स्फुलिंग-3, जून 2018

‘स्‍फुलिंग’चा तिसरा अंक डाउनलोड करण्याकरिता येथे क्लिक करावे.

वेगवेगळे लेख वाचण्याकरिता लेखांच्या शिर्षकावर क्लिक करावे.

 

संपादकीय

शिक्षण आणि रोजगार
प्रासंगिक
आंदोलन : समीक्षा-समालोचन
अर्थकारण
जगाच्या पाठीवर
वाद-संवाद
समाज
मीडिया
तत्त्वज्ञान
साहित्य
वारसा

 

अंकाची किंमत रुपये 30 आहे. ज्यांना स्फुलिंगचा अंक हवा आहे त्यांनी 9422308125 या  क्रमांकावर संपर्क साधावा व  आपला नाव पत्ता फोन नंबर व्हाटसप वरून कळवावा. या आणि पुढील तीन अशा चार अंकांची किंमत रुपये 150 आहे (पोस्टाचा  खर्च धरून).

स्फुलिंग बाबत 
⇒ स्फुलिंग प्रतिकुलतेच्या या कठीण अंधकारमय समयी क्रांतीच्या नवीन अध्यायांच्या तयारीसाठी युवक वर्गाला आवाहन करत आहे. स्फुलिंग एका नवीन क्रांतिकारी नवजागरणाचा आणि प्रबोधनाचा शंखनाद करत आहे. नवीन क्रांतीची नेतृत्वकारी शक्ती निर्माण करण्यासाठी, तिची मार्गदर्शक वैज्ञानिक जीवनदृष्टी अणि इतिहासबोधाची समजदारी स्थापित करण्यासाठी आणि भारतीय क्रांतीच्या मार्गाची योग्य समजदारी विकसित करण्याच्या उद्देशाने विचार-विनिमय आणि वाद-विवादासाठी सामान्य जनतेच्या विवेकशील, वीर युवक युवतींना आमंत्रित करत आहे. स्फुलिंग क्रांतीच्या आत्म्याला जागृत करण्याच्या गरजेची जाणीव आहे. एक नवीन क्रांतिकारक चेतना निर्माण करण्याच्या आसक्तीची अभिव्यक्ती आहे. जर लोक लोखंडाच्या भिंतींमध्ये कैद, गुंगीच्या गाढ झोपेतही असतील तरीही आपल्याला सतत आवाज द्यावाच लागेल. झोपेत घुसमटणाऱ्या जीवांच्या कानापर्यंत सतत जाणारा आपला आवाज कधीतरी त्यांना नक्कीच जागवेल. विसरता कामा नये की एक ठिणगी सुद्धा  संपूर्ण जंगलात आग लावू शकते.
⇒ स्फुलिंग जीवनाच्या अशाच घुसमटणाऱ्या परिस्थितीला बदलण्यासाठी सर्व जिवंत लोकांना आवाहन करत आहे. आम्ही त्या सर्व लोकांना आवाहन करत आहोत जे खऱ्या अर्थाने तरूण आहेत. ज्यांच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ, भित्रेपणा,   दुनियादारी,  धनपिपासू वृत्ती, करियरवाद आणि पद-मान-सन्मानाच्या गळाकाटू स्पर्धेशी लढण्याची तयारी आणि जिद्द आहे, ज्यांच्या धमण्यांमध्ये उष्ण रक्त वाहत आहे. जे न्याय, सौंदर्य, प्रगती आणि शौर्याचे पुजारी आहेत. स्फुलिंग  जनतेच्या सेवेत लागण्यासाठी कष्टकरी जनतेमध्ये मिसळून त्यांच्या मुक्तीचा झेंडा हातात घेण्यासाठी अशाच तरुणांना आवाहन करत आहे. सामाजिक क्रांत्यांची सुरूवातीची कठीण आव्हाने स्विकारण्यासाठी अगोदर जनतेचे शूर तरूण-तरूणीच  पुढे येतात. इतिहासाच्या रथाची चाकं तरुणांच्या उष्ण रक्तानेच लथपथ असतात.