Tag Archives: अक्षय काळे

गाब्रिएल गार्सिया मार्केझ : वास्तवाचा मायावी चित्रकार

गाब्रिएल गार्सिया मार्केझ म्हणजे इतिहासावर जादू करून कादंबरीत जीवनाच्या ताणतणावांचे धागे विणणारा वास्तवाचा कवी. या कादंबऱ्यांमध्ये लोक संघर्ष करतात, प्रेम करतात, हरतात, दडपले जातात आणि विद्रोह करतात. ब्रेष्टने म्हटले आहे की साहित्याने वास्तवाचे जसेच्या तसे चित्रण करायचे नसते तर पक्षधर लिखाण करायचे असते. मार्केझच्या कादंबऱ्यांमध्ये, प्रामुख्याने ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’, ‘ऑटम ऑफ दि पॅट्रियार्क’ व ‘लव्ह अ‍ॅण्ड दी अदर डेमन’मध्ये त्यांची लोकपक्षधरता स्पष्टपणे दिसून येते. मार्केझ यांच्या जाण्याने लॅटिन अमेरिकन साहित्यातील एक गौरवशाली युग समाप्त झाले आहे.