‘जातिप्रश्न आणि आंबेडकरांचे विचार’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण चर्चा

‘जातिप्रश्न आणि आंबेडकरांचे विचार’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण चर्चा

संपादक

‘जातिप्रश्न आणि मार्क्‍सवाद’ या विषयावर चौथे अरविंद स्मृती संमेलन मार्च २०१३ मध्ये चंदिगढ येथे आयोजित करण्यात आले. या संमेलनात प्रसिद्ध विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी आपली भूमिका मांडली होती व ‘अरविंद ट्रस्ट’तर्फे तिचे टिकात्मक विश्लेषण करण्यात आले. संमेलनानंतर या विषयाशी संबंधित विचारवंत, कार्यकर्ते यांच्यामधून या संमेलनातील वादविवादावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही वर्तमानपत्रे व नियतकालिकांमधून यासंबंधी लेखही लिहिले गेले. त्यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उत्तर देण्याच्या हेतूने व आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ‘संहति डॉट कॉम’वर एक विस्तृत लेख प्रसिद्ध केला. ‘अरविंद ट्रस्ट’च्या वतीने अभिनव सिन्हा यांनी या लेखाचा प्रतिवाद करणारा लेख लिहून जातिप्रश्न, आंबेडकरवाद, जातिसमस्येचे मार्क्‍सवादी विश्लेषण यांसंबधी विस्तृत विवेचन केले. आपल्या समाजातील एका अत्यंत जटिल आणि महत्त्वाच्या समस्येवरील ही महत्त्वपूर्ण चर्चा महाराष्ट्रातील कार्यकर्ते, विचारवंत तसेच विद्यार्थी, तरुण व सामान्य नागरिक यांच्यासमोर येणे तसेच या विषयावर निरोगी चर्चा होणे गरजेचे असल्याने येथे या दोन्ही लेखांचे अनुवाद देत आहोत. त्याचप्रमाणे मूळ चर्चेतील मुद्दे आणि या लेखांतील त्यांचे संदर्भ समजण्याच्या सोयीखातर मूळ चर्चेच्या व्हिडिओची लिंक (http://www.youtube.com/watch?v=TYZPrNd4kDQ) वाचक पाहू शकतात.

आत्ममुग्ध मार्क्‍सवादी व नकली आंबेडकरवाद्यांच्या नावे… – आनंद तेलतुंबडे

आनंद तेलतुंबडे यांना उत्तर: स्वघोषित शिक्षक व उपदेशकर्त्‍यांसाठी – अभिनव सिन्हा

स्फुलिंग १ सप्‍टेंबर २०१४