इजरायली जियनवादी आणि अमेरिकन साम्राज्यवाद्यांची कबर अरब भूमीत खोदली जाईल!

इजरायली जियनवाद्यांचा गाझा पट्टीवर नृशंस हल्ला
हे रक्त वाया जाणार नाही! इजरायली जियनवादी आणि अमेरिकन साम्राज्यवाद्यांची कबर अरब भूमीत खोदली जाईल!

अन्तरा घोष

gaza attack 1८ जुलैपासून इजरायलने गाझा पट्टीतील निःशस्त्र नागरिक, मुले, स्त्रियांवर पुन्हा हल्ला सुरू केला आहे. हा गेल्या सहा वर्षांतील इजरायलचा गाझापट्टीवरील तिसरा मोठा हल्ला आहे. हा लेख लिहिला जाईपर्यंत गाझामध्ये जवळपास साडेपाचशे लोक मारले गेले आहेत. त्यांत प्रामुख्याने स्त्रिया, मुले आणि वृद्ध आहेत. ट्रेकिंगसाठी जाऊन नंतर बेपत्ता झालेल्या आपल्या तीन किशोरवयीन मुलांचे अपहरण आणि हत्या हे गाझावरील हल्ल्याचे कारण असल्याचे इजरायलने सांगितले होते. नंतर त्यांचे मृतदेह सापडले. परंतु गाझा पट्टीवर सत्तेत असलेली पॅलेस्टिनी संघटना ‘हमास’ने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तसेच या हत्या ‘हमास’ने केल्याचा कोणताही ठोस पुरावा अजून तरी सापडलेला नाही. असे असूनही पुराव्यांची अवहेलना करून इजरायलने ८ जुलैपासून गाझा पट्टीवर भयंकर गोळीबार आणि हवाई बॉम्बवर्षाव सुरू केला. या हल्ल्यांमध्ये इजरायल पांढरे फॉस्फरस आणि वेगवेगळया प्रयोगात्मक शस्त्रांचा वापर करीत आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे २००४ मध्ये इजरायलने आपली सेना आणि जनतेला गाझा पट्टीतून हलवले होते. त्यानंतर गाझातील विजय आणि ‘हमास’वरील नियंत्रणावरून संघर्ष सुरू झाला ज्यात शेवटी ‘हमास’ने विजय मिळवला. गाझा पट्टीतील निवडणुकांमध्येदेखील ‘हमास’ला प्रचंड समर्थन मिळाले आणि ‘हमास’ने लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार बनवले. तेव्हापासून इजरायल गाझा पट्टीवर हल्ले करीत आहे. २००६, २००८-०९, २०१२ आणि आता २०१४. इजरायलला लक्ष्य बनवून केल्या जाणाऱ्या ‘हमास’च्या दहशतवादी कारवाया हेच गाझा पट्टीवरील हल्ल्यांचे कारण असल्याचे इजरायल सांगत आहे. गाझा पट्टीतून होणारे रॉकेट हल्ले आणि बोगद्यांतून होणारी घुसखोरी हे आपल्या नृशंस हल्ल्यांचे कारण असल्याचे इजरायल शासकांकडून सांगितले जाते. परंतु हेच जर कारण असेल तर पॅलेस्टाईनचा दुसरा प्रदेश वेस्ट बँकमधील इजरायलच्या अत्याचारांचे कारण काय आहे? तेथून तर रॉकेटचा मारा केला जात नाही! ना तेथून कोणतीही आक्रमक इजरायल विरोधी कारवाई केली जाते! मग वेस्ट बँकमधील पॅलेस्टाईनच्या नागरिकांचे अपहरण, हत्या आणि उत्पीडन केले जाते ते कशासाठी? त्यांना विस्थापित करून इजरायल आपल्या यहुदी वस्त्या का वसवित आहे? तेथे तर पॅलेस्टाईनच्या प्राधिकाराचा आणि विजयाचा बोलबाला आहे! तेथे तर ‘हमास’चे शासन नाहीये!

gaza attack 2वास्तविक, ‘हमास’चा नाश करणे हा इजरायलचा खरा हेतू आहे. इजरायललासुद्धा पक्के ठाऊक आहे की अशा हल्ल्यांनी ना ते ‘हमास’ला संपवू शकले आहेत ना कधी संपवू शकतील. सत्य हे आहे की २००४ पासून अशा प्रत्येक हल्ल्याने ‘हमास’ला अधिक बळकट आणि अधिक लोकप्रिय बनविले आहे. या हल्ल्यातदेखील इजरायल ‘हमास’ची विशेष हानी करू शकलेला नाही आणि त्यांच्या अंदाधुंद गोळीबाराचे लक्ष्य गाझातील निर्दोष मुले, स्त्रिया आणि अन्य नागरिकच बनले आहेत. १८ जुलैला इजरायलने जमिनी हल्ला सुरू केल्याच्या केवळ एका दिवसानंतर ‘हमास’ने इजरायलच्या १३ सैनिकांना ठार केले व एकाला कैद केले. आतापर्यंत इजरायलचे १९ सैनिक मारले गेले आहेत. इजरायलच्या त्या तुकडीतील सैनिकाने सांगितले, ‘‘आमच्या समोर एखादी आदिम सेना नव्हती. ते अतिशय प्रगत शस्त्रांनी सज्ज होते, उत्तम प्रकारे प्रशिक्षित होते, ते पळून जात नव्हते, ते तर आमची प्रतीक्षा करीत होते’’. इजरायल आणि अमेरिकेसारखे साम्राज्यवादी इतिहासाकडून कधीच धडा घेत नाहीत. लेबेनॉनकडून मार खाऊन पळवून लावले जाण्याचा त्यांना विसर पडला आहे. तसेच त्याअगोदर २००४ आणि २००६ मध्ये पॅलेस्टाईनच्या प्रतिरोधाने तोंडघशी पडल्याचाही त्यांना विसर पडला आहे. अशा सर्वच हल्ल्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या जनतेचे मोठ्या प्रमाणात हत्याकांड झाले आहे, हे सत्य आहे. परंतु पॅलेस्टाईनच्या जनतेचे इजरायलच्या कब्ज्याविरोधातील प्रतिरोधाचे त्यामुळे संपलेले नाही, उलट ते बळकट होत आहे व पुढे जात आहे. इजरायलच्या हल्ल्यानंतर गाझातील मशिदी रोज घोषणा करत होत्या, ‘‘हिम्मत ढळू देऊ नका. धैर्य राखा. विजय मिळणार’’. १८ जुलै रोजी इजरायलच्या १३ सैनिकांना मारून आणि एकाला कैद करून ‘हमास’ने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

gaza attack 3आपण आत्मरक्षेखातर हल्ले करीत असून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचे इजरायल वारंवार सांगत आहे. वास्तविक, अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या ज्यांच्या अधिकारावर वारंवार हल्ले करण्यात आलेत ते पॅलेस्टाईनचे नागरिक आहेत. दुसऱ्या महानंतर संयुक्त राष्ट्राने यहूदी हे राज्यापासून वंचित राष्ट्र असल्याचे सांगून त्यांच्या प्राचीन भूमीत त्यांच्यासाठी एक राज्य निर्माण करण्याची योजना बनविली. या योजनेची अंमलबजावणी करीत १९४७-४८ मध्ये युरोप आणि जगातील अन्य भागांत यहूदी विरोधाने प्रताडित झालेल्या प्रचंड यहुदी जनतेला तत्कालीन पॅलेस्टाईनच्या भूमीत वसविले गेले. इजरायलची जी योजना बनविण्यात आली होती, हळूहळू त्या योजनेच्या पलीकडे जाऊन जियनवाद्यांनी पॅलेस्टाईनच्या अरब नागरिकांकडून त्यांच्या जमिनी हिसकावून घ्यायला सुरुवात केली. ब्रिटीश आणि अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या मदतीने सतत पॅलेस्टाईनच्या नागरिकांना विस्थापित केले व हळूहळू पॅलेस्टाईनच्या जनतेला गाझा पट्टी आणि वेस्ट बँकच्या प्रदेशांपुरते मर्यादित करून ठेवले.  विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत आशियातील बहुतांश तेल क्षेत्र आणि नैसर्गिक वायु क्षेत्र सापडलेले होते. पाश्चिमात्य साम्राज्यवाद्यांना पश्चिम आशियामध्ये आपला एक चेक पोस्ट आणि एक पहारेकरी हवा होता. या हेतूने पाश्चिमात्य साम्राज्यवाद्यांनी पॅलेस्टाईनच्या भूमीत वसविलेल्या यहुद्यांमध्ये अंकुरत असलेल्या घोर दक्षिणपंथी जियनवादी गटांना हत्यारे, पैसे आणि प्रशिक्षण पुरविण्यास सुुरुवात केली. या जियनवाद्यांनी १९५०-६० च्या दशकांपासूनच ठिकठिकाणी पॅलेस्टाईनच्या अरब लोकांच्या गावांचा नरसंहार करण्यास, त्यांना उद्ध्वस्त करण्यास आणि त्यांच्याशी भेदभावाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. याचबरोबर पॅलेस्टाईनच्या जनतेचा आपल्या राज्याच्या अधिकारासाठीचा संघर्षदेखील सुरू झाला. या संघर्षात समस्त अरब जनतेची भावना उद्ध्व करण्यात येणाऱ्या पॅलेस्टाईनच्या जनतेसोबत होती. दोन मोठी आणि एक लहान इजरायल–अरब देखील झाली ज्यांमध्ये अमेरिका आणि अन्य साम्राज्यवाद्यांच्या मदतीच्या बळावर तसेच अरब देशांतील अंतर्विरोध आणि कमकुवत सैनिकी तयारीमुळे इजरायललाच विजय प्राप्त झाला. परंतु या दरम्यान पॅलेस्टाईनच्या प्रतिरोधाच्या ामुळे इजरायललादेखील बऱ्यापैकी हानी सोसावी लागली. परंतु १९४७ पासून २०१४ पर्यंतच्या इतिहासावरून नजर फिरविल्यास इजरायलच्या जियनवाद्यांद्वारे पॅलेस्टाईन देश नष्ट करण्याची प्रक्रियाच ठळकपणे दिसून येते. याच प्रक्रियेच्या विरोधात पॅलेस्टाईनवासीय अखंडपणे लढत आहेत व ही प्रक्रिया यशस्वी होऊ देत नाहीयेत.

इजरायल आज पॅलेस्टाईनच्या जनतेसोबत तेच करीत आहे जे एके काळी नाझींनी यहुद्यांच्या विरोधात केले होते. एक प्रसिद्ध जियनवादी सैन्य कमांडर एकदा म्हणालादेखील होता, ‘‘हिटलर आमच्यासाठी कितीही वाईट ठरला असला तरी त्याने दाखवून दिले आहे की नरसंहार, वंशनाश आणि विस्थापनाद्वारे काय काय प्राप्त केले जाऊ शकते’’. आजची इजरायल संसद नेसेटची एक महिला सांसद म्हणते की सापाच्या पिल्लांना जन्म देणाऱ्या साऱ्या पॅलेस्टिनी मातांची हत्या केली पाहिजे. एक दुसरा सैन्य अधिकारी म्हणतो की गाझा व वेस्ट बँकमधील सर्वच्या सर्व अरब लोकांना हुसकावून तरी लावले पाहिजे नाहीतर त्यांची हत्या तरी केली पाहिजे व तेथे यहुद्यांना वसविले पाहिजे. आज गाझा पट्टीपाशी ना कोणतेही संरक्षणतंत्र आहे, ना वायुसेना, ना नौसेना ना कोणतेही स्थायी सैन्य. तिला चारी बाजूंनी घेरण्यात आले आहे. इजिप्तने राफा क्रॉसिंगला सिल केले आहे. इजरायलने त्याचे हवाई क्षेत्र आणि समुद्र तट बंद करून टाकलेत व त्यांवर आपला कब्जा केलेला आहे. हा प्रकार पाहणारे गाझा पट्टीचे वर्णन अगदी यथार्थपणे जगातील सर्वांत मोठी ओपन एअर जेल असे करत आहेत. चारी बाजूंनी घेरलेल्या गाझा पट्टीतील नागरिकांवर, मुलांवर आणि स्त्रियांवर इजरायल सतत बाँबवर्षाव करीत आहे, त्यांना यातना देत आहे. हजारो निर्दोष पॅलेस्टिनी इजरायलच्या तुरुंगांमध्ये कैद आहेत – कोणत्याही खटल्याच्या सुनावणीशिवाय. काही वर्षांपूर्वी आपल्या कैद करण्यात आलेल्या एका सैनिकाला सोडविण्यासाठी इजरायलने हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली होती. परंतु त्या कराराचे उल्लंघन करीत काही काळापूर्वी अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना पुन्हा कैद केले गेले. त्याचबरोबर, गाझा पट्टीची ब्लॉकेड करून इजरायल योजनाबद्ध पद्धतीने गाझातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित करते आहे. गाझा पट्टीतील वीज आणि पाणीदेखील इजरायलकडून तोडण्यात येते किंवा बाधित करण्यात येते. बाहेरून कोणतेही मानवी साहाय्य पोहोचू दिले जात नाही आणि वारंवार गाझा पट्टीत घुसून अपहरण आणि हत्याकांड घडवून आणले जाते. यानंतर जेव्हा गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी आपल्या मानवी जीवनाच्या अधिकारांसाठी प्रतिरोध करून इजरायलच्या अमेरिका व युरोपी देशांकडून दिल्या गेलेल्या अत्याधुनिक शस्त्रांच्या विरोधात रॉकेट हल्ला करतात तेव्हा तो आपल्या अस्तित्त्वावर झालेला हल्ला असल्याचे सांगत इजरायल गाझा पट्टीत नरसंहार घडवून आणते. इजरायलकडे जे तंत्रज्ञान आहे त्याच्या वापराने त्याला नागरिकांचे मृत्यू टाळणे शक्य आहे परंतु इजरायल तसे करीत नाही व निर्दोषांचे बळी घेतो, कारण त्याचा खरा हेतू आहे गाझा पट्टीत यहुदी वस्त्या वसविणे, तेथील पॅलेस्टिनींना मारून टाकणे, विस्थापित करणे किंवा त्यांना त्याच प्रकारे दुय्यम दर्जाचे नागरिक बनवून, गुलाम बनवून ठेवणे जसे हिटलरने यहुद्यांना बनविले होते. वास्तविक, इजरायल दोन देशांचा तोडगा स्वीकारू इच्छित नाही. इजरायल पॅलेस्टिनी अरब लोकांना तेथून विस्थापित करून ‘‘प्राचीन दैवी यहुदी राज्य इजरायल’’चे आपले कट्टरपंथी जियनवादी स्वप्न साकार करू पाहतोय. आत्मरक्षणासाठी पॅलेस्टिनी लढत आहेत, इजरायली नाहीत. ते पॅलेस्टिनीच आहेत ज्यांच्याकडून त्यांची जीवने, जमिनी आणि देश हिसकावून घेतला जात आहे, इजरायल नाहीत.

इजरायल वारंवार होलोकॉस्टचा हवाला देतो व आपण पीडित असल्याचे सांगतो. इजरायल वारंवार आपल्या आत्मरक्षणाच्या आणि अस्तित्त्व टिकवून ठेवण्याच्या हक्कांच्या बाता करतो. परंतु नोम चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे, इजरायल त्याच प्रकारचे आत्मरक्षण करीत आहे जे कोणत्याही वासाहतिक कब्जा करणाऱ्या शक्तीला प्रतिरोध करणाऱ्या जनतेसमोर करावे लागते. पॅलेस्टिनी जनतेचा त्यांचा देश, त्यांच्या जमिनी, त्यांची जीवने यांच्यावर अधिकार आहे आणि हा अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेतला जात असेल तर त्यांना प्रतिरोध करण्याचा आणि संघर्ष करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या एकूण लढाईत तमाम अरब देशांचे शासक चूप आहेत किंवा दोन्ही पक्षांना शांततेचे मानवतावादी आवाहन करीत आहेत. इजिप्तच्या शासकांनी तर स्पष्टपणे इजरायलची बाजू घेतली आहे व दहशतवादी ‘हमास’ला प्रोत्साहन ठरण्याचे निमित्त सांगून गाझा पट्टीची सीमा उघडी करण्यास नकार दिला आहे. साउदी अरब, कतारपासून इराकचे आईएसआईएस विद्रोहीसुद्धा पॅलेस्टाईनच्या मुद्यावर चूप आहेत, इजरायलच्या हल्ल्यावर मूग गिळूप गप्प आहेत किंवा काहीतरी विधान करण्याची औपचारिकता पार पाडत आहेत. परंतु या देशांतील जनतेच्या मनामध्ये आपल्या शासक वर्गाच्या नपुंसकतेच्या विरोधात विद्रोहाची भावना खदखदते आहे. संपूर्ण अरब जनता पॅलेस्टिनींच्या सोबत उभी आहे व त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा अरब लोकविद्रोहांनी कित्येक अरब देशांमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले होते तेव्हा त्या देशांतील वाढती बेरोजगारी, गरिबी आणि महागाई यांव्यतिरिक्त त्या देशांतील शासकांचे इजरायली जियनवादी आणि अमेरिकन साम्राज्यवाद्यांसमोर गुडघे टेकणे आणि पॅलेस्टाईनच्या जनतेला साथ न देता तिला एकटे सोडणे हासुद्धा एक मोठा मुद्दा होता. गाझा पट्टीवर कब्जा करण्याचा इजरायलचा हेतू या हल्ल्यांद्वारे कधीच साध्य होणार नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्याला हेदेखील चांगले माहित आहे की इजरायल आपल्या तमाम शस्त्रास्त्रांसह ‘हमास’कडून खडे चारून घेणार आहे आणि गाझातूनही तसाच पळ काढणार आहे जसा लेबॅनॉनमध्ये हिजबुल्लाच्या हातून मार खाऊन पळाला होता. परंतु इजरायलला या भेकड आणि नृशंस हल्ल्यांसाठी आणि मानवतेच्या विरुद्ध केल्या जाणाऱ्या अपराधांसाठी केवळ तात्कालिक किंमत मोजावी लागणार आहे असे नाही तर असा प्रत्येक इजरायली हल्ला पॅलेस्टाईनच्या लोकांना इतर अरब देशांमध्ये विस्थापित करतो, जे या सर्व देशांमध्ये बारुदासारखे एकत्र होत आहेत. या विस्थापनामुळे तमाम अरब देशांतील सामान्य जनता अधिक मजबूतपणे पॅलेस्टाईनच्या जनतेशी जोडली जाते आहे आणि आपल्या शासक वर्गाविरोधात उभी ठाकते आहे. समस्त अरब प्रांतामध्ये अमेरिका आणि इजरायलच्या विरोधात जो तिरस्कार साचत चालला आहे त्याचा येत्या काळात विस्फोट होईल आणि या देशांना सत्तापरिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाईल. परंतु हेदेखील तेवढेच खरे आहे की जोपर्यंत खरी लोकशाहीवादी आणि प्रगतिशील शक्ती एका नव्या अरब जनउभाराच्या नेतृत्वात उभी राहात नाही तोपर्यंत नव्या अरब सत्ता अमेरिकन साम्राज्यवाद आणि इजरायली जियनवादाच्या विरोधात उभ्या ठाकतील याची काहीच शाश्वती नाही. तरीही दोन गोष्टी स्पष्ट आहेत. पहिली, अशा क्रांतिकारी शक्ती उभ्या होण्याची प्रक्रिया साम्राज्यवाद आणि जियनावादाच्या प्रत्येक आक्रमणासोबत वाढत जाईल कारण अरब जनतादेखील पाहात आहे की इस्लामी कट्टरवादी शक्ती अमेरिकन साम्राज्यवाद आणि जियनवादाचा अखंडपणे विरोध करीत नाहीत. धार्मिक कट्टरवादी शक्तींनी साम्राज्यवादी आणि जियनवाद्यांसोबत तडजोडी आणि सौदे केल्याची अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत क्रांतिकारी पर्याय उभे राहण्याच्या शक्यता निर्माण होतात कारण अरबच्या जनतेने साम्राज्यवाद आणि जियनवादाच्या धार्मिक कट्टरपंथी विरोधाच्या मर्यादा आणि वास्तव पाहिलेले आहे. दुसरी गोष्ट, पाश्चिमात्य साम्राज्यवाद कोणत्याही प्रकारचा नवा अरब उठाव इच्छित नाही कारण त्यामुळे अमेरिका आणि इजाराईलची पश्चिम आशियातील सारी समीकरणे बिघडू शकतात. म्हणूनच यावेळच्या हल्ल्यातदेखील अमेरिकेचा दम कोंडलेला आहे आणि ज्या दिवशी १३ इजरायली सैनिक मारले गेले त्याच दिवशी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जॉन केरी एका टीव्ही कार्यक्रमात ब्रेकमध्ये अनवधानाने माईक्रोफोनवर इजरायली हल्ल्याबाबत असंतोष व्यक्त करण्याची ‘‘चूक’’ करताना दिसून आले. अमेरिकन साम्राज्यवाद पुरता जाणून आहे की इजरायलने कोणत्या बारुदाच्या ढिगाऱ्यावर पाय ठेवला आहे. जगभरात इजरायलच्या विरोधात जोरदार निदर्शने होत आहेत. टर्कीमध्ये इजरायली दूतावास आणि कौंसुलेटवर हल्ले झाले आणि दूतावासावर कब्जा करून पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला. टर्कीचे शासक एर्दोगान यांच्यासाठीदेखील अशी अडचण निर्माण झाली आहे की त्यांनादेखील इजरायलच्या विरोधात वक्तव्य करणे भाग पडले. जगभरातील इजरायली राजनीतीज्ञ कुठल्या क्षणी आपल्यावर हल्ला होईल या भयाने ग्रस्त आहेत.

काही असो, हे स्पष्टच आहे की पॅलेस्टाईनचा प्रश्न अरब जगाच्या हृदयाच्या केंद्रस्थानी आहे. पॅलेस्टाईनच्या जनतेच्या विरोधात भेकड इजरायल आज जे अपराध करीत आहे ते समस्त अरब जगतात साम्राज्यवाद आणि जियनवादासाठी आत्मघातकी सिद्ध होऊ शकतात. इजरायलच्या भेकड हल्ल्यांविरोधात गाझाचे पॅलेस्टिनी यापूर्वीसुद्धा खंबीरपणे लढले आहेत आणि आताही खंबीरपणे लढत आहेत. मृत्यू आणि दु:ख त्यांच्या जगण्याचा भागच बनून गेले आहे आणि ते भयभीत होत नाहीत. एका पॅलेस्टिनी कवीने म्हटल्याप्रमाणे पॅलेस्टिनी असण्याचा अर्थ आहे एका कधीच बऱ्या न होणाऱ्या आजाराचा बळी असणे आणि त्या आजाराचे नाव आहे ‘‘आशा’’! पॅलेस्टाईनच्या जनतेच्या प्रतिरोधाने १८ जुलैपासून इजरायलला त्याच्या भयंकर चुकीची जाणीव करून देण्यास सुरुवात केलेली आहे. २० जुलै रोजी १३ इजरायली सैनिक मारले गेल्यापासून आणि १ कैद करण्यात आल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हवेतून बाँबवर्षाव करून आणि क्षेपणास्त्रे सोडून इजरायल जे करू शकत होता ते त्याने केले. परंतु जमिनीवर पॅलेस्टाईनचा मुकाबला करणे भेकड जियनवाद्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे आणि येणाऱ्या काही दिवसांतच हे सिद्ध होईल. आणि जियनवाद्यांना आपले योजनाबद्ध फासीवादीकरण करण्याची अनुमती देण्याचे भारी मोल नजीकच्या भविष्यकाळात इजरायलच्या जनतेला चुकवावे लागेल. त्याचबरोबर अरब शासकांनादेखील त्यांच्या नपुंसकतेबद्दल आणि साम्राज्यवादासमोर गुडघे टेकवण्याबद्दल येत्या काळात मोठी किंमत मोजावी लागेल. पॅलेस्टाईन मरणार नाही! पॅलेस्टाईनची जनता मरणार नाही. अंत होणार आहे इजरायलच्या जियनवादाचा आणि अमेरिकेच्या साम्राज्यवादाचा! अरबच्या भूमीत त्यांची कबर खोदण्याची तयारी सुरू आहे.

स्फुलिंग १ सप्‍टेंबर २०१४