Tag Archives: कोव्हिड19

कोरोना षडयंत्र सिद्धांत: वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाचे परिणाम

लेखक: निखिल आज कॉविड -19 महामारीचा उद्रेक होऊन 2 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. दरम्यानच्या काळात जग अतोनात जीवित तसेच वित्तीय हानीतून गेले आहे आणि साहजिकच भांडवली समाजातील इतर बहुतांशी सामाजिक संकटांप्रमाणे ह्या आरोग्य संकटाचा सर्वाधिक मार जगभरातील कामकरी जनतेवरच पडला. ध्वस्त झालेली एकंदरीत आरोग्य व्यवस्था, खाजगी दवाखान्यांची लूट, ऑक्सिजन पासून औषधींचा काळाबाजार सोबतच केंद्र व राज्यसरकारांच्या अनियोजित लोकडाऊनमुळे उपासमार, बेकारी व अनेक प्रवासी कामगारांची हजारो किलोमीटरची पायी फरफट अशा किती समस्या सांगाव्यात? ह्या आरोग्य संकटाच्या काळात भांडवली आर्थिक व्यवस्थेचा