जवखेड दलित हत्याकांडाने पुन्हा उघडकीस आणले व्यवस्थेचे वास्तव

देशातील दलित अत्याचारांचा इतिहास पाहता जे काही या प्रकरणात घडले त्यात आश्चर्य़ वाटण्यासारखे खरे तर काहीच नाही. पीडित कुटुंबातील व्यक्तींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, जातीय अत्याचारांच्या प्रकरणांना अनैतिक शरीर संबंधांतून झालेल्या खूनाचे रूप देणे हे गेल्या काही काळापासून वारंवार घडते आहे. या प्रकरणातही पुन्हा तेच पाहावयास मिळाले. त्यानंतर ‘दलित अत्याचार विरोधी कृती समिती’च्या सत्यशोधन समितीने पोलिस तपासाचा आढावा घेतला. सत्यशोधन समितीचा अहवाल पोलिस प्रशासनापासून मुख्यमंत्र्यापर्यंत अनेकांच्या या प्रकरणातील भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. या अहवालाचा काही अंश आणि त्याने उपस्थित केलेले प्रश्न येथे देत आहोत.