Monthly Archives: April 2015

दिल्ली मध्ये ‘आम आदमी पक्षा’चा विजय आणि कष्टकरी जनतेसाठी काही धडे

केजरीवाल आणि ‘आम आदमी पक्ष’ ही सद्य परिस्थितीत भांडवली व्यवस्थेची गरज आहे. ते भांडवली समाज आणि व्यवस्थेच्या असमाधेय अंतर्विरोधांचे वर्गचारित्र्य लपवण्याचे काम करतात आणि वर्गसंघर्षांच्या चेतनेची धार बोथट करण्याचे काम करतात. हीच भूमिका एका वेळी भारतीय भांडवली राजकारणाच्या इतिहासामध्ये ‘जेपी’ आंदोलनाने बजावली होती. आज एका दुसऱ्या रूपात भारतीय भांडवली राजकारण आणि अर्थव्यवस्था भयंकर अशा संकटाने ग्रस्त आहे. त्याचे एक हुकूमशाही आणि फॅसिस्ट समाधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजपची सांप्रदायिक फॅसिस्ट सरकार सादर करत आहे, तर दुसरीकडे दुसरे समाधान ‘आम आदमी पक्ष’ आणि अरविंद केजरीवाल सादर करत आहेत. हे सांगायची आवश्यकता नाही की केजरीवाल यांची ही लाट त्यानी स्वत: केलेल्या घोषणा पूर्ण न करू शकण्याबरोबरच किंवा त्यांपासून माघार घेण्याबरोबरच विरून जाईल आणि आज जे लोक भांडवली व्यवस्थेला वैतागून प्रतिक्रियेच्या रूपात केजरीवाल यांच्या मागे गेले आहेत, त्यातील बहुतांशी लोक अगोदरपेक्षा अधिक प्रतिक्रियावादी होऊन भाजप आणि संघ परिवार यांच्यासारख्या आत्यंतिक उजव्या, फॅसिस्ट शक्तींच्या – जे कामगार वर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत – समर्थनात पुढे येतील.

Recent Entries »