कॉर्पारेट भांडवली प्रसारमाध्यमांचे वर्चस्व आणि क्रांतिकारी वैकल्पिक प्रसारमाध्यमांसमोरील आव्हाने

भांडवलशाही ह्या अगोदरच्या सर्व शोषण व्यवस्थांच्या तुलनेत अनेक अर्थांनी भिन्न आहे. आर्थिक आणि राजकीय पातळीवरील सगळ्या वेगळेपणाबरोबरच एक मोठा फरक हा आहे की भांडवलशाही अंतर्गत शोषक-उत्पीडक वर्गांची सत्ता एकतर्फी प्रभुत्वावर नव्हे तर वर्चस्वावर आधारलेली असते.