गाझामध्ये इजरायलच्या नृशंस नरसंहाराच्या विरोधात देशभरात निदर्शने

गाझामध्ये इजरायलच्या नृशंस नरसंहाराच्या विरोधात देशभरात निदर्शने

2014-07-14-DLI-Palestine  protest-31

दिल्‍ली

या शतकातील सर्वाधिक निर्घृण नरसंहार, म्हणजेच गाझातील नागरिकांवर इजरायलच्या हवाई हल्ल्यांच्या विरोधात जगभरात निदर्शने होत आहेत. भारतात बिगुल मजदूर दस्ताशी संबंधितांनी या मुद्द्यावर पुढाकार घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली व देशात ठिकठिकाणी निदर्शने आयोजित करण्यात आघाडीवर राहिले.

दिल्लीत १३ जुलै रोजी इजरायली दूतावासासमोर निदर्शन करून इजरायली राजदूत आणि भारत सरकारच्या नावे पत्रक सादर करण्यात आले व गाझावरील इजरायली हल्ला ताबडतोब थांबविण्याची मागणी करण्यात आली. सामान्य न्यायप्रिय नागरिकांच्या वतीने गाझा के पक्ष में एकजुट भारतीय जनच्या बॅनरखाली आयोजित या निदर्शनांमध्ये दिल्ली आणि आसपासचे शेकडो विद्यार्थी, तरुण, बुद्धिजीवी, कलाकार आणि सामान्य नागरिकांनी जियनवादी साम्राज्यवादी हल्ल्यांच्याविरोधात आवाज बुलंद केला.

मुंबई

मुंबई

निदर्शनानंतर इजरायली राजदूताच्या नावे पत्रक पाठविण्यात आले ज्यामध्ये बाँबवर्षाव ताबडतोब बंद करण्याची व पॅलेस्टाईनची घेरेबंदी थांबविण्याची मागणी करण्यात आली. भारत सरकारला दिलेल्या पत्रकात मागणी करण्यात आली की भारत सरकारने इजरायलच्या राजदूतांपाशी बाँबवर्षाव तात्काळ थांबविण्याची मागणी करावी, तसेच राजदूतांना ताकीद द्यावी की गाझावरील बाँबवर्षाव न थांबल्यास भारत इजरायलशी सारे राजकीय संबंध समाप्त करेल, तसेच भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाची आपात बैठक बोलावण्याची मागणीदेखील करण्यात आली.

मुंबईत पोलिसांच्या दबावाला झुगारून शेकडो विद्यार्थी, युवक, बुद्धिजीवी आणि नागरिकांनी इजरायलच्या वाणिज्य दूतावासासमोर निदर्शन करून गाझात सुरू असलेल्या नृशंस नरसंहाराविरोधात निषेध प्रकट केला. या निदर्शनात सहभागी झालेल्या मुख्य संघटना होत्या – भारत-फिलिस्तीन एकजुटता फोरम, बिगुल मजदूर दस्ता, युनिव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमोक्रेसी अ‍ॅण्ड इक्वॉलिटी, नौजवान भारत सभा, रिपब्लिकन पँथर, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, भारत बचाओ आंदोलन, विद्यार्थी भारती, फेडरेशन ऑफ माइनॉरिटिज ऑफ महाराष्ट्र, मुस्लिम इंटेलेक्च्युअल फोरम, फुले-आंबेडकर विचार मंच, इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीज अ‍ॅण्ड कॉन्फ्लिक्ट रिजोल्यूशन.

लखनौमध्ये गाझा

लखनौ

लखनौ

तील सामान्य नागरिकांवर इजरायलचा हल्ला म्हणजे निर्दोषांचे हत्याकांड असल्याचे घोषित करून नागरिक, बुद्धिजीवी, कलाकार, विद्यार्थी-तरुण, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्‍यांनी विरोध मोर्चा काढला आणि गाझावरील हल्ला त्वरित थांबविण्याची मागणी केली. सरोजिनी नायडू पार्कपासून सुरू झालेला मोर्चा हजरतगंजमार्गे पत्रके वाटत जीपीओपाशी पोहोचला. गाझा के पक्ष मे एकजुट भारतीय जनच्या बॅनरखाली आयोजित या निदर्शनात वक्तयांनी सांगितले की जगभरातून विरोध होत असूनही इजरायली सत्ता गाझातील सामान्य नागरिकांवर हल्ले करीत आहे आणि जगभरातील सरकारे मुकाट हा नरसंहार पाहात आहेत. पाच दिवसांत १५२ लोक मारले गेले आहेत आणि १००० हून अधिक जखमी व विकलांग झाले आहेत. यांमध्ये जवळपास निम्मे मुले, महिला आणि वृद्ध आहेत. या शतकातील सर्वाधिक निर्घृण अशा या नरसंहारावर भारत सरकार आणि वेगवेगळ्या पक्षांचे मौन निंदनीय आहे. पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या पाठिंब्याच्या बळावर इजरायलने चालविलेली गुंडगिरी रोखण्यात आली नाही तर तेथे कधीच शांती स्थापित होऊ शकत नाही. निदर्शनात भारत सरकारला संबोधित केलेले पत्रक पास करून जिल्हा प्रशासनामार्पâत पाठविण्यात आले. या पत्रकात मागणी करण्यात आली आहे की भारत सरकारने इजरायलच्या या हल्ल्याची निंदा करावी तसेच गाझामध्ये निर्दोषांचे हत्याकांड थांबविण्याची मागणी करावी, व इजरायलने असे न केल्यास भारत सरकारने इजरायलशी आपले राजकीय संबंध समाप्त केले पाहिजेत.

अलाहाबादमध्ये शहिद भगतसिंह विचार मंचाच्या वतीने शहरात विरोध मोर्चा काढण्यात आला आणि ठिकठिकाणी सभा घेऊन पत्रके वाटण्यात आली. या सभांमध्ये वक्तयांनी सांगितले की इजरायल वारंवार आत्मरक्षणाचे निर्लज्ज कारण देत नवजात मुले, वृद्ध महिला आणि इस्पितळांमध्ये भरती रोग्यांचेही जीव घेतो आहे परंतु इजरायलचा हा सरकारी दहशतवाद संयुक्त राष्ट्रसंघाला दिसत नाही. पटनामध्ये नौजवान भारत सभाच्या कार्यकर्त्‍यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये घोषणा देत मोर्चा काढला आणि कोपरा सभा घेऊन पत्रके वाटली.

स्फुलिंग १ सप्‍टेंबर २०१४