फेक न्यूजः डिजीटल माध्यमांमधून समाजाच्या नसांमध्ये भिनणारे द्वेषाचे विष
इंटरनेट, सोशल मीडिया आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून समाजामध्ये खोट्या बातम्या पसरविण्याच्या घटना, ज्यांना फेक न्यूजच्या नावाने ओळखले जाते, जगभरात भयावह रुप धारण करत आहे. अमेरिकेमध्ये मागील राष्ट्रपती निवडणूकीत ट्रंपच्या कार्यकर्त्यांनी या फेक न्यूजचा मोठ्या प्रमाणात वापर करत अप्रवासी, मुस्लिम व लॅटीन लोक आणि काळ्या लोकांच्या विरोधात घृणास्पद वातावरण बनविले, ज्याचा ट्रंपच्या विजयात सिंहाचा वाटा होता. याचप्रकारे युरोप खंडातील भरपुर देशांमध्ये सुध्दा अप्रवासियांच्या विरोधात घृणा पसरविण्यामध्ये फेक न्यूजचा चांगलाच वापर सुरु आहे. ब्रिटनमध्ये युरोपीय संघातून वेगळं होण्यासाठी झालेल्या जनमत चाचणी दरम्यान सुध्दा फेक न्यूजचा खुल्या प्रकारे वापर केला गेला. परंतु भारतात फेक न्यूजच्या घटना ज्याप्रकारे पसरत आहे तशी परिस्थिती क्वचितच अन्य कुठल्या देशात बघावयास मिळेल. याचे मुख्य कारण हे आहे की, भारतामध्ये अधिकांश फेक न्यूज संघासारख्या केडर आधारित फॅसिस्ट संघटनांद्वारे संघटित मार्गाने पसरविल्या जात आहेत, ज्यांचा संपर्क देशातील कानाकोपऱ्यापर्यंत आहे.