Tag Archives: विज्ञान

विज्ञानाकरिता प्राणांचे दान देणारा शहीद वैज्ञानिक ब्रुनो

आजपासून ठीक 422 वर्षांआधी 17 फेब्रुवारीला सन 1600 मध्ये आपल्या तत्त्वांसाठी बलिदान देणाऱ्या महान वैज्ञानिक जर्दानो ब्रूनो ला रोम मध्ये मृत्युदंड दिला गेला होता. मृत्युदंड देण्याचा ‘न्यायालयाचा’ निर्णय ऐकून ब्रूनो ने ‘इन्क्विझिटर’ना (inquisitor) शांतपणे सांगितले होते “तुम्ही दंड देणार आहात आणि मी आपला गुन्हेगार आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की दयाळू देवाच्या नावावर आपला निर्णय देतांना सुद्धा तुमचे हृदय माझ्यापेक्षा अधिक भयग्रस्त आहे.” ‘इन्क्विझिशन’ ची ही प्रथा होती की ते आपला निर्णय या धूर्ततापूर्ण शब्दांमध्ये द्यायचे – “पवित्र धर्म