कविता : एस.ए. सैनिकाचे गीत / बेर्टोल्ट ब्रेष्‍ट

एस.ए.Ϯ सैनिकाचे गीत

बेर्टोल्ट ब्रेष्‍ट (अनुवादः अभिजित)

 

भुकेनं बेहाल झोपलो मी
घेऊन पोटात कळ,
तेवढ्यात ऐकू पडले आवाज
उठ, जर्मनी उठ!
मग दिसली लोकांची गर्दी मार्च करताना
थर्ड राईखϮϮ कडे, ऐकले मी त्यांना म्हणताना,
मी म्हटले माझ्याकडे जगायला नाही काही
तर मी पण का न जावे त्यांच्या सोबत,
आणि मार्च करत होता माझ्यासोबत सामील
जो होता त्यांच्यामध्ये सर्वात जाड
आणि जेव्हा मी ओरडलो ‘अन्‍न द्या, काम द्या’
तेव्हा तो जाडाही ओरडला,
तुकडीच्या नेत्याच्या पायांवर होते बूट
जेव्हा माझे पाय होते ओले
पण आम्ही दोघेही करत होतो मार्च
पाय जुळवत जोशाने,
मी विचार केला, डावा रस्ता  घेऊन जाईल पुढे
त्याने म्हटले मी होतो चूक
मी ऐकला आदेश त्याचा
आणि डोळे मिटून राहिलो चालत मागे,
आणि जे होते भुकेने कमजोर
पिवळे-जर्द चेहरे घेऊन राहिले चालत
भरल्या पोटावाल्यांसोबत करत कदमताल
थर्ड राईखच्या दिशेने,
आता माहित आहे मला, तिथे उभा आहे माझा भाऊ
भूकच आहे जी जोडते आम्हाला
जेव्हा की मी मार्च करतो त्यांच्यासोबत
जे शत्रू आहेत माझे आणि भावाचेही,
आणि आता मरतोय माझा भाऊ
माझ्याचा हातांनी मारले त्याला
जाणतो जरी की तो हारला तर
वाचणार नाही मी सुद्धा-

Ϯ एस.ए.: जर्मनी मध्ये नाझी पक्षाद्वारे उभ्या केलेल्या फॅसिस्ट बळाचे संक्षिप्त नाव- उग्र फॅसिस्ट प्रचाराद्वारे यामध्ये मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण आणि कामगारांची भरती करण्यात आली त्यांचे मुख्य काम होते ज्यू आणि विरोधी पक्षांवर विशेषतः कम्युनिस्टांवर हल्ले करणे आणि दहशत पसरवणे

ϮϮ थर्ड राइख़: 1933 ते 1945 दरम्यान नाझी पार्टी शासित जर्मनीलाच थर्ड राइख़ म्हटले जात होते