वाचकपीठ
मराठी साहित्याच्या वैचारिकतेचा परीघ दिवसेंदिवस आक्रसत असतानाच्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक जीवनावर फासिवादाचे मळभ दाटून आलेले असतानाच्या काळात ‘स्फुलिंग’च्या रुपात आशेचा नवीन किरण बघावयास मिळत आहे, ही नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे. खास करून युवकांच्या अपेक्षा आणि आकांक्षांना भांडवली संकटामुळे जे जबर धक्के बसले आहेत त्यामागचे ‘स्फुलिंग’ इतके सविस्तर विश्लेषण दुसऱ्या कुठल्याही मासिकामध्ये आलेले नाही. विषयांचे वैविध्य आणि त्यांची जनवादी दृष्टीकोनातून केली गेलेली मांडणी हे ‘स्फुलिंग’चे बलस्थान आहे. भांडवली अजगराचा विळखा समाजाभोवती अधिकाधिक घट्ट होत असताना समाजाला एका नवीन प्रबोधन पर्वाच्या दिशेने उद्युक्त करण्याच्या दृष्टीने, येणाऱ्या दिवसांमध्ये मराठी वाचकांमध्ये ‘स्फुलिंग’चा प्रसार महत्वाचा ठरणार आहे. त्यासाठी ‘स्फुलिंग’च्या सर्व टीम ला शुभेच्छा!