अमेरिकन सत्ताधाऱ्यांच्या पापाचे ओझे वाहते अमेरिकन सैनिक
इराक आणि अफगाणिस्तान युद्धात सहभागी सैनिकांवर आभ्यास करणाऱ्या एका संस्थेच्या रिपोर्टनुसार अमेरिकेमध्ये दररोज २२ सैनिक आत्महत्या करत आहेत. २००९ नंतर आत्महत्येच्या संख्येत आणि प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सैनिकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण ४४ टक्के वाढले आहे. कित्येक प्रकरणांमध्ये आत्महत्या करणाऱ्या सैनिकांची संख्या प्रत्यक्षात युद्धात मारले गेलेल्या सैनिकांपेक्षा जास्त आहे.