Tag Archives: कथा

कथा: करोडपती कसे असतात!! / मॅक्सिम गॉर्की Story – The Billionaire / Maxim Gorky

मी माझं म्हणणं पुन्हा एकदा मांडतो की गरीबांसाठी धर्म अत्यंत गरजेचा आहे. मला हे आवडतं. तो म्हणतो कि या पृथ्वीवरील सर्व वस्तू सैतानाच्या आहेत आणि हे मानवा जर तू आपल्या आत्म्याला वाचवू पाहतोस तर पृथ्वीवरील कोणत्याच वस्तूला स्पर्श करायची देखील लालसा बाळगू नकोस. जीवनातील सर्व सुखे तुला मरणानंतर भेटतील. स्वर्गातील प्रत्येक वस्तू तुझीच आहे. जेव्हा लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांना काबूत ठेवणं सोपं जाते. हो. धर्म एका चिकट वंगणासारखं काम करतो आणि जीवनाच्या यंत्राला आपण हे वंगण सतत घालत राहिलो तर सारे भाग व्यवस्थित काम करत राहतात आणि यंत्र चालविणाऱ्यासाठी सोपं होतं.

किचाट – सुदेश जाधव यांची कथा

नऊ वाजल्यापासून लोकांची वर्दळ जास्तीच वाढली होती. कार्यकर्त्‍याना चांगलाच घाम फुटला होता. घामामुळे कपाळावरच्या टिक्क्यांचा वरघळ अगदी तोंडापर्यंत आला होता. बायांच्या मेणबत्त्या दुसऱ्यांदा संपल्या. त्या पेटवण्याचा तिसरा राउंड होता. गजरे सुकत चालले होते. तोंडावरची पावडर केव्हाच उडाली होती. मुख्यमंत्री साहेब आणि नटी केव्हाही येऊ शकतात या आदरापोटी बिचाऱ्या झक मारून प्रतिष्ठित नवऱ्यांच्या मानासाठी उभ्या होत्या. शमी एवढ्या गर्दीत असून नसल्यासारखीच उभी होती.