरावा पॅरेग्राफ बहुधा सर्वाधिक रोचक आहे. येथे असा दावा करण्यात आला आहे की श्रीमान तेलतुंबडे मार्क्‍सवादी पद्धतीचे अनुसरण करतात. (लक्ष द्या, मार्क्‍सवादी सिद्धांत/विचारधारा/दर्शन नाही! सिद्धांताबद्दल तोच जुना ड्यूईयन संशयवाद आणि पद्धतीबद्दल अंधभक्ती!) परंतु ते स्वत:ला मार्क्‍सवादी म्हणवून घेणार नाहीत कारण अन्य बरेच मार्क्‍सवादी कर्मठ आहेत! परंतु त्यांच्या या भूमिकेची मी संमेलनात काय आलोचना प्रस्तुत केली होती त्याचा उल्लेख ते करीत नाहीत. एखादी व्यक्ती स्वत:ला मार्क्‍सवादी किंवा उदारवादी किंवा उत्तर  संरचनावादी मानते ती या विचारधारा मानणारे काय करतात त्यावरून नाही! हे तर्कशास्त्र आपल्याला मूर्खतापूर्ण निष्कर्षांप्रत घेऊन जाते. एखादी व्यक्ती स्वतःला मार्क्‍सवादी मानते कारण ज्या अप्रोच व पद्धतीला ती मार्क्‍सवादी मानते तिच्यावर त्या व्यक्तीचा विश्वास असतो. जर बहुतेक माणसे दु:ख, यातना, वेदना यांच्याबद्दल उदासीन होऊन माणूस म्हणवून घेण्याच्या अटींपासून वंचित झाली तर काय तुम्ही स्वत:ला माणूस म्हणवून घेणे बंद करणार आहात? नाही! मग जर तुमचा मार्क्‍सवादावर विश्वास असेल तर तुम्ही स्वतःला मार्क्‍सवादी कां म्हणवून घेत नाही? वास्तविक या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अगोदरच माहीत आहे! येथे पुन्हा तीच बाब समोर येते, आपल्याला कोणत्याही सिद्धांत किंवा विचारधारेसोबत एकरूप करणे नेहमीच एखाद्या ड्यूईयनला भयभीत करीत असते! दुसरी गोष्ट, आम्ही पेपरमध्ये कुठेच म्हटलेले नाही की मार्क्‍सवाद एक जडसूत्र आहे आणि ते पुढे विकसित होऊ शकत नाही. याउलट, आम्ही आमच्या पेपरच्या मोठ्या भागात आंबेडकर आणि आंबेडकरवाद्यांच्या आलोचनेऐवजी जातीची समस्या समजून घेण्यास व मार्क्‍सवादाला भारतीय परिस्थितीत रचनात्मक पद्धतीने लागू करण्यास असफल ठरलेल्या भारतीय कम्युनिस्ट आंदोलनाची आलोचना प्रस्तुत केलेली आहे. परंतु हे स्पष्टच आहे की आमचा पेपर चांगल्या प्रकारे न वाचताच श्रीमान तेलतुंबेड यांनी आमच्यावर हल्ला सुरू केला आहे.

याशिवाय आंबेडकरांची मूर्तिभंजकता, आमूलगामिता इत्यादी हे श्रीमान तेलतुंबडे यांचे व्यक्तिगत विचार असू शकतात आणि या मुद्द्यांवर आम्ही त्यांच्याशी सहमत किंवा असहमत असू शकतो. परंतु अप्रोच पेपर आणि एकूण सेमिनारमध्ये आमच्या चिंतेचा केंद्रबिंदू आंबेडकर जातिसमस्येवर किती सखोलता आणि उत्‍कंठेसह विचार करीत होते याचे विश्लेषण करणे हा नव्हता तर  आंबेडकरांचा कार्यक्रम या समस्येवर कुठवर उपाय सुचवू शकतो हा होता आणि अप्रोच पेपरमध्ये आम्ही प्रस्तुत केलेली आंबेडकरांची आलोचना याच्या संदर्भातच पाहिली आणि समजली गेली पाहिजे.

त्याचबरोबर श्रीमान तेलतुंबडे कोणत्या वयात मार्क्‍सवादी बनले यालादेखील काहीच महत्त्व नाही(!!!) कारण त्यामुळे आज त्यांच्या तर्कांतील गुणदोषांवर काहीच प्रभाव पडत नाही, ना त्यांना त्यामुळे त्यांच्या तर्कामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार आहे. काऊत्स्की लेनिनपेक्षा कितीतरी जास्त वयस्कर मार्क्‍सवादी होते. परंतु आपल्या साम्राज्यवादाच्या सैद्धांतिकिकरणात काउत्स्की कशा प्रकारे अडकले यावर त्यामुळे काही फरक पडला का?

१२. बाराव्या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे हे दाखवून देतात की आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न कसे विफल ठरले आणि यावर ते इथपर्यंत बोलून जातात: ‘‘आंबेडकरांच्या राजकारणाबद्दल जेवढे कमी बोलावे तेवढे बरे.’’ परंतु ते या चुकांचा स्रोत असलेल्या आंबेडकरांच्या असुधारणीय भांडवली उदारवादी, व्यवहारवादी, इंस्ट्रुमेंटलिस्ट, प्रतिगामी विचारांचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न ते करीत नाहीत. आंबेडकरांचा जनतेच्या क्रांतिकारी ऊर्जेवर विश्वास नव्हता तर नायकांची शक्ती आणि प्रामुख्याने राज्याच्या शक्तीवर त्यांच्या विश्वास होता. आंबेडकरांच्या विफलतेची कारणे त्यांचे दर्शन आणि राजकारणात निहित आहेत आणि आम्ही आमच्या पेपरमध्ये याच गोष्टीची आलोचना केलेली आहे, त्यांच्या हेतूची नाही. सैद्धांतिक चर्चा कधीच कोणाच्या हेतूवर केंद्रित नसतात कारण ‘हेतू’ ही अत्यंत मनोगत बाब आहे. कोणत्याही राचकीय चर्चेत जी गोष्ट केंद्रस्थानी असते ती म्हणजे कोणत्याही सिद्धांताचे वैज्ञानिक आणि दार्शनिक चारित्र्य आणि त्याची ऐतिहासिक भूमिका. सिद्धांतांचे वाहक वेगवेगळ्या काळांमध्ये काय अनुभव करतात, इतिहासात याला महत्त्व नाही, जसे की तेलतुंबडे स्वत:च आपल्या पहिल्या वक्तव्यात म्हणतात, ‘‘क्रांत्यांमध्ये व्यक्तीला विशेष महत्त्व नसते’’. श्रीमान तेलतुंबडे यांच्या कोणत्याही वक्तव्यामध्ये आंबेडकरांच्या गंभीर राजकीय आणि दार्शनिक आलोचनेची स्पष्ट अनुपस्थिती चिंतेची बाब आहे. ते केवळ एका तथ्याचा उल्लेख करतात की आंबडेकरांचे सारे प्रयोग महान विफलतेत परिणत झाले. परंतु कधीच असा प्रश्न मात्र विचारत नाहीत – ‘‘कां?’’ श्रीमान तेलतुंबडे येथे आपल्या प्रसिद्ध वैज्ञानिक पद्धतीचा प्रयोग करणे का विसरतात? आपण पाहू शकतो की ही एक रोचक चूक आहे जी त्यांच्या बौद्धिक अप्रामाणिकपणातून निर्माण झाली आहे.

१३, १४, १५, १६ आणि १७ या पॅरेग्राफमध्ये पुन्हा एकदा श्रीमान तेलतुंबडे आपल्या ड्यूईयन आभामंडलात आहेत. ते इतिहासातील सर्वच महान व्यक्तींच्या विफलतेची चर्चा करतात. आम्हांला त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की अप्रोच पेपरचा हेतू व्यक्तींचे आणि त्यांच्या प्रयोगांच्या विफलतेचे मूल्यांकन करणे हा नव्हता. खरा प्रश्न त्या व्यक्तींनी दिलेल्या सिद्धांतांच्या आणि पद्धतिशास्त्राच्या मूल्यांकनाचा होता. व्यक्ती सफल होतात की असफल याला इतिहासात विशेष महत्त्व नसते. मूलभूत प्रश्न हा आहे की मार्क्‍स इतिहासाचे विज्ञान देऊ शकले की नाही? ते असा अप्रोच आणि पद्धति देऊ शकले की नाही जी वैैज्ञानिक आहे? मार्क्‍सवाद म्हणजे मार्क्‍सच्या सर्व कथनांची गोळाबेरीज नाही. मार्क्‍सवाद त्या अप्रोच (विश्व दृष्टिकोन) आणि पद्धतीचे नाव आहे जी मार्क्‍सने प्रस्तुत केली. मार्क्‍स स्वत: आपली ही द्वंद्वात्मक भौतिकवादी पद्धति अनेक ठिकाणी योग्य प्रकारे लागू करण्यात विफल ठरले, जसे आशियाच्या उत्पादन प्रणालीच्या त्यांच्या सिद्धांतात किंवा भारतातील ब्रिटिश शासनाच्या मूल्यांकनामध्ये दिसून येते. परंतु जोपर्यंत मार्क्‍सवादी अप्रोच आणि पद्धतीचा प्रश्न आहे, यामुळे तिच्यावर कोणताच नकारात्मक प्रभाव पडत नाही. इतिहासाने त्यांच्या कित्येक आशा, निर्णय आणि कथने चुकीची सिद्ध केली. याला एका संकिर्ण अर्थाने मार्क्‍स या व्यक्तीच्या पूर्वकल्पित निर्णयांची विफलताच म्हटले जाऊ शकते. परंतु मार्क्‍स आपल्या सर्व निर्णयांमध्ये बरोबर सिद्ध होऊ शकत नव्हते. (अशा अचूकतेची आशा करणे हेच मुळात गैर द्वंद्ववादी होणार नाही का? येथे प्रश्न एखाद्या व्यक्तीची विभिन्न कथने आणि त्या व्यक्तीचा अप्रोच व पद्धति यांमधील अंतर समजून घेण्याचा आहे. मार्क्‍स स्वत: हे मानीत होते की द्वंद्वात्मक भोतिकवाद विश्वासोबत उन्नत होईल कारण या विज्ञानाचे मूलभूत तत्त्व विश्वाचे त्याच्या गतीसोबत अध्ययन करणे हे आहे. म्हणूनच साम्राज्यवादाचा सिद्धांत लेनिन यांनी विकसित केला, मार्क्‍स यांनी नाही कारण वित्तीय एकाधिकारी भांडवलशाही केवळ लेनिन यांच्या जीवनकाळात सुयोग्य रूपात अस्तित्त्वात आलेली होती. परंतु येथे मूलभूत प्रश्न हे समजून घेण्याचा आहे की लेनिन यांनीदेखील विश्वाच्या अध्ययनासाठी त्याच अप्रोच आणि पद्धतीचा प्रयोग केला जी मार्क्‍स यांनी अनुसरली होती. म्हणूनच ‘‘महान व्यक्तींच्या विफलते’’वर एवढ्या विस्तारपूर्वक चर्चा करण्याला आणि नंतर मार्क्‍स यांची विफलता आंबेडकरांच्या विफलतेपेक्षा कितीतरी जास्त विपदाकारी आहे असा दावा करण्याला काहीच अर्थ नाही. हे १७ व्या शतकात लिहिल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या त्या इतिहासासारखे आहे जो कोणत्याही गोष्टीबद्दल काहीच बोलत नाही!

मार्क्‍सवादाला सतत उन्नत करण्याची गरज आहे, हा तर्क श्रीमान तेलतुंबडे आपल्यासमोर अशा प्रकारे ठेवतात जणू काही असे सांगणारे ते पहिले व्यक्ती आहेत किंवा जणू काही आम्ही आमच्या अप्रोच पेपरमध्य वेगळेच काहीतरी म्हटले आहे. आम्ही ना आमच्या पेपरमध्ये ना आमच्या वक्तव्यांमध्ये असे म्हटले आहे की मार्क्‍सचे शब्द म्हणजे अंतिम सत्य आहे. जर आमचा तसा विश्वस असेल तर आम्हांला कोणत्याही प्रश्नावर पाच दिवसीय संमेलन आयोजित करण्याची गरजच भासली नसती. आम्ही आमच्या अप्रोच पेपरमध्ये मार्क्‍सवादी आणि कम्युनिस्टांच्या जातिप्रश्नावरील विश्लेषणातील अनेक चुकांचा उल्लेख केलेला आहे. मग श्रीमान तेलतुंबडे एक मार्क्‍सवादी पुतळा का उभे करीत आहेत व त्यावर बाण आणि संगिनी घेऊन कां तुटून पडत आहेत? वास्तविक, तेलतुंबडे यांच्यापाशी आम्ही केलेल्या त्यांच्या आलोचनेवर कोणतेही ठोस उत्तर नाही, आणि म्हणूनच इकडेतिकडे धावून ते गनिमी आलोचनेचा प्रयत्न करीत आहेत.

याचबरोबर मार्क्‍सवाद असेदेखील कधी म्हणत नाही की क्रांत्या अपरिहार्य असतात. असे म्हणणे म्हणजे एक प्रकारचा अर्थवाद ठरेल. म्हणूनच समाजवादी प्रयोगांच्या विफलतेचा तर्क देऊन किंवा असे म्हणून की क्रांत्या झाल्या नाहीत, ‘‘मार्क्‍सची विद्ध्वंसकारी विफलता’’ सिद्ध करणे पूर्णपणे निरर्थक आहे! भांडवलाची आर्थिक मंदी कधीच आपोआप क्रांतीला जन्म देत नाही. प्रत्येक मंदी दोन शक्यता उपस्थित करते : क्रांतिकारी शक्यता (जर जनतेला नेतृत्त्व देणारी एखादी क्रांतिकारी आघाडी अस्तित्त्वात असेल) किंवा प्रतिक्रियावादी शक्यता (फासीवाद). प्रतिक्रांतीची नेहमीच शक्यता असते आणि सगळेच महान मार्क्‍सवादी विचारवंत, ज्यांमध्ये मार्क्‍स, एंगल्स आणि लेनिन यांचाही समावेश आहे, या बाबतीत जागरुक होते. त्यामुळे हे सत्य की विसाव्या शतकात टिकाऊ क्रांत्या होऊ शकल्या नाहीत कोणत्याही प्रकारे मार्क्‍सच्या तथाकथित ‘‘ग्रँड थिअर’’ची विफलता दाखवून देत नाही. मार्क्‍सवाद क्रांत्यांच्या विफलतेच्या विश्लेषणासाठीदेखील उपकरण देतो आणि कित्येक मार्क्‍सवाद्यांनी सोविएत आणि चिनी समाजवादी प्रयोगांची मार्क्‍सवादी आलोचना सादर केलेली आहे आणि अशा प्रकारच्या विश्लेषणांच्या आधारेच अधिक उन्नत समाजवादी प्रयोग केले जाऊ शकतात. यालाच वॉल्टर बेंजामिन सिद्धांतांची रिडेम्पटिव अ‍ॅक्टिव्हिटी म्हणतात. प्रत्येक विज्ञान अशा प्रकारच्या ‘रिडेम्पटिव्ह अ‍ॅक्टिविटी’द्वारेच विकसित होत असते आणि मार्क्‍सवाद, म्हणजेच समाजाचे विज्ञानदेखील त्याला अपवाद नाही. अशा ऐतिहासिक गतीमध्ये विशिष्ट व्यक्तीची विफलता महत्त्वपूर्ण नसते. महत्त्वाचा असतो त्यांनी दिलेला अप्रोच आणि पद्धति. श्रीमान तेलतुंबडे यांना कोणत्याही ठोस कारणांशिवाय निशाणा बनविणाऱ्या आंबेडकरवाद्यांना मार्क्‍सवाद्यांनी काहीच प्रत्युत्तर दिले नाही, या तेलतुंबडेंच्या आरोपाबद्दल आम्ही एवढेच म्हणू  शकतो की या बाबतीत आम्ही तेलतुंबडे यांचे दु:ख आणि चीड यांच्याशी पूर्ण सहानूभूती बाळगतो. परंतु या विचित्र परिस्थितीसाठी स्वत: श्रीमान तेलतुंबडेच दोषी आहेत. सिद्धांत आणि विचारधारेच्या पलीकडची भूमिका धारण केल्याने असेच होत असते. तेलतुंबडे यांची बौद्धिक सोंगाडेगिरी पाहून लेनिन यांनी बोल्शेविक पार्टीच्या आठव्या काँग्रेसमध्ये निम्न भांडवलदार बुद्धिजीवींसंबंधी काय म्हटले होते त्याची आठवण होते , ‘‘निम्न भांडवली लोकशाहीवाद्यांचे आचरण मुळातच अंतर्विरोधी आहे : त्यांना ठाऊक नाही की कुठे बसायचे आहे, आणि दोन स्टुलांच्या मध्ये बसण्याचा ते प्रयत्न करतात, एकावरून दुसऱ्या स्टुलावर उड्या मारतात आणि कधी उजव्या पक्षात पडतात तर कधी डाव्या’’. आता जर तेलतुंबडे मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवादासंबंधी आपली भूमिका स्पष्ट आणि खुल्या रूपात सांगू शकत नसतील तर तेदेखील रशियाच्या निम्न भांडवली बुद्धिजीवींसारखे कधी इकडे तर कधी तिकडे पडत राहतील. यासाठी आम्ही त्यांच्या आंबेडकरवादी आलोचकांना कसा काय दोष देऊ शकतो? यासाठी तर त्यांना स्वत:लाच दोष द्यावा लागेल!

महाशय तेलतुंबडेंचा ग्रँड थिअरीचा हास्यास्पद दावा

ज्यांची व्याख्या क्लासिकल मार्क्‍सवादी भूमिकेतून केली जाऊ शकत नाही अशा काही नव्या विकासांसंबंधी श्रीमान तेलतुंबडे काहीसा असा दावा करतात: श्रीमान तेलतुंबडे सांगतात की मार्क्‍स श्रमांची बचत करणाऱ्या यंत्रांबद्दल बोलला होता परंतु समकालीन भांडवलशाहीत आपण श्रमांची बचत करणाऱ्या नाही तर श्रमांचे विस्थापन करणाऱ्या यंत्रांबद्दल बोलतो. परंतु मार्क्‍सवादी राजकीय अर्थशास्त्राची अआईई माहित असलेली प्रत्येक व्यक्ती हे जाणून आहे की भांडवलशाही अंतर्गत श्रमांची बचत करणारे प्रत्येक उपकरण श्रम विस्थापित करणाऱ्या उपकरणात बदलून जात असते. श्रीमान तेलतुंबडे आपल्या संशोधनाने फार उत्साहित आहेत परंतु हा शोध तर अगोदरच लावला गेला आहे आणि सखेद असे म्हणावे लागेल की श्रीमान तेलतुंबडे त्याच्यापर्यंत १५० वर्ष उशीरा पोहोचले आहेत. हे तसेच आहे जसे की एखादा माणूस अत्यंत मौलिक संशोधन करण्यासाठी उत्तेजित व्हावा आणि मग त्याने स्वत:ला वीस वर्ष एका खोलीत बंद करून घ्यावे आणि नंतर चाकाचा आविष्कार करून आतून बाहेर पडावे आणि आर्किमिडिजसारखे रस्त्यावर धावून जावे!  एखाद्या शहाण्या माणसाला त्याला थांबवून सांगावे लागेल की चाक तर मानवतेने कित्येक हजार वर्षांपूर्वीच शोधून काढले होते. आनंद तेलतुंबडे यांची अवस्था काहीशी अशीच आहे. श्रमांची बचत आणि श्रमाचे विस्थापन करणाऱ्या यंत्रांमध्ये वास्तविक कोणतेही अंतर नाही. श्रीमान तेलतुंबडे त्या परिदृश्याबद्दल विचार करून अत्यंत चिंताक्रांत झाले आहेत जेव्हा एका कामगाराद्वारे एक कारखाना चालविणे शक्य होणार आहे. या भीतीने कित्येक बुद्धिजीवींना अशा निष्कर्षाप्रत नेले आहे की कामगार वर्ग इतिहासाच्या पटलावरून गायब होणार आहे. असे निष्कर्ष हेच सिद्ध करतात की संबंधित व्यक्ती मार्क्‍सवादी राजकीय अर्थशास्त्रासंबंधी काहीच जाणत नाही, तो वयाच्या सातव्या वर्षी मार्क्‍सवादी बनलेला असला तरीही. वास्तविक, अशी परिस्थिती केवळ बेरोजगारांची अशी विशाल सेना निर्माण करील जिला मार्क्‍सने ‘भांडवलशाहीची कबर खोदणारा’ म्हणून संबोधले होते. कामगार वर्ग संपून जाणार नाही तर तो विद्रोहाच्या अंतिम सीमेपर्यंत ढकलून दिला जाईल. येथे हे सांगण्याची जरुरी नाही की कोणत्याही क्रांतिकारी सिद्धांताशिवाय आणि अशा सिद्धांताने समृद्ध अशा अघाडीशिवाय हे विद्रोह क्रांतीमध्ये परिणत होऊ शकणार नाहीत. हे खरे आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यवादाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मोठे बदल झालेले आहेत ज्यांना मार्क्‍सवादी दृष्टीकोनातून विश्लेषित करण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे आणि दुसऱ्या अरविंद स्मृती संमेलनाचा हाच विषय होता ज्यावर आम्ही आधारलेखदेखील सादर केलेला होता. परंतु हे नवे विकासच इतिहास आणि समाजाच्या विज्ञानाच्या रूपात मार्क्‍सवादाच्या विकासाची प्रेरकतत्त्वे आहेत, अगदी श्रीमान तेलतुंबडेंच्या ‘‘ठोस विज्ञाना’’प्रमाणे. या बाबतीत एवढे हतप्रभ होण्यासारखे काय आहे? थोडक्यात बोलायचे झाले तर श्रीमान तेलतुंबडे यांनी व्यक्तींचे मूल्यांकन आणि अप्रोच व पद्धतींचे मूल्यांकन यामध्ये भेद करणे गरजेचे आहे. यासंबंधी हे विचारले जाऊ शकते की आपल्या अवतीभवतीचे विश्व समजून घेण्यासाठी मार्क्‍सवाद एक योग्य अप्रोच आणि पद्धति देतो की आंबेडकर? श्रीमान तेलतुंबडे मानतात की आंबेडकरांपाशी कोणताही सिद्धांत नव्हता आणि ते एक व्यवहारवादी होते ज्यांनी नेहमीच नव्या नव्या गोष्टींसोबत प्रयोग करणे सुरू ठेवले. परंतु श्रीमान तेलतुंबडेसुद्धा मान्य करतात त्याप्रमाणे हाच तो सिद्धांत आहे जो आंबेडकर पसंत करीत होते – व्हृावहारवाद! आणि संमेलनात हाच सिद्धांत आलोचनेच्या केंद्रस्थानी होता. अशी आलोचना सादर करण्यात गैर काय आहे? हे आंबेडकरांना नाकारण्यासारखे किंवा त्यांना कचराकुंडीत फेकून देण्यासारखे आहे का? आम्हांला असे वाटत नाही.

सतराव्या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे आंबेडकरांच्या विचारधारात्मक उद्भवांचा शोध घेतात. परंतु पुन्हा ते आंबेडकरांचे चुकीचे हस्तगतीकरण करण्याचाच प्रयत्न करीत आहेत. आंबेडकरांची मार्क्‍सवादाबद्दल नापसंती केवळ भारतीय कम्युनिस्टांच्या त्यांना आलेल्या अनुभवातून जन्माला आली नव्हती, तर त्यांची वर्ग भूमिका आणि अ‍ॅकॅडेमिक ट्रेनिंग यांमधून जन्माला आली होती. दुसरे, तेलतुंबडे आम्हांला पटवून देऊ पाहात आहेत त्याप्रमाणे आंबेडकरांनी मार्क्‍सवादाचा कधीच एका मापदंडाच्या रूपात वापर केला नाही. त्यांनी मार्क्‍सवादाला ‘‘डुकरांचे दर्शन’’ म्हणून संबोधले होते व यातून त्यांचा दॉष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. आम्ही आंबेडकरांच्या या दृष्टिकोनाची आलोचना केली आणि तीसुद्धा आंबेडकरांनी वापरलेल्या अपमानजनक शब्दावलीशिवाय. आम्हांला यात काहीच गैर वाटत नाही. हेसुद्धा तेलतुंबडेंचे अज्ञानच आहे की आंबेडकरांनी आईएलपी कामगार वर्गाचे राजकारण करण्यासाठी फेबियन विचारांपासून प्रेरणा घेऊन बनविली होती. आईएलपी बनविण्यासंबंधी प्रसिद्ध समाजशास्त्री आणि इतिहासकार खिस्तोफर जेफ्रोले यांनी आंबेडकरांच्या लेखनातील पुरावे देऊन हे सांगितले आहे की ती एक निवडणुकांसाठीची रणनीती होती. पुणे करारात वेगळे निवडणूक क्षेत्र न मिळाल्यामुळे व त्याऐवजी आरक्षित जागा मिळाल्यामुळे आंबेडकर हे जाणत होते की आता ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ सारख्या संघटनांद्वारे त्यांचे राजकारण पुढे जाऊ शकत नाही आणि त्यांना अशा एखाद्या राजकीय ओळखीची आवश्यकता आहे जिची अपील दलित जनतेबाहेर सामान्य कष्टकरी जनतेमध्ये होऊ शकले. हेच कारण होते की जेव्हा आईएलपीने निवडणुका लढविल्या तेव्हा एक दोन अपवाद वगळता तिचे सर्व उमेदवार दलित होते आणि त्यातदेखील एक मांग जातीची व्यक्ती आणि गुजरातमधील अस्पृश्य जातीचा एक उमेदवार वगळता सर्व महार होते. जेव्हा आईएलपीचा प्रयोग अयशस्वी झाला आणि ब्रिटिश वसाहतवाद आंबेडकरांच्या विचारांकडे लक्ष देण्याऐवजी व त्यांच्याशी समझोता करण्याऐवजी काँग्रेसकडे झुकू लागला तेव्हा आंबेडकरांनी एससी फेडरेशन बनविले. या साऱ्या वेगवेगळ्या काळांतील राजकीय रणनीती होत्या ज्या निवडणुका लक्षात घेऊन राबविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पुणे करारामध्ये गांधींकडून आंबेडकर कां ब्लॅकमेल झाले तेदेखील तेलतुंबडे सांगत नाहीत. जेफ्रोले पुराव्यासह सांगतात की १९२६ मध्ये आंबेडकरांचे झुकणे आणि १९४६ मध्ये काँग्रेससमोर आंबेडकरांनी समझोत्याची भूमिका घेणे यामागचे कारण हे होते की वसाहतवादाविरोधात आंबेडकरांची कोणतीच स्पष्ट भूमिका नसल्यामुळे दलितांचा एक मोठा हिस्सा काँगेसच्या बाजूने गेला होता. स्वातंत्र्याअगोदरच्या निकटच्या काळापासून गांधींच्या प्रस्तावावरून आंबेडकरांना घटनासभेत सामील केले जाईपर्यंत आंबेडकर राष्ट्रीय राजकारणात उपेक्षित राहण्याचे हेच कारण होते. (पाहा, ख्रिस्तोफर जेफ्रोले, डॉ. आंबेडकर्स स्ट्रॅटेजीज अगेंस्ट अनटजेबिलिटी अ‍ॅण्ड कास्ट सिस्ट, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज, वर्किंग पेपर सिरिज, खंड ३, संख्या ४, २००९). तेलतुंबडे आंबेडकरांच्या चुकीच्या विचारांचे रक्षण करण्यात आणि मार्क्‍सवादाशी ‘शॅडो-बॉक्सिंग’ करण्यात जेवढी उर्जा खर्च करीत आहेत ती कुठे ना कुठे त्यांच्या बौद्धिक क्षमतेला प्रभावित करते आहे आणि त्यांच्या राजकीय तर्कांची धार बोथट करते आहे.

१८. या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे पुन्हा एकदा आपल्या शिक्षक-उपदेशकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी हे योग्य प्रकारे चिन्हित केले आहे की जातीचा प्रश्न राष्ट्रीय अजेंड्यावर आणण्यात आंबेडकरांचे एक फार मोठे योगदान आहे. ते या बाबतीत भारतीय कम्युनिस्टांच्या योगदानाच्या बाबतीतही बरोबर सांगत आहेत की त्यांनी आनुभविक पातळीवर जातीय उत्पीडनाच्या विरोधात झुंजार संघर्ष केला. परंतु भारतीय कम्युनिस्ट आणि आंबेडकर दोघेही जातीच्या उच्चाटनाचा योग्य कार्यक्रम आखण्यात असफल ठरले. आपल्या लेखाच्या सुरुवातीला श्रीमान तेलतुंबडे यांनी सांगितले होते की विचारधारांचा पदानुक्रम बनविणे एक ब्राह्मण्यवादी भूमिका आहे. परंतु ते या ब्राह्मण्यवादी भूमिकेचे आपल्या सोयीनुसार अनुसरण करतात. येथे ते असे म्हणतात की लोकशाहीकरणात आंबेडकरांचे योगदान भारतीय कम्युनिस्टांपेक्षा कितीतरी जास्त आहे. येथे आपण पदानुक्रम निर्धारित करण्याचा आधार कां घेत आहात श्रीमान तेलतुंबडे? कारण येथे आंबडेकरांना वरचे स्थान देण्यात आले आहे! आपल्या म्हणण्याला तर्क आणि कारणांद्वारे समर्थन देण्याची गरज तेलतुंबडे यांना जाणवत नाही. यासाठी ते दुसरी बौद्धिक कोलांटी मारतात आणि असे म्हणतात की असे त्यांनी केवळ एका अलंकाराच्या रूपात म्हटले आहे कारण त्यांची अशी इच्छा आहे की कम्युनिस्टांनी किती संधी वाया दवडल्या याचा त्यांनी विचार करावा. पुन्हा एकदा श्रीमान तेलतुंबडे आपल्या शिकविण्याच्या क्षमतेवर मंत्रमुग्ध आहेत. याला कोणीच विरोध करीत नाही की जातिप्रश्नावर कम्युनिस्ट आंदोलनाने केलेल्या चुकांचे विश्लेषण करण्याची गरज आहे आणि आम्ही आमच्या पेपरमध्ये आंबेडकरांच्या संक्षिप्त आलोचनेव्यतिरिक्त कम्युनिस्ट आंदोलनाची आलोचनादेखील केलेली आहे. परंतु श्रीमान तेलतुंबडे यांच्याद्वारे केली गेलेली ही पदानुक्रमिता चकित करणारी आहे आणि आम्ही त्यांनी सादर केलेल्या पदानुक्रमाशी असहमत आहोत. कमीत कमी त्यांनी आपल्या अप्रोचमध्ये सुसंगती राखली पाहिजे आणि आंबेडकरांच्या पावलांवर चालत त्यांनी इतक्या लवकर आपल्या भूमिकेमध्ये बदल करू नये.

१९,२०. एकोणिसाव्या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे असा तर्क देतात की आम्ही ‘आधार आणि अधिरचने’च्या रूपकाशी यांत्रिकपणे चिकटून राहिलो आहोत आणि ते असे म्हणणे सुरूच ठेवतात की सर्व ‘दलित मार्क्‍सवाद्यांनी’ (आम्हांला नेमकेपणाने ठाऊक नाही की याचा अर्थ काय आहे!) या रूपकाचा त्याग केलेला आहे आणि या रूपकावर आंतरराष्ट्रीय वर्तुळात विवाद आहेत. आम्ही मानतो आणि आम्ही आमच्या पेपरमध्ये हे स्पष्ट केलेले आहे की आधार आणि अधिरचनेचे रूपक म्हणजे कोणत्याही सामाजिक संरचनेच्या अध्ययनासाठी एक विश्लेषणात्मक उपकरण आहे आणि त्याचा यांत्रिक व इंस्ट्रुमेंटलिस्ट रूपात उपयोग केला जाऊ शकत नाही, जसा भारतीय कम्युनिस्ट सर्रास करताना दिसतात आणि जातीच्या प्रश्नाच्या बाबतीत तर प्रामुख्याने करताना दिसतात. आम्ही प्रामुख्याने भारतीय कम्युनिस्टांमध्ये त्या कम्युनिस्टांची आलोचना केलेली आहे जे मानतात की जात अधिरचनेचा भाग आहे. याच्या उलट आम्ही आमच्या पेपरमध्ये असा तर्क ठेवला आहे की जात आधाराशी संलग्न आहे आणि अधिरचनेशीदेखील. परंतु आम्ही येथे यासंबंधी अधिक विस्तारात जाऊ सकत नाही. आमच्या भूमिकेसंबंधी कुतुहल असल्यास अरविंद स्मृती न्यासच्या वेबसाईटवरील (www.arvindtrust.org   संपादक) पेपर डाऊनलोड करून वाचता येतील. परंतु येथे पुन्हा एकदा श्रीमान तेलतुंबडे हल्ला करण्याच्या उद्देशाने एक काल्पनिक मार्क्‍सवादी पुतळा निर्माण करीत आहेत. स्पष्ट आहे की तेलतुंबडे आधारलेख न वाचताच शिकविण्यासाठी उतावीळ झालेले आहेत.

याशिवाय तेलतुंबडे यांनी ही टीका केलेली आहे की भारतीय कम्युनिस्ट जात आणि वर्ग यांना समजण्यास असफल ठरले. आम्ही स्वत:च भारतीय कम्युनिस्ट आंदोलनाच्या या विफलतेची आलोचना केलेली आहे. परंतु श्रीमान तेलतुंबडे यांनी हा मुद्दा असा काही प्रस्तुत केला आहे की भारतीय कम्युनिस्टांनी जातीचा प्रश्न कधी उपस्थित केलाच नाही आणि हे त्यांचे सर्वांत मोठे पाप असल्याचे त्यांनी घोषित करून टाकले आहे. आम्ही यावर आक्षेप घेतला कारण हे तथ्यत: चुकीचे आहे. सुखविन्दर यांनी तेलतुंबडेंच्या या आलोचनेचे उत्तर दिले आणि कम्युनिस्टांवर अशा दोषासाठी महाभियोग चालविण्याबद्दल त्यांची आलोचना केली ज्यासाठी कम्युनिस्ट दोषी नाहीत. ते आपल्या लेखात म्हणतात, ‘‘आश्चर्याची बाब म्हणजे मार्क्‍सवाद्यांनी ही चूक कधी कबूलदेखील केली नाही’’. पुन्हा एकदा श्रीमान तेलतुंबडे तथ्यांची मोडतोड करीत आहेत. आमचा पेपर खुद्द कम्युनिस्टांनी जातीची समस्या समजण्यात केलेल्या चुकांबद्दल कटू आलोचनेची भूमिका घेताना दिसतो. वास्तविक पेपरचा मोठा हिस्सा आंबेडकर आणि फुले यांची आलोचनेऐवजी कम्युनिस्ट आंदोलनाची आलोचना सादर करतो. जोपर्यंत आधार आणि अधिरचनेचा प्रश्न आहे कोणीही आमचा अप्रोच पेपर पाहू शकतो. श्रीमान तेलतुंबडे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याहून आमची भूमिका अत्यंत निराळी आहे.

२१. या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे आपला शिक्षक उपदेशकाचा स्वर सुरू ठेवतात. ते दावा करतात की ते एकटेच असे आहेत जे म्हणतात की जातीला मुळातच पदानुक्रमाची आवश्यकता असते आणि पदानुक्रमरहित पाण्यात ती जिवंत राहू शकत नाही, बाह्य दबावाखाली ती संकुचित होते परंतु बाह्य दबावाशिवाय ती विभाजित होऊ लागते. ते पुन्हा असे म्हणतात की सर्व जाती आंदोलने जातीच्या या मूलभूत चारित्रिक विशेषतेला समजून घेण्यात अपयशी ठरली. हादेखील एक पोकळ दावा आहे. सुवीरा जयसवाल आणि आर.एस. शर्मांसारख्या इतिहासकारांनी अगोदरच या वैशिष्ट्यांकडे आपले लक्ष वेधले आहे. परंतु नेहमीप्रमाणेच यावेळीसुद्धा श्रीमान तेलतुंबडे आपल्या स्वत:च्या ‘‘आविष्कारां’’बाबत आणि ‘‘शोधां’’बाबत हर्षोल्हासित झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे हे आविष्कार आणि शोध अगोदरच लावले गेले आहेत आणि दुर्दैवाने तेलतुंबडे त्यांच्यापर्यंत उशीराने पोहोचले आहेत! श्रीमान तेलतुंबडे म्हणतात की जातीय ओळख नाही तर वर्गीय ओळखच अशी आहे जिच्यात मुक्ती प्रदान करण्याची क्षमता आहे, हे दलित आणि मागास जातींनी जाणले पाहिजे आणि ते कम्युनिस्टांनाही सल्ला देतात की त्यांना दलितांना हे दाखवून द्यावे लागेल की ते बदलले आहेत. आम्ही मानतो की कम्युनिस्ट केवळ संघर्षाद्वारे आणि जातीच्या प्रश्नाच्या योग्य आकलनाद्वारेच हे दाखवून देऊ शकतात. आम्ही हेदेखील मानतो (आणि आम्ही हे आमच्या पेपरमध्ये म्हटलेदेखील आहे) की दलितांच्या भागिदारीशिवाय कोणतीही क्रांती शक्य नाही आणि क्रांतीशिवाय दलितांची मुक्ती शक्य नाही. परंतु श्रीमान तेलतुंबडे त्याचा उल्लेखदेखील करीत नाहीत. दुसरे, पुन्हा एकदा ते सिद्धांत आणि विचारधारेबद्दल आपल्या संशयवादाचे प्रदर्शन करतात जेव्हा ते असे म्हणतात की दलित आंदोलन आणि कम्युनिस्ट आंदोलनाचे-‘वादां’चे नाही- मिलन झाले पाहिजे आणि असे मिलन लगेच क्रांतीमध्ये फालद्रूप होईल. पहिली गोष्ट म्हणजे, क्रांती एक विज्ञानाचा विषय आहे; लेनिनचे शब्द उसने घ्यावयाचे झाल्यास एका उचित वैज्ञानिक आणि क्रांतिकारी सिद्धांताशिवाय कोणतेही क्रांतिकारी आंदोलन होऊ शकत नाही. श्रीमान तेलतुंबडे लेनिन यांच्या प्राधिकाराचा प्रयोग आपल्या सोयीनुसार करतात. लेनिन आंदोलनाचे मार्गदर्शन करणाऱ्या सिद्धांताच्या बाबतीत अत्यंत आग्रही आहेत. श्रीमान तेलतुंबडे यांचे ड्यूईयन विचलन पुन्हा एकदा ठळकपणे दिसून येते.

२२ आणि २३. या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे आरक्षणाबद्दल आपली पर्यायी भूमिका मांडतात जी त्यांच्यानुसार केवळ अनुसूचित जातींपुरती मर्यादित असली पाहिजे ज्यांना समाजात बहिष्काराचा सामना करावा लागतो. त्यांच्यानुसार मागास जाती आणि जमातींचे मागासलेपण दूर करण्यासाठी राज्याला इतर मार्ग वापरले पाहिजेत. आरक्षणाच्या धोरणाअंतर्गत केवळ सार्वजनिक क्षेत्रच नाही तर संपूर्ण सामाजिक क्षेत्र आले पाहिजे, ज्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचासुद्धा समावेश आहे. श्रीमान तेलतुंबडे यांच्या मते असे आरक्षणाचे धोरण, आपल्या इच्छेनुसार जनतेला विभाजित ठेवण्याचे शासक वर्गाच्या हातातील सर्वांत महत्त्वपूर्ण शस्त्र बनलेल्या वर्तमान आरक्षणाच्या धोरणातील साऱ्या दोषांपासून मुक्त असेल. पुन्हा श्रीमान तेलतुंबडे आपल्या पर्यायी आरक्षण धोरणामध्ये अनेक अटी जोडतात. त्यांचे असे मानणे आहे की अशा धोरणात जातीच्या उच्चाटनाचा भार खुद्द समाजावर येईल आणि तो जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी बाध्य होईल. आम्ही या आरक्षणाच्या पर्यायी धोरणाबाबत अधिक विस्तारपूर्वक जाणण्यास उत्सुक आहोत, परंतु आम्हांला असे वाटते, पहिली गोष्ट, आरक्षणाचे धोरण संपूर्ण सामाजिक क्षेत्रात लागू करण्यात आले तरी दलित डिस्टिग्मटाइज्ड (कलंकमुक्त) होणार नाहीत, उलट, आम्ही जेथवर पाहू शकतो, ते अधिकच स्टिग्मटाईज्ड होतील. आणि त्याचबरोबर हा कलंक त्यांच्याशी ज्या रूपात जोडलेला आहे तो नग्न आणि ‘‘वरवर’’ राहण्याऐवजी अधिक सूक्ष्म होईल. दुसरे, हे कोणत्याही प्रकारे जातीला नष्ट करण्याच्या समाजाच्या जबाबदारीच्या रूपात बदलणार नाही. आनंद तेलतुंबडे यांचा एकूणच दृष्टिकोन अमेरिकी साम्राज्यवादी अप्रोचशी अत्यंत मिळताजुळता आहे. पुढे कधीतरी आम्ही यावर अवश्य लिहू.

जातींचे उच्चाटन तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत वर्ग, राज्य, मानसिक आणि शारिरीक श्रम, गाव आणि शहर, कृषी आणि उद्योग यांच्यामधील आंतरवैयक्तिक असमानतांचा ऱ्हास होत नाही. इतकेच काय तर क्रांतीनंतरदेखील जातीच्या उच्चाटनासाठी सांस्कृतिक क्रांत्यांची गरज भासणार आहे. आम्ही तेलतुंबडेंच्या आरक्षणाच्या धोरणाबाबतचे हे जटिल मॉडेल जाणून घेण्यास इच्छुक आहोत, परंतु मुख्य गोष्ट येथे ही नाहीये. तरीही श्रीमान तेलतुंबडे यांना आम्ही हा सल्ला देऊ इच्छितो की जर ते एक सैद्धांतिक भूमिका घेण्याबाबत एवढे जागरूक आणि उद्यमी असते तर बहुधा त्यांना कमी समस्यांना तोंड द्यावे लागले असते. आमच्या मते आज खरी समस्या आरक्षणाच्या धोरणाच्या खास मॉडेलची नाही तर आरक्षणाचे धोरणच एक समस्या आहे. स्वातंत्र्यानंतर काही काळापर्यंत हा एक लोकशाही अधिकार होऊ शकत होता, परंतु आरक्षणाचे कोणतेही मॉडेल आज एक भ्रम निर्माण करते. आज आमची मागणी सर्वांसाठी नि:शुल्क आणि समान शिक्षण आणि सर्वांसाठी रोजगार ही असली पाहिजे. केवळ अशा मागण्याच व्यवस्थेला तिच्या ‘अशक्यतेच्या बिंदू’पर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि या मागण्यांसाठी होणाऱ्या संघर्षांदरम्यान जातीय बंधने कमकुवत होऊ शकतात. श्रीमान तेलतुंबडे यांचे विचार राजकीय भूमिकेवर बरेच अवलंबून आहेत आणि तसे पाहता आम्ही एका सच्च्या ड्यूईयनकडून अपेक्षा तरी काय करू शकतो? त्यांना वाटते की राज्याने त्यांचे आरक्षणाचे धोरण कार्यान्वित केले तर जातींना उपटून टाकणे समाजाला भाग पडेल. हे शेखचिल्लीच्या स्वप्नासारखे आहे. राज्य कधीच समाजास एका विशिष्ट पद्धतीने व्यवहार करण्यास भाग पाडू शकत नाही. ठोस राजकीय, सामाजिक आणि आर्थिक संघर्षच समाजाच्या व्यवहारास आकार प्रदान करीत असतात, ज्यांच्या दरम्यान राज्य एक तर शाबूत राहतं किंवा नष्ट होतं आणि एक नवीन राज्य स्थापित होतं. राज्य कोणत्याही प्रकारच्या ‘‘सकारात्मक पावलां’’द्वारे (एफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन) समाजास कोणत्याही विशिष्ट पद्धतीने विचार करण्यास, बोलण्यास किंवा कृती करण्यास भाग पाडू शकत नाही. श्रीमान तेलतुंबडे यांनी संमेलनात आपल्या आरक्षणाच्या धोरणाच्या ‘‘पर्यायी’’ ड्यूईयन आकलनाचेदेखील कोणतेही विवेचन केले नव्हते आणि आता ते आमच्या बंदिस्त अप्रोचसाठी आम्हांलाच खडे बोल सुनावत आहेत! हे योग्य आहे का? हा संधीसाधूपणा नाही का?

२४. या पॅरेग्राफमध्ये श्रीमान ततेलतुंबडे काही करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की जोवर जातीच्या प्रश्नाच्या समस्येसंबंधीच्या भागाचा प्रश्न आहे, आमचा पेपर नवीन काहीच सादर करीत नाही. ते सांगतात की अशा प्रस्थापना जातीसंबंधीच्या कोणत्याही कम्युनिस्ट दस्तावेजात आढळून येतात. इतकेच नाही, तर आंबेडकरांचे प्रस्तावदेखील आमच्या अप्रोच पेपरमधील प्रस्तावांपेक्षा कितीतरी जास्त मूलगामी होते. पहिली गोष्ट, श्रीमान तेलतुंबडे यांच्या विपरीत, नूतनतेच्या दाव्याबद्दल आम्हांला कोणतेही विशेष आकर्षण नाही. जे योग्य आहे ते योग्य आहे. ते कित्येकांनी अगोदरच सांगितलेले आहे यामुळे काहीच फरक पडत नाही. दुसरे, ते केवळ अशा प्रस्थापनांचा उल्लेख करतात ज्या जातीच्या प्रश्नावरील कोणत्याही आमूलगामी चार्टरसाठी समान असतात. जातीच्या प्रश्नावरील प्रस्तावित कार्यक्रमासंबंधीच्या आमच्या पेपरचे दोन भाग आहेत. पहिला दूरगामी कार्यभार आणि समाजवादी समाज निर्मितीद्वारे जातीच्या प्रश्नाच्या उपायांशी संबंधित आहे आणि दुसरा तात्कालिक कार्यभारांशी संबंधित, जे आपल्याला तत्काळ हाती घ्यावे लागतील. आम्ही श्रीमान तेलतुंबडे यांना असे सांगू इच्छितो की त्यांनी अप्रोच पेपरच्या या भागावर पुन्हा एकदा लक्ष द्यावे जेणेकरून ते आमच्या भूमिकेची विशिष्टता समजू शकतील. आरक्षणावर आमची भूमिका इतर डाव्या संघटनांपेक्षा वेगळी आहे. एका वेगळ्या प्रकारच्या जातिविरोधी संघटनांची आमची भूमिकासुद्धा कम्युनिस्ट संघटनापैकी बहुतेकांपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक भूमिकेचा येथे उल्लेख करण्याचे कारण नाही. आमचा आग्रह आहे की इच्छुक वाचकांनी  अरविंद स्मृती न्यासच्य वेबसाइटवरून अप्रोच पेपर डाऊनलोड करून अवश्य वाचावा. आंबेडकरांचे प्रस्ताव अधिक मूलगामी होते हे सिद्ध करण्यासाठी श्रीमान तेलतुंबडे यांनी प्रत्येक प्रस्तावानुसार तुलना करावी, अशा पदानुक्रमितेला ब्राह्मण्यवादाचा दर्प येत असला तरीही, आणि तसेदेखील महाशय तेलतुंबडे आपली सनक आणि उन्मादांच्या अनुसार ब्राह्मण्यवादीच बनतात. आम्ही कमी व अधिक मूलगामी या अर्थाने विचार करीत नाही. हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.

आमचा पेपर वाचणारा कोणीही समजून जाईल की जातीच्या उच्चाटनाचा आमचा एक पर्यायी कम्युनिस्ट कार्यक्रम आहे, जो कर्मठ नाही आणि ओपन एंडेड आहे. आम्ही कधीच असा दावा करीत नाही की आमचा कार्यक्रम अंतिम अथवा श्रेष्ठ आहे, उलट आम्ही असे मानतो की त्यात कित्येक गोष्टी जोडल्या जाऊ शकतात किंवा कमी केल्या जाऊ शकतात. हा वादविवादासाठी प्रस्तुत एक विनम्र प्रस्ताव आहे. आम्ही हे संमेलनातदेखील सांगितले होते. परंतु श्रीमान तेलतुंबडे हे सांगण्यास जरा जास्तच उत्सुक आहेत की आम्ही जुन्या कम्युनिस्ट कार्यक्रमाचेच पुनरुत्पादन केले आहे! आम्ही अर्थातच त्यांनी पटवून देऊ शकत नाही.

२५. या पॅरेग्राफमध्ये पुन्हा एकदा श्रीमान तेलतुंबडे आपली आत्ममुग्धता सर्वाधिक स्पष्ट रूपात प्रगट करीत आहेत. श्रीमान तेलतुंबडे म्हणतात की त्यांनी आपल्या ‘साम्राज्यवाद विरोध आणि जातीचे उच्चाटन’ या पुस्तका जातीच्या उच्चाटनाचा एक व्यावहारिक आराखडा सादर केला आहे. आता जरा त्यांच्या शोधांकडे लक्ष देऊ जे नवे व अभूतपूर्व असल्याचा दावा ते करीत आहेत. ते म्हणतात की त्यांना असे जाणवले की वासाहतिक काळापासून १९६० च्या दशकापर्यंत झालेल्या भांडवली हल्ल्यांमुळे कर्मकांडिय जाती कमकुवत झाल्या आणि आता क्लासिकल पदानुक्रमाच्या बाता करणे व्यर्थ आहे. परंतु जातीच्या आधुनिक इतिहास लेखनाशी परिचित कोणताही विद्यार्थी/अकॅडमिशियन/कार्यकर्ता हे जाणतो की श्रीमान तेलतुंबडे यांच्या या शोधामध्ये नवीन असे काहीच नाही. इरफान हबीब आपला प्रसिद्ध लेख भारतीय इतिहासात जातीमध्ये असेच तर्क प्रस्तुत करतात. सुवीरा जयसवाल, आर. एस. शर्मा, विवेकानंद झा यांसारख्या इतिहासकारांनी श्रीमान तेलतुंबडे यांचे पुस्तक लिहिले जाण्याच्या फार पूर्वी हे विचार मांडले होते. तेव्हा श्रीमान तेलतुंबडे यांच्या नूतनतेचा दावा सर्वाधिक अनुकूल परिस्थितीतही एक पोकळ दावा आहे आणि चिकित्सक परिस्थितीत तो एक चुकीचा दावा आहे. ग्रामीण बुर्ज्‍वा आणि ग्रामीण सर्वहारा यांच्यामधील जातीय संबंधांनादेखील फार पूर्वी स्थापित करण्यात आले आहे. श्रीमान तेलतुंबडे आपल्या नूतनतेबद्दल पुन्हा एकदा चुकीचा दावा करीत आहेत. एवढेच काय तर कित्येक कम्युनिस्ट गटांच्या दस्तावेजांमध्ये ग्रामीण क्षेत्रांतील जातिव्यवस्थेच्या या पैलूचा उल्लेख आलेला आहे. कुलक आणि फार्मर यांचे आर्थिक हितदेखील कशा प्रकारे जातीय समीकरणांच्या रूपात अभिव्यक्त होते हेदेखील बऱ्याचा काळापासून एक ज्ञात तथ्य आहे. हीच गोष्ट राज्य आणि ग्रामीण बुर्ज्‍वा वर्गाच्या युतीच्या त्यांच्या ‘‘शोधा’’बाबतही सांगतिली जाऊ शकते. समाजातील अग्रणी तत्त्वांनी (बुद्धिजीवी) राजकीय अर्थशास्त्राच्या शिक्षणाद्वारे लोकांना जातिव्यवस्थेच्या कारणांमुळे उत्पन्न होणाऱ्या दोषांबद्दल शिक्षित करण्यासंबंधी श्रीमान तेलतुंबडे यांचा चौथा मुद्दासुद्धा एक जुना तर्क आहे आणि आंबेडकरांसह कित्येकांनी याअगोदरच तो मांडलेला आहे. परंतु श्रीमान तेलतुंबडे यांची ही आशा वास्तवात परिणत होण्याबाबत शंका आहेत. आणि शेवटी डाव्यांना असुधारणीय आणि जातीय उत्पीडन करणाऱ्या तत्त्वांशी ‘‘भौतिक रूपात’’ निपटण्याचे काम देण्यात आले आहे. वा! (डाव्यांचे काम जातीय उत्पीडन करणाऱ्यांशी ‘‘शारीरिक रूपात’’ निपटण्यापुरते मर्यादित करण्यात आले आहे आणि शिक्षण/उपदेश/प्रवचन देण्याच्या भूमिका श्रीमान तेलतुंबडे यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत कारण जातींच्या उच्चाटनाचा आराखडा सादर करणारे श्रीमान तेलतुंबडे हे एकमेव व्यक्ती आहेत.) आपले तर्क अधिक स्वीकारार्ह बनविण्यासाठी ते पुढे हे जोडतात की आपल्या या भूमिकेमुळे डावे दलितांचा विश्वास संपादन करू शकतील आणि यामुळे क्रांती व जातींच्या उच्चाटनासाठी कार्यरत शक्तींना बल प्राप्त होईल. नंतर तेलतुंबडे झरतृष्ट किंवा ताओच्या शब्दांमध्ये आपली शेवटची शिकवण देतात, ‘‘एवढेच करा आणि तुम्हांला दिसेल की तुम्ही जातीच्या उच्चाटनाच्या निकट गेला आहात!’’ खरोखर समजत नाही की महानतेची नक्कल करण्याच्या या ठेंगू प्रयत्नावर हसावे की चिंतित व्हावे!

आपल्या या प्रस्थापना अधिक विश्वसनीय बनविण्यासाठी श्रीमान तेलतुंबडे म्हणतात की त्यांच्या या मॉडेलला साइबरनेटिक्समधील त्यांच्या स्वत:च्या शोधांचा आधार प्राप्त आहे. आपण पाहू शकतो की श्रीमान तेलतुंबडे पुन्हा एकदा आपल्या ड्यूईयन ‘‘वैज्ञानिक’’ नियतत्त्ववादाकडे जात आहेत. श्रीमान तेलतुंबडे स्वत: काहीही म्हणोत, एवढे उघड आहे की नूतनतेचे त्यांचे दावे निराधार आहेत आणि जोपर्यंत जातीच्या उच्चाटनाचा संबंध आहे, त्यांच्यापाशी सांगण्यासारखे नवीन काहीच नाही.

२६. या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे असा दावा करतात की ते आपल्या विधानांपासून मागे हटलेले नाहीत. ते म्हणतात की मी त्यांच्या वक्तव्यातील ज्या गोष्टीचे खंडन करण्यासाठी एवढी धडपड करतो आहे (आंबेडकरांचा ड्यूईवाद आणि एका वेगळ्या प्रकारे श्रीमान तेलतुंबडेंचादेखील) त्यावर त्यांचा मुळात विश्वासच नाही. परंतु त्यांनी हे स्वत:च मान्य केले आहे की त्यांना ड्यूईयन पद्धत पसंत आहे आणि ती वैज्ञानिक पद्धती होण्याच्या फार जवळ आहे. (पाहा, चर्चेचा व्हिडिओ लिंक). याच गोष्टीचे तर मी खंडन केले आहे. मी हा तर्क दिला होता की ड्यूईयन पद्धत स्वत:ला वैज्ञानिक पद्धतीच्या रूपात प्रस्तुत करते परंतु वास्तवात ती तशी नाही. या बाबतीत मी हे अगोदरच दाखविलेले आहे की कशा प्रकारे श्रीमान तेलतुंबडे एक सच्चे ड्यूईयन आहेत. त्यांची तर्क करण्याची एकूणच पद्धत ड्यूईयन आहे. आणि आता श्रीमान तेलतुंबडे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत की त्यांना ड्यूईयन व्यवहारवाद आणि इंस्ट्रुमेंटलिझममध्ये अजिबात रस नाही!

दुसरे, त्यांनी संमेलनात हे तर मान्य केले होते की ते त्या सर्व गोष्टींशी सहमत आहे ज्या मी मांडल्या होत्या. त्यांनी म्हटले, (मी येथे त्यांनी संमेलनात केलेल्या दुसऱ्या वक्तव्यातील कथन शब्दश: उद्धृत करीत आहे) ‘‘येथे बऱ्याच चांगल्या गोष्टी बोलल्या गेल्या आहेत व त्या सर्वांशी मी सहमत आहे’’. आता ते म्हणताहेत की ते पेपरबद्दल बोलत होते. वास्तविक, ही चकित करणारी बाब आहे! आणि जर ते पेपरबद्दल बोलत असतील तर त्यांनी प्रत्यक्षात आपल्या पहिल्या वक्तव्यात संपूर्ण पेपरच जातीयवादी आणि ब्राह्मण्यवादी म्हणून नाकारलेला होता. (कोणीही खाली दिलेल्या लिंकवरील व्हिडियोमध्ये पाहू शकतो). मग त्यांनी आपल्या दुसऱ्या वक्तव्यात हा आरोप मागे घेतला. श्रीमान तेलतुंबडे येथे एक रंजक वक्तव्य करीत आहेत. ते म्हणतात की तेथून बाहेर पडण्यासाठी ते असुविधाजनक परिस्थितीत काही गोष्टी बोलले, ज्यांचा अर्थ ते आमच्याशी सहमत आहेत असा घेतला जाऊ शकत नाही. आता आम्ही या अनोख्या वक्तव्यावर निर्णय देण्याचे काम वाचकांवरच सोडतो. तेथून पळ काढण्यासाठी महान शिक्षक महाशय तेलतुंबडे एवढे उतावीळ कां झाले होते? आमचा वाचकांना आणि श्रीमान तेलतुंबडे यांना आग्रह आहे की त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ पाहावा जेणेकरून त्यांना याचे कारण कळून येईल. याचे कारण हे होते की पहिल्या वक्तव्यात त्यांचा स्वर एखाद्या शिक्षक/उपदेशकासारखा होता जो तेथे उपस्थित असलेल्या अज्ञानी मार्क्‍सवाद्यांना शिक्षित करण्यासाठी आलेला होता! आपल्या दुसऱ्या वक्तव्यात ते ‘‘असुविधाजनक रूपात’’ ‘‘तेथे बोलल्या गेलेल्या बहुतांश गोष्टींशी’’ (पेपरमध्ये किंवा मी मांडलेल्या श्रीमान तेलतुंबडे यांच्या आलोचनेमध्ये, त्याने काही फरक पडत नाही कारण या दोन्हींमध्ये कोणतेही अंतर्विरोध नाहीत) सहमती दर्शवत राहिले! मी असे म्हणू इच्छितो की पहिल्या आणि दुसऱ्या वक्तव्यादरम्यान त्यांचा स्वर आणि मुद्रेमध्ये जो फरक पडला त्यावरून सारे काही स्पष्ट होते. हे फरक एवढा स्पष्ट आहे की कोणीही तो पाहू शकतो. ते मला उद्धृत करतात, ‘‘माझा तसा समज झाला की आपला कमेंट एकूण पेपरवर होता’’ (‘‘ऐसा मुझे ध्वनित हुआ की आपका कमेंट पूरे पेपर पर था’’). परंतु व्हिडिओ पाहणारा कोणीही व्यक्ती हे समजू शकतो की मी अत्यंत विनम्रपणे असे म्हणालो होतो, ‘‘हां श्रीमान तेलतुंबडे, आपण आमच्या पेपरसा ब्राह्मण्यवादी आणि जातीयवादी म्हणून नाकारले तर होतेच.’’ माझा स्वर विनम्रच असू शकत होता कारण स्वत: तेलतुंबडे म्हणतात त्याप्रमाणे ते एक ‘‘वरिष्ठ कार्यकर्ता’’ आहेत! आता ते याला मतिभ्रम म्हणोत किंवा आणखी काही म्हणोत. परंतु वादविवादाचा व्हिडिओ स्वत:च एकूण कहाणी वर्णन करतो आहे. विनम्रतापूर्वक बोलायचे झाले तर आपल्या बदललेल्या भूमिकांच्या बचावासाठी हा एक अत्यंत कमकुवत तर्क आहे.

२७. आपल्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये श्रीमान तेलतुंबडे यांनी आंबेडकरवाद्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे जे चंदिगढ संमेलनातील त्यांच्या सहभागापासून त्यांच्यावर हल्ले करीत आहेत. परंतु येथे ही बाबदेखील स्पष्ट नाही की ते आंबेडकरांच्या कोणत्या गोष्टीचा बचाव करीत आहेत : व्यक्तीचा की त्यांच्या विचारांचा. कारण जोपर्यंत विचारांचा प्रश्न आहे आम्हाला कळत नाही की आम्ही ड्यूईयन व्यवहारवादापासून काय शिकू शकतो. वास्तविक, श्रीमान तेलतुंबडे कित्येक ठिकाणी असे म्हणतात की आंबेडकरांपाशी जातीच्या उच्चाटनाचा कोणताही कार्यक्रम नव्हता. मग आंबेडकरांच्या कोणत्या विचारांचे रक्षण केले गेले पाहिजे? पुन्हा एकदा श्रीमान तेलतुंबडे आपली आत्ममुग्धता आणि ‘‘दलितांच्या भाबडेपणावरील’’ त्यांच्या निराधार विश्वासाचे प्रदर्शन करीत आहेत. या पॅरेग्राफमधील काही वक्तव्यांकडे लक्ष देऊ : ‘‘तो मी नाही तर तुम्ही आहात ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या भोळ्याभाबड्या (क्या बात है! – अ.सि.) अनुयायांच्या भावनांचा एका अशा व्यक्तीच्या विरोधात (म्हणजे दस्तुरखुद्ध तेलतुंबडे – अ.सि.) वापर करून अपमान केला आहे, जी शासक वर्गाच्या गोटापासून दूर राहून एकनिष्ठ रूपात केवळ त्या लोकांच्या सेवेस समर्पित आहे’’; ‘‘ती व्यक्ती मीच आहे जिने तुमच्या कबिल्याच्या विपरित बाबासाहेब आंबेडकरांच्या स्तुतीमध्ये किंचितही भक्ती दाखविलेली नाही, उलट मी जे काही केले त्यात उत्कृष्टता आणण्यासाठी, उत्पीडित जनतेच्या बाजूने उभे राहण्यासाठी व त्या लोकांच्या दृष्टीने आपल्या चारी बाजूंच्या विश्वाचे विश्लेषण करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या रोल मॉडेलचे पूर्ण सत्यनिष्ठेसह अनुसरण केले आहे’’. (वाचकांनीच सांगावे ही आत्ममुग्धता आणि आत्मश्लाघेचे शिखर नाही का?) श्रीमान तेलतुंबडे हे राजकीय आत्मसंमोहन आणि आत्ममुग्धतेने कोणत्या मर्यादेपर्यंत ग्रस्त झालेले आहेत, हे आता कोणीही पाहू शकतो. ते स्वत:ला दलित उद्धाराच्या स्वघोषित, दिव्य रूपात अवतरित नायकाच्या रूपात पाहतात! आणि तरीही ते आमच्यावरच आत्ममुग्धतेचा आरोप करतात हे खरोखर अतिशय रोचक आहे.

 

शेवटी, आम्हांला एवढेच सांगावयाचे आहे की सर्वांनी आनंद तेलतुंबडे यांच्याशी झालेली चर्चा पुन्हा पाहावी आणि प्रत्येक गोष्टीत स्वर, अंतर्वस्तू आणि रूपाच्या बदलाकडेदेखील लक्ष द्यावे. या लेखामध्ये श्रीमान तेलतुंबडे यांनी केलेले पोकळ दावे समजून घेण्यासाठी व्हिडिओ पाहणे पुरेसे आहे.  कोणताही भ्रम निर्माण होण्याची शक्यता राहू नये आणि सर्व कॉम्रेडना आम्ही श्रीमान तेलतुंबडे यांचे केलेले खंडन सुस्पष्टपणे समजावे, या हेतूने आम्ही त्यांच्या लेखाचे पॅरेग्राफनुसार उत्तर दिले. आम्ही सर्वांच्या सोयीसाठी व्हिडियोची लिंक पुन्हा एकदा देत आहोत. संपूर्ण चर्चेच्या व्हिडिओची लिंक :

(http://www.youtube.com/watch?v=TYZPrNd4kDQ)

स्फुलिंग १ सप्‍टेंबर २०१४