Tag Archives: महिलाविरोधी अपराध

वाढत्या महिलाविरोधी अपराधांचे मूळ आणि त्यावरील उपाय

महिलाविरोधी अपराधांच्या मुळाशी न जाण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये सर्रास पाहावयास मिळते. या अपराधांच्या मुळाशी न जाऊ शकल्यामुळेच ते अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाय देण्यास असमर्थ ठरत आहेत. याच भांडवली व्यवस्थेच्या चौकटीत काही कडक कायदे, गुन्हेगारांना क्रूर मृत्युदंड आदी उपाय या समस्येवरच्या तोडग्याच्या रूपात पाहिले जातात. ही एकंदर समस्या समजून घेण्यासाठी आपण तिच्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आदी सर्व कारणांची चिकित्सा केली पाहिजे, तेव्हाच आपण या समस्येची सोडवणूक करण्यास समर्थ होऊ.