वाढत्या साम्राज्यवादी संघर्षाची अजून एक रणभूमी: युक्रेन
अभिजित रशिया आणि अमेरिकेच्या साम्राज्यवादी गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे आणि यावेळी तो युक्रेनच्या धरतीवर युद्धाचे स्वरूप घेण्याकडे जात आहे. लेनिनने केलेली साम्राज्यवादाची मांडणी आजही लागू होते, आणि भांडवली प्रतिस्पर्धा साम्राज्यवादी संघर्षांना व युद्धांना जन्म देतेच हे या घडामोडीने पुन्हा सिद्ध केले आहे . आता अमेरिकेच्या नेतृत्वातील एकध्रुवीय (युनीपोलर) जग निर्माण झाले आहे म्हणणाऱ्या किंवा जागतिक भांडवलशाही आता शांततेच्या कालखंडात प्रवेश करती झाली आहे असे म्हणणाऱ्यांना सुद्धा या घटनांनी पुन्हा एकदा खोटे ठरवले आहे. भारतातील आणि जगातील भांडवली