उद्धरण

लढाऊ पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांच्या हौतात्म्य दिना (२५ मार्च) निमित्त
महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचे कर्तव्य

गणेश शंकर विद्यार्थी

गणेश शंकर विद्यार्थी

जगभरात सध्या जी उलथापालथ चाललेली आहे आणि आपल्या देशाला तिचा कसा लाभ घेता येईल, याविषयी जर आपण अगदी आवेश बाजूल ठेवून विचार केला तर आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की ज्यांनी त्यांच्यापुरते हे ठरवून टाकले आहे की  जगात काय वाट्टेल ते होवो आपल्याला त्याच्याशी काही देणेघेणे नाही, आपल्याला आपल्या सुखाशी मतलब आहे, जग आणि देश स्वर्गात जावोत अथवा नरकात असे ज्यांनी आपल्यापुरते ठरवून टाकले आहे आणि ज्यांना असे वाटते की जग आणि देशाच्या वास्तवाकडे डोळेझाक केल्यामुळे त्यांच्या ऐशारामात काहीच फरक पडणार नाही, अशा तरुण-तरुणी वगळता देशातील सर्व तरुण-तरुणींनी आपली जीवनचर्या बदलण्याची आणि यथाशक्ती समाज आणि देशासाठी उपयुक्त ठरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्या तरुण किंवा तरुणीच्या देहामध्ये युवा रक्त सळसळते आहे, ज्यांना देश आणि बाहेरच्या जगाकडे पाहण्याचे आणि समजून घेण्याचे किंचितसुद्धा ज्ञान आहे, आपल्या माणसांच्या दुर्दशा अनुभवण्यासाठी ज्याच्यामध्ये पुरेशी सह्दयता आणि प्रेम आहे, ती दुर्दशा दूर करण्याची किंचितसुद्धा इच्छा आहे, जीवन केवळ खा-प्या आणि मजेत राहा यासाठी नाही आणि आदर्शांसाठी जगण्यात आणि मरण्यातच उत्तुंग आणि चांगले जीवन सामावलेले आहे, अशी भावना ज्यांच्या मनात आहे, असे युवक-युवती सध्याच्या आपल्या निश्चेष्ट अवस्थेवर कदापि समाधानी असणार नाहीत.

देशाच्या सेवेची ही संधी अशा तरुणांना उत्कटपणे आपल्याकडे बोलावते आहे. वेळोवेळी इतर देशांमध्येसुद्धा असा काळ होता. तेथील तरुण-तरुणींनी त्याची हाक ऐकली आणि त्याग आणि सत्यनिष्ठेसह तन आणि मन सेवेच्या मार्गावर अर्पण केले, तेथे त्यांनी आपल्या देशबांधवांना उंचावले आणि स्वत: कांचन बनून गेले.

जेव्हा विवेक झोपी जातो, तेव्हा राक्षस जन्मास येतात.

फ्रांसिस्को द गोया (विख्यात स्पॅनिश चित्रकार, १७४६ – १८२८)

डॉ. मेघनाद साहा

डॉ. मेघनाद साहा

धार्मिक दृष्टिकोनाणाच्या आधारे जगाच्या कोणत्याही भागात आंदोलन होऊ शकते. परंतु त्यामुळे कोणताही बहुमुखी विकास होईल असे वाटत नाही. आपणा सर्वांनाच जीवन प्रिय आहे आणि आपण सर्वजण जीवनाच्या रहस्यांचा भेद करण्यास उत्सुक आहोत. प्रचीन काळी विज्ञानाच्या मर्यादांमुळे ज्याला निसर्गाच्या नियमांचा नियंता मानण्यात आले अशा एका कल्पित इश्वराच्या चरणाशी दयेची भीक मागण्यावाचून आपल्यासमोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. प्राग्वैज्ञानिक युगातील मानवाला आपण असहाय्य असल्याचा अनुभव येत होता आणि कदाचित याच मानसिकतेतून धर्माचा उदय झाला. प्राचीन धर्मांमध्ये निसर्गासंबंधी विचारांची क्वचितच सुयोग्य व्याख्या दिसून येते. तसेच त्यांचे स्वरूप आत्मनिष्ठ आहे व म्हणूनच ते आधुनिक युगाच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत.

महान शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा (विज्ञान आणि धर्म)

जोसेफ स्तालिन

जोसेफ स्तालिन

माझ्यासाठी ही कल्पना करणे सुद्धा अवघड आहे की एक बेरोजगार, भुकेला माणूस कुठल्या प्रकारे ‘व्यक्तिगत स्वातंत्र्याचा’ आनंद उपभोगू शकतो. वास्तविक पाहता स्वातंत्र्य केवळ तेच असू शकते जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण आणि उत्पीडन नसेल; जिथे बेरोजगारी नसेल, आणि व्यक्तीला स्वतःचा रोजगार, स्वतःचे घर आणि दररोजची भाकरी हिसकावून घेतली जाण्याची भीती नसेल. केवळ अशाच समाजात, कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात व्यक्तिगत आणि अन्य कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य अस्तित्वात येऊ शकते.

 विश्व सर्वहाराचे  महान नेता जोसेफ स्तालिन (१८ डिसेंबर १८७८ – ५ मार्च १९५३)

आपल्यासमोर जे मार्ग आहे त्याचा बराचसा भाग मागे पडला आहे, काही आपल्यासमोर आहे आणि बराचसा पुढे जाणारा आहे. गेल्याकडून आपण मदत घेऊ शकतो, आत्मविश्वास प्राप्त करू शकतो, परंतु फिरून पुन्हा गेल्या गोष्टींकडे जाणे म्हणजे प्रगती नाही, प्रतिगती आहे, मागे जाणे आहे. आपण मागे जाऊ शकत नाही कारण निसर्गाने भूतकाळाला वर्तमान बनवणे

राहुल सांकृत्यायन

राहुल सांकृत्यायन

आपल्या हाती दिलेले नाही. मग आज या क्षणी आपल्या समोर जो काही कर्मपथ आहे, जर आपण केवळ त्याला चिकटून राहिलो तर ती प्रतिगती नाही, परंतु ती प्रगतीसुद्धा नाही, ती असेल सहगती – कसेबसे चालणे, आणि ती काही जीवनाची खूण नाही. लाटांच्या थप्पडांमुळे वाहणाऱ्या सुक्या लाकडामध्ये जीवन आहे असे काही म्हणता येणार नाही. एक मनुष्य म्हणून, चैतन्यपूर्ण समाज म्हणून हे आपले कर्तव्य आहे की आपण सुक्या लाकडासारखे वाहत जाण्याचा विचार सोडून द्यावा आणि आपला भूतकाळ आणि वर्तमानकाळाकडे पाहून भविष्याचा मार्ग प्रशस्त करावा जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा मार्ग अधिक सुगम होईल व त्यांचे शाप नव्हेत तर त्यांचे आशिर्वाद आपल्या वाट्याला येतील.

राहुल सांकृत्यायन (९ एप्रिल १८९३-१४ एप्रिल १९६३)

जगप्रसिद्ध साहित्यिक मॅक्सिम गोर्की यांच्या जन्मदिनानिमित्त  (२८ मार्च)

मॅक्सिम गोर्की

मॅक्सिम गोर्की

क्रांतिकारी सर्वहाराचा मानवतावाद साधासरळ आहे. तो मानवतेबद्दलच्या प्रेमाचे सुंदर शब्दांमध्ये शाब्दिक जाळे विणत नाही. त्याचे लक्ष्य आहे जगभरातील सर्वहाराला भांडवलशाहीच्या लज्जास्पद, रक्तबंबाळ, वेडसर जोखडातून मुक्त करणे आणि मनुष्याला हे शिकवणे की त्यांनी स्वतःला विकत घेतला जाणारा आणि विकला जणारा माल किंवा विषयासक्त लोकांच्या ऐयाशीसाठीचा कच्चा माल समजू नये. एखाद्या जख्ख म्हाताऱ्याने एखाद्या तरुण, आरोग्यवान स्त्रीवर अत्याचार करावा आणि गर्भाधान नव्हे तर म्हातारपणातील आजार तिला द्यावा, अगदी तसाच अत्याचार भांडवलशाही जगावर करीत असते. सर्वहारा मानवतावाद प्रेमाच्या विलक्षण घोषणांची मागणी करीत नाही, तो प्रत्येक कामगाराकडून आपल्या ऐतिहासिक कर्तव्याप्रति चेतनेची  व सत्तेवर त्याच्या अधिकाराची अपेक्षा करतो… विषयलोलुप, परजीवी, फासिस्ट, खूनी, सर्वहारा वर्गाचे गद्दार यांच्याबद्दल तीव्र घृणेची अपेक्षा तो करतो. तो अशा लोकांबद्दल तिरस्काराची अपेक्षा करतो जे दुःखाला कारणीभूत आहेत आणि हजारो-लाखो लोकांच्या दुःखावर जे जगत आहेत.

मॅक्सिम गोर्की, कल्चर एण्ड द पिपल

सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ यांच्या जन्मदिवसानिमित्त (२७ फेब्रुवारी) त्यांची एक कविता

विष्णू वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

विष्णू वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

ती आदिवासी म्हातारी

प्राणांतिक भयाने धडपडत

डोंगराच्या कडेला गेली

आणि चिकटून उभी राहिली

पालीसारखी खडकाला.

उघडीवाघडी

हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली

हाडांची जीर्णाकृती.

मी क्षणभर आदिवासी झालो

आणि तिच्याकडे पाहिलं,

अहो आश्चर्य –

तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून

लोंबत होतं आपलं पार्लमेंट

आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं

आमचं साहित्यसंमेलन.

 

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५