Author Archives: sfuling.mag

कुपोषणाच्या नावाने कंपन्यांच्या तुंबड्या भरण्याचा धंदा

कुपोषणाचा प्रश्न तसाच राहिला पाहिजे आणि कंपनीचा नफा चालू राहिला पाहिजे यासाठी सरकारची सगळी धडपड. हे सरकाचे कंपन्यांच्या नफ्याचे राजकारण वेळीच ओळखून याला विरोध केला पाहिजे आणि असंघटीत कामगार म्हणून लढणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या लढ्यामध्ये सामील झाले पाहिजे.

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल: भांडवली लोकशाहीच्या दिखाव्याचं नग्न प्रहसन

सर्व सत्ताप्रणाली मोठमोठ्या भांडवलदारांच्या हितासाठीच काम करते.  ज्या पक्षाच्या मागे भांडवली शक्ती उभ्या आहेत, त्यालाच मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये पैसा पुरवला जातो आणि प्रचंड जाहिरातबाजीच्या जोरावर त्या पक्षासाठी वातावरणनिर्मिती केली जाते. निवडणुकीचा निकाल आल्यानंतरही धनबळाचा पूर्ण जोर लावून लोकप्रतिनिधींच्या घोडे बाजारासाठी पैसा पुरवतात ते मोठमोठे भांडवलदारच. त्यामुळे सत्ता येते ती दिसायला एखाद्या पक्षाची असते, पण वास्तवात ती राबवतात ते भांडवलदारच.

नफेखोर व्यवस्था मानव आणि निसर्ग दोघांचाही करतेय विनाश

तुतिकोरीन येथील हत्येमध्ये दिसलेले पोलिसांचे तांडव आजच्या व्यवस्थेचे नरभक्षी आणि फॅसिस्ट चरित्र ठळकपणे दाखवते. ही घटना दाखवते की तथाकथित विकासाचे हे ढोंग मुळात माणसांचे मृतदेह आणि निसर्गाच्या बरबादीवर टिकलेल्या नफ्याच्या हावेला पुरे करण्यासाठी केले जात आहे.  भांडवली दानवी व्यवस्था नफ्याच्या हावेपोटी इतकी वेडी झाली आहे की कष्टकऱ्यांचे जीवन आणि संपूर्ण पृथ्वीच गिळून घ्यायला निघाली आहे.

नेहमीप्रमाणे जनतेच्या तोंडाला पाने पुसणारे केंद्रीय अंदाजपत्रक(बजेट) 2018

प्रत्येक बजेट हे श्रीमंत, मध्यम वर्गासाठीच असते, गरीबांसाठी नाही. दुसरी ही की गरीबांसाठी म्हणून आखल्या जाणाऱ्या योजनासुद्धा गरीबच असतात. गरीबांनी गरीब रहावे, मरू नये एवढ्यासाठीच त्या योजना असतात. तिसरी ही की योजना असली तरी सरकार ती तुमच्या पर्यंत पोहोचावी म्हणून काहीच करत नाही, कारण गरीबांसाठी काही करावे असे वरपासून खालपर्यंत कोणालाच वाटत नाही. आता एवढे असूनही तुमच्यापर्यंत अशा भंगार योजनांची माहिती पोहोचली तरी सरकारी ऑफिसपर्यंत खेटा मारून तुमचा जीव निघून जातो आणि डोंगर पोखरून उंदीर सापडावा एवढे पैसे तुम्हाला मिळतात. जनतेच्या खिशातून वसूली करून कल्याणकारी योजनांच्या नावाने जनतेच्याच तोंडाला पाने पुसण्याचे आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या तुंबड्या भरण्याचे काम बजेटमधून केले जाते. देशाचे खरे मालक कोण आहेत हे समजायचे असेल तर बजेट नक्कीच समजून घ्यायला पाहिजे.

जनतेसाठी बनवलेल्या कायद्यांना दुरुपयोगाच्या बहाण्याने कमजोर करण्याचे षडयंत्र

सरकार आणि प्रशासन हे सुद्धा जाणतात की सर्व अधिकार एकदम हिरावून घेतले तर लोक बंड करतील म्हणून ते अधिकार हळूहळू काढून घेतात आणि अधिकार काढताना सुद्धा जनतेमध्ये जातीय आणि धार्मिक भांडणं लावून देतात. जसे आता अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात होत आहे. जनतेला दलित आणि गैर-दलितांमध्ये वाटले जात आहे. आजही अॅट्रोसिटी होतात त्यात सर्वाधिक आणि सर्वात क्रूर अत्याचार भूमिहीन, गरिबांवरच जास्त होतात. अॅट्रोसिटी कायद्यात होत असलेले बदल हे फक्त दलितांविरोधातील बदल नसून त्यांचे एक वर्गीय चरित्र सुद्धा आहे. भांडवलशाही नग्नपणे कामगारांचे अधिकार तुडवत असताना अॅट्रोसिटी कायद्यात बदल होणे आवश्यकच ठरते. हे लक्षात ठेवले पाहिजे की जर ते आज जनतेच्या एका हिश्श्यासाठी आले असतील तर उद्या आपल्यासाठी सुद्धा नक्की येतील.

महाराष्ट्रात शेतकरी आणि आदिवासींचा लाँग मार्च – आंदोलनाचे मुद्दे, परिणाम, आणि शिकवण

प्रत्येक पीकासोबत दोन-चार हजार रुपये जास्त मिळाले तरी त्यांच्या स्थितीमध्ये कोणताच गुणात्मक फरक पडणार नाही, उलट महागाई वाढून व्याजासोबत त्यांच्या खिशातूनच हे पैसे परत काढले जातील. बेरोजगारीचा मार सहन करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा निर्वाह थोड्याश्या जमिनीतून होऊ शकणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे तर्काच्या आधारावर विचार केला गेला पाहिजे आणि आपल्या खऱ्या वर्ग हितांची ओळख जाणली पाहिजे. बेरोजगारी, वाढती महागाई, सर्वांसाठी शिक्षण आणि आरोग्य सुविधा, भांडवली लुटीचा नाश, दमन-शोषणाचा नाश हे ते मुद्दे असतील ज्यांच्या आधारावर व्यापक जनतेला एकजूट केले जाऊ शकते.

ऐरण प्रकाशनाकडून तरुणांसाठी काही महत्‍वाची पुस्तके

शहिद भगतसिंग यांच्या पाच आणि सोबतच पाच इतर महत्वपूर्ण पुस्तिका
देशातील महान क्रांतिकारक विचारांना जाणून घ्या आणि इतरांना सुद्धा जाणून घेण्यात मदत करा

उद्धरण : स्‍फुलिंग-3, जून 2018

सत्याचा प्रकाश त्या लोकांना त्रासदायक आहे,ज्यांना अंधार सवयीचा झालाय. त्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवणे म्हणजे वटवाघुळांच्या घरट्यात सुर्याचा एक किरण सोडणे, ज्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो व ते चीं-चीं करू लागतात.

केवळ आसाराम नाही तर संपूर्ण धर्माची लुटारू वृत्ती ओळखा

साधू, संत, पाद्री, मौलवी यांचा वापर नेहमीच शोषक वर्ग करीत आलेला आहे. यांच्या बदल्यात भांडवलदारी लुटीचा एक हिस्सा या धार्मिक गटाला मिळत आहे. जसजशी सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थिती बदलते तसा धर्मातही बदल होत जातो. आज भांडवलदारी व्यवस्था कायम झाल्यासारखी दिसतेय आणि त्यामुळे धर्माचे रूपांतरही बाजारी व्यवस्थेत झालेले आहे. स्वतःला “देवदूत” किंवा “परमेश्वराचे रूप” मानणारे हे बाबा, संत हे स्वतःच भांडवलदार झालेले आहेत. ते खरे म्हणजे दलाल, भांडवलदार प्रथम आहेत आणि साधूसंत नंतर आहेत.

« Older Entries Recent Entries »