उद्धरण : स्‍फुलिंग-3, जून 2018

उद्धरण

आपल्या समाजाविषयीचा टीकात्मक दृष्टीकोन जन्मताच आपल्यात नसतोच. आपल्या आयुष्यातील काही क्षण असे असतील (काही महीने वा वर्षे) जेंव्हा काही प्रश्न आपल्या समोर उभे राहिले असतील, ज्यांनी आपल्याला अचंबित केले असेल, ज्याच्या नंतर आपण खोलवर रूजलेल्या काही आस्था-मान्यतांवर प्रश्न उभे केले असतील, अशा मान्यता ज्या पारिवारिक पूर्वाग्रह, रूढीवादी शिक्षण, वृत्तपत्रे, रेडीयो वा टेलीव्हिजनच्या मार्गे मनात घर करून होत्या. यातून एक साधा निष्कर्ष निघतो की आपणा सर्वांवर एक महत्वाची जबाबदारी आहे की आपण लोकांसमोर अशी माहिती घेऊन जावी जी त्यांच्याकडे नाही, अशी माहिती जिच्यामध्ये, दीर्घकाळ चालत आलेल्या आपल्या विचारांवर पुनर्विचार करण्यासाठी बाध्य करण्याची, क्षमता असेल.
हावर्ड जिन (प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार आणि कार्यकर्ते)

 

सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाडं, जोड्यांची किंमत, औषधांच्या किमती सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमान सुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो. त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानातूनच जन्माला येते वेश्या, बेवारस मूल, दरोडेखोर आणि सर्वात वाईट म्हणजे भ्रष्ट अधिकारी, शोषणकारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे तळवेचाटू नोकर.
बर्तोल्त ब्रेख्त

 

निर्मम टीका आणि स्वतंत्र विचार हे क्रांतिकारक विचारसरणीचे दोन आवश्यक गुण आहेत.
शहीद भगतसिंह

 

प्रत्येक कलाकाराला,प्रत्येक वैज्ञानिकाला व प्रत्येक लेखकाला आता निर्णय घ्यावाच लागेल की तो कुठे उभा आहे. संघर्षांच्या पलीकडे ,ओलंपियन उंचीवर उभं राहण्याची कुठलीच जागा असत नाही. तठस्थ प्रेक्षक असा कुणी नसतो…युद्धाची आघाडी प्रत्येक जागी आहे. सुरक्षित आश्रयच्या रूपात कुठलाच पृष्ठभाग उपलब्ध नाही…कलाकाराला बाजू निवडावीच लागेल. स्वातंत्र्यासाठी संघर्ष की मग गुलामी-त्याला कुणा एकाची निवड करावीच लागेल. मी निवड केली आहे. माझ्याकडे अजून कुठलाच पर्याय नाही.
पॉल रॉबसन (प्रसिद्ध क्रांतिकारी अमेरिकी अश्वेत गायक आणि राजकीय कार्यकर्ता)

 

सत्याचा प्रकाश त्या लोकांना त्रासदायक आहे,ज्यांना अंधार सवयीचा झालाय. त्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवणे म्हणजे वटवाघुळांच्या घरट्यात सुर्याचा एक किरण सोडणे, ज्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो व ते चीं-चीं करू लागतात.
देनी दिदेरो

 

स्फुलिंग अंक 3 जून 2018