कथा: करोडपती कसे असतात!! / मॅक्सिम गॉर्की
मी माझं म्हणणं पुन्हा एकदा मांडतो की गरीबांसाठी धर्म अत्यंत गरजेचा आहे. मला हे आवडतं. तो म्हणतो कि या पृथ्वीवरील सर्व वस्तू सैतानाच्या आहेत आणि हे मानवा जर तू आपल्या आत्म्याला वाचवू पाहतोस तर पृथ्वीवरील कोणत्याच वस्तूला स्पर्श करायची देखील लालसा बाळगू नकोस. जीवनातील सर्व सुखे तुला मरणानंतर भेटतील. स्वर्गातील प्रत्येक वस्तू तुझीच आहे. जेव्हा लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांना काबूत ठेवणं सोपं जाते. हो. धर्म एका चिकट वंगणासारखं काम करतो आणि जीवनाच्या यंत्राला आपण हे वंगण सतत घालत राहिलो तर सारे भाग व्यवस्थित काम करत राहतात आणि यंत्र चालविणाऱ्यासाठी सोपं होतं.