प्रेम आणि मुक्तीचे गीतकार: जनकवी फैज
(फैज अहमद फैज यांच्या 13 फेब्रुवारी या जन्मदिनानिमित्त ) लेखक: अमन “क़त्ल-गाहों से चुन कर हमारे अलम और निकलेंगे उश्शाक़ के क़ाफ़िले..” [न्याय आणि समतेच्या या संग्रामात कत्तलखान्यांतून आमची कत्तल जरी करण्यात आली तरी आमच्या खाली पडलेल्या ध्वजा उचलण्यासाठी अजून कित्येक प्रेमी त्यांचे लष्कर घेऊन येतील.] उर्दू कवितेच्या इतिहासात जे स्थान फैज अहमद फैजना जनतेने आपल्या हृदयांत दिले ते कदाचितच इतर कोणाला मिळाले असेल. “हम देखेंगे” हे गीत तर सांप्रदायिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जनतेचे युद्धगीतच बनले होते. 13 फेब्रुवारी