महिलांवरील वाढते अत्याचार: भांडवली, फॅसिस्ट आणि पुरुषसत्ताक विचारांविरुध्द लढण्याची गरज
आपल्या देशात महिलांविरोधी वक्तव्य देण्यात यांसारखे घोर महिलाविरोधी मानसिकतेची नेते पुढाकार घेतात. त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आघाडीवर असतात. यापैकी तर काही महिलांवर वाढत आणि होत असलेल्या अत्याचारांसाठी महिलांनाच जबाबदार धरतात. त्यासाठी हे टुकार नेते महिलांनाच सल्ले देत फिरतात की त्यांनी छोटे कपडे घालू नयेत, मुलींनी जीन्स वापरू नयेत, मोबाईल फोन वापरू नयेत, इत्यादी. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपला समाजच पुरुषसत्ताक मानसिकतेचा समाज आहे. एकीकडे “बेटी बचाव बेटी पढाव” च्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे घोर महिलाविरोधी वक्तव्य करायची. याचे दुसरे कारण म्हणजे यांची विचारधाराच महिलाविरोधी आहे.